Total Pageviews

Thursday, 25 October 2012

मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ . सत्यपाल सिंह मुस्लिम समाजातील नेत्यांच्या दबावापुढे झुकले आहेCSTदंगलखोरांच्या अटकेचा फेरविचार (महाराश्ट्र टाइम)
 
 
 
 
मुंबई पोलिसांचे नीतीधैर्य वाढविण्याच्या गोष्टी करणारे आणि पोलिसांवर हात उचलणा - यांच्या नाकाबंदीच्या घोषणा करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ . सत्यपाल सिंह मुस्लिम समाजातील नेत्यांच्या दबावापुढे झुकले आहेत . सीएसटी हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समाजकंटकांच्या अटकेचा फेरविचार करण्याचे आदेश सत्यपाल सिंह यांनी क्राइम ब्रँचला दिले आहेत .
गेल्या आठवड्यात मुंबईतील इस्लाम जिमखान्यात मुस्लिम समाजातर्फे सत्यपाल सिंह यांचा सत्कार करण्यात आला . याप्रसंगी मुस्लिम समाजातील काही नेत्यांची भाषणे झाली . या भाषणांचा रोख सीएसटी दंगलीनंतर झालेल्या अटकांवरच होता . या प्रकरणाला हवा देण्यासाठी पोलिसांनी अनेक निष्पाप तरुणांना अटक केल्याचा आरोप मुस्लिम नेत्यांनी यावेळी केला . आझाद मैदानाजवळ पार्क केलेल्या बाइक आणण्यासाठी गेलेल्या तरुणांना पोलिसांनी आकसाने अटक केली आहे , असे सुनावतनाच , या तरुणांना ताबडतोब सोडून देण्याची मागणी या नेत्यांनी आयुक्तांकडे केली . पोलीस आयुक्तांवर मुस्लिम नेत्यांची ही दादागिरी पाहून उपस्थित पोलीस अधिकारीही अवाक् झाले . सिंग यांनी मुस्लिम नेत्यांपुढे तत्काळ शरणागती पत्करत अटकेचा फेरविचार करण्याची मागणी मान्य केली . इतकेच नव्हे तर पोलिसांनी चुका केल्याची कबुली दिली .
प्रत्यक्षात हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांना पुरा्व्याअभावी कोर्टाने आधीच सोडून दिले आहे . तर इतरांवर शस्त्रास्त्र बाळगणे , दंगल घडवणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे ही कलमे लावण्यात आली आहेत . मात्र , आयुक्तांच्या आदेशानंतर या सगळ्यांच्या अटकेचा फेरविचार करण्याचा दबाव आता पोलिसांवर वाढला आहे .

No comments:

Post a Comment