लेफ्टनंट जनरल ब्रार यांच्यावर हल्ला
खालिस्तानी दहशतवाद्यांचे पंजाबमध्ये पुन्हा अशांतता पसरवण्याचे मनसुबे
सेवानिवृत्त झाल्यानंतर ते मुंबई येथील कोलाबा येथील मिलेट्री स्टेशन येथे कडक सुरक्षा व्यवस्थेत राहत होते. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने त्यांना झेड सुरक्षा दिली होती.पण नकोत्या व्हिआयपीना सुरक्षा देणार्या सरकारने त्याना लंडन मध्ये सुरक्षा का प्रदान केली नव्हती ?ब्रार नेहमीच दहशदवाद्यांच्या निशाण्यावर राहिले आहेत.1984 साली 3 जून ते 6 जून या दरम्यान अमृतसर येथे झालेल्या ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व त्यांच्या देखरेखीखाली करण्यात आले होते. या ऑपरेशननंतर दहशदवादी संघटनांच्या हिट लिस्टवर ते आले होते. ऑपरेशन ब्लू स्टारच्या अनुभवावर त्यांनी 1990 साली ‘ऑपरेशन ब्लू स्टार : द ट्रू स्टोरी’ असे एक पुस्तकही लिहले. यामध्ये त्यांनी लष्काराकडून सुवर्ण मंदीराचे नुकसान करणे आणि ऐतिहासिक वस्तु घेवून जाणे या आरोपांचे खंडन केले होते.के. एस. ब्रार एक शुर सैनिक
लेफ्टनंट जनरल कुलदीपसिंग ब्रार यांचा जन्म 1934 मध्ये शीख कुटुंबात झाला. त्यांचे वडील डी. एस. ब्रार दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाले होते व मेजर जनरल या हुद्द्यावरून निवृत्त झाले. के. एस. ब्रार 1954 मध्ये १ मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये लेफ्टनंट या पदावर रुजू झाले. भारत व पाकदरम्यान 1971च्या युद्धात त्यांनी १ मराठा लाइट इन्फंट्री बटालियनचे नेतृत्व केले. जमालपूर येथील 10 डिसेंबर 1971च्या लढाईमधील कामगिरीबद्दल त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले. पंजाबमधील सुवर्णमंदिरामध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधी यांनी 1984 मध्ये योजलेल्या "ऑपरेशन ब्लू स्टार' या मोहिमेचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांनी सायंकाळी साध्या वेशात मंदिराचा फेरफटका मारला ,टेहाळणि केली व पहाटेच्या वेळी लष्कर मंदिरात घुसले. घाईत केलेल्या या कारवाईचे समर्थन करताना त्यांनी ही कारवाई वेळेत पूर्ण केली नसती, तर पाकिस्तानने खलिस्तानवाद्यांना पाठिंबा जाहीर केला असता व परिस्थिती चिघळली असती, असे उत्तर दिले होते. प्रत्यक्ष कारवाईची सूत्रे मेजर जनरल ब्रार यांच्याकडे लष्कराच्या ९ व्या डिव्हीजनचे प्रमुख मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांनी १ जून १९८४ रोजी अमृतसरच्या सुवर्णमंदिर परिक्रमेवर उभे राहून ऑपरेशन ब्ल्यू स्टारची आखणी सुरू केली होती, त्या घटनेचा बदला घेण्यासाठी २८ वर्षांनंतर आज त्यांच्यावर लंडनमध्ये हल्ला करण्यात आला. लेफ्ट. जनरल ब्रार या हल्ल्यात बचावले असले तरी या हल्ल्यामुळे ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या जखमा ताज्या होण्याची शक्यता आहे.ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या काळात लष्कर प्रमुख असलेले जनरल अरुणकुमार वैद्य यांची ‘जिंदा’ या अतिरेक्याने पुण्यात हत्या केली होती. जनरल वैद्य त्यावेळी लष्करप्रमुख असले तरी सुवर्णमंदिरातील लष्करी कारवाईची आखणी लेफ्ट. जनरल कृष्णास्वामी सुंदरजी, लेफ्ट. जनरल रणजितसिंग दयाल व मेजर जनरल कुलदीपसिंग ब्रार यांनी केली होती. ऑपरेशन ब्लू स्टारची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र पूर्णपणे मेजर जनरल ब्रार यांच्याकडे होती.
मेजर जनरल ब्रार यांनी १ जून रोजी सुवर्णमंदिराच्या परिक्रमेवर जावून मंदिर परिसराची पाहणी केली होती व त्यांच्याच अहवालाच्या आधारे ५ जूनच्या सायंकाळी सुवर्णमंदिरात लष्करी कारवाई सुरू करण्यात आली होती. लेफ्ट. जनरल सुंदरजी व रणजितसिंग दयाल हे अधिकारी नियंत्रण कक्षात बसून या कारवाईवर लक्ष ठेवून होते तर प्रत्यक्ष कारवाईची सारी सूत्रे मेजर जनरल ब्रार यांच्याकडे होती.१९६५ व १९७१ या दोन युध्दांचा अनुभव पाठीशी असणार्या मेजर जनरल ब्रार यांचा कस लागला तो ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्येच. ५ जूनच्या सायंकाळी सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत लष्कराची पिछेहाट होत आहे, हे लक्षात येताच मेजर जनरल ब्रार यांनी रात्री १० च्या सुमारास आपल्या व्यूहरचनेत बदल करून, कोणत्याही परिस्थितीत परिक्रमेच्या पहिल्या मजल्यावर मोर्चे बांधा, असा आदेश गार्ड बटालियनला दिला होता.
ऑपरेशन ब्लू स्टारऑपरेशन ब्लू स्टारचे सैन्याचे नेतृत्व मेजर जनरल कुलदीप सिंह बरार व जनरल सुन्देरजी यांनी केले. सुवर्ण मंदिर व आजुबाजुच्या इमारती दहशतवाद्यांचे गढ बनल्या होत्या. जर्नेल सिंह स्वतः सुवर्ण मंदिरात अकाल तख्त या अतिशय महत्त्वाच्या भागात होते. त्यांचे सशस्त्र समर्थक व दहशतवादी दलांचे नेतृत्व शाबेग सिंह यांच्याकडे होते. (शाबेग सिंह हे पुर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या युध्दात त्यांनी बांगलादेश मुक्तीबाहिनी च्या सभासदांना प्रशिक्षित केले होते. त्यांनी भारतीय सैन्यात अतिविशिष्ठ सेवा पदक व परमविशिष्ठ सेवा पदक मिळाले होते.पण नन्तर त्याना सैन्यातुन कोर्ट मार्शल करुन बाहेर काढले होते.)३ जुन पासुनच भारतीय सेनेने सुवर्ण मंदिराच्या परिसरात मोर्चे बांधणी सुरु केली होती. आजुबाजुच्या काही इमारतींचा ताबा घेऊन त्यावर मशिनगन्स बसवल्या गेल्या. त्याचबरोबर ३ जुन पासुन सुवर्ण मंदिरा सभोवतालच्या परिसरात संचारबंदी लागु करण्यात आली. ३ जुन पासुन ५ जुन पर्यंत अधुन मधुन काही फैरी दोन्ही बाजुंकडुन झाडण्यात आल्या. सुवर्ण मंदिरा जवळील इतर इमारतीतील दहशतवाद्यांनी फारसा प्रतिकार न करता समर्पण केले. मुख्य कारवाईस सुरवात सुवर्ण मंदिरात ५ जुनला रात्री १० वाजेच्या सुमारास झाली. एका चिलखती गाडी तुन जवानांना अकाल तख्तजवळ जाण्यासाठी पाठवन्यात आले. पण दहशतवाद्यांनी रॉकेट लाँचरने ती चिलखती गाडी उडवली. यानंतर रणगाड्यांचा वापर करण्याची परवानगी मागितली गेली . प्रथम रणगाड्यांच्या हॅलोजन दिव्यांच्या प्रकाशाने दहशतवाद्यांवर प्रखर प्रकाशझोत मारुन हल्ला करायचा प्रयत्न झाला पण तोही यशस्वी झाला नाही.
कारवाई लांबलीसुवर्णमंदिरातील लष्करी कारवाई अपेक्षेपेक्षा लांबल्याने, कारवाई लवकर संपवा, असे आदेश सुंदरजी यांना देण्यात आले. सुंदरजी यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार संपविण्यासाठी मेजर जनरल ब्रार यांना सूर्योदयाची मुदत दिली. यानंतर मेजर जनरल ब्रार यांनी स्कॉट ओटी ६४ जातीच्या चिलखती गाड्यांचा वापर केला. त्यातही त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनी ३८ टनी विजयंता रणगाड्यांचा वापर करण्याचे ठरविले. या रणगाड्यांमधून निघालेल्या १०५ मि.मी. तोफगोळ्यांनी वेध घेतला. भिंडरानवालेंचा पाडाव झाला. अखेर रणगाड्यांतुन अकाल तख्त वर मारा करन्यात आला जो यशस्वी ठरला. यानंतर रात्री १ वाजेच्या (६ जुनच्या सकाळी) सुमारास काही जण पांढरे निशाण फडकवुन बाहेर आले . नंतर अकाल तख्तमध्ये घुसुन जर्नेल सिंह व शाबेग सिंह यांची प्रेते मिळाली व त्यांची ओळख पटवण्यात आली. आजुबाजुच्या परिसरातील सर्व दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याची कारवाई आणखी काही तास सुरु राहिली. यात भारतीय सेनेचे ८३ जण मारले गेले. यात ४ अधिकारी , ४ कनिष्ठ अधिकारी व ७५ जवान होते.कर्नल इसरार खान यान्ना महाविर चक्र प्रदान करण्यात आले. सुमारे २०० जण जखमी झाले. तर ४९२ दहशतवादी या कारवाईत मारले गेले.
कारवाईचे परिणाम सुवर्ण मंदिराच्या कारवाईने भारतीय सैन्यातही काही शीख सैनिकांनी बंड केले. राजस्थान मधील गंगानगर, बिहार मधील रामगढ, , तसेच अलवर, जम्मू आणि पुणे येथे शीख सैनिकांचे बंड झाले होते. रामगढ मधील सैनिकांनी ब्रिगेडियर पुरींची हत्याही केली. पण लवकरच भारतीय सैन्यातर्फे हे बंड मोडण्यात आले. बंडात सामील असणाऱ्या सैनिकांवर कोर्ट मार्शल करुन जेल मध्ये शिक्षा भोगण्याची कारवाई सुध्दा एका वर्षात झाली . (९३ मध्ये झालेल्या मुम्बई बोम्ब स्फ़ोटाचे खटले अजुन चालु आहेत.)
३ ते ६ जून १९८४ ला सुवर्णमंदिरात जी लष्करी कारवाई झाली त्याबद्दल बराच उहापोह देशात आणि देशाबाहेर झालेला आहे. भिंद्रनवालेंचा मुलगा ईशारसिंग याला दमदमी टाकसाळच्यावतीने कारसेवकांचा स्मरणग्रंथ भेट देण्यात आला. संत समाजाचे प्रमुख बाबा हरमनसिंग यांनी स्मरणग्रंथाच्या तिसर्या आवृत्तीचे प्रकाशन केले. या आवृत्तीत अनेकांचे संदेश आहेत. त्यात हुरियत कॉन्फरन्सचे प्रमुख सईदअली गिलानी यांचाही संदेश आहे. या सर्व घटनांकडे अत्यंत जबाबदारीने व डोळसपणे पाहिले पाहिजे. संपूर्ण शीख समाज राष्ट्रप्रेमी आहे. सुवर्णमंदिरातील कारवाईनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी, लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य (पुण्यामध्ये) यांच्यासह अनेक हत्या झाल्या. दिल्लीमध्ये मोठय़ा प्रमाणावर हत्याकांड झाले.(त्याचे खटले अजुन चालु आहेत) .
ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या त्या इतिहासात, आज २८ वर्षांनंतर एक नवे पृष्ठ जोडले गेले - जनरल ब्रार यांच्यावरील चाकूहल्ल्याचे.ऑपरेशन ब्ल्यू स्टारला तब्बल २८ वर्षे उलटल्यावर पंजाबमधे पुन्हा स्वतंत्र खलिस्तानची मागणी डोके वर काढू लागली आहे. येथील दमदमी टकसाल व दल खालसा पंजाबला पुन्हा अतिरेक्यांच्या स्वाधीन करण्याच्या प्रयत्नात आहेत. पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये पुन्हा अशांतता पसरवण्याचे मनसुबे रचले असून ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या कथित शहिदांचे स्मारक वा मृतांच्या नातेवाइकांचे मेळावे आदी माध्यमांतून अशांतता पसरवणाऱ्यांविरोधात त्वरीत कारवाई आपण करावी. अशा मोहिमा चालवणाऱ्यांविरूद्ध कोणतीही कारवाई न करता , अकाली दलाचे राज्य सरकार बघ्याच्या भूमिकेत आहे , अप्रत्यक्षपणे त्यांना सहकार्यही करीत आहे , ऑपरेशन ब्ल्यू स्टारमधे ठार झालेल्यांचे प्रस्तावित स्मारक त्वरित रोखावे व पंजाबमधे अशांतता पसरवण्याऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करावी , असा आदेश गृह मंत्रालयाने पंजाब सरकारला दिला पाहीजे.
No comments:
Post a Comment