देशविदेशातील मुल्लामौलवींना सार्या जगाचे इस्लामीकरण करावयाचे आहेन संपणारा लढा-प्रभाकर पवार
देशविदेशातील मुल्लामौलवींना सार्या जगाचे इस्लामीकरण करावयाचे आहे. त्यासाठी मशीद व मदरशांमधून धर्मांचे कडवट प्रवचन दिले जात आहे. ११ ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथील मोर्चात सामील होण्याचे आवाहनही मुंबईतील बर्याच मशिदींतून केले गेले होते. हे मुंबई क्राइम ब्रँचच्या तपासात उघड झाले आहे. तेव्हा धर्माचा हा न संपणारा लढा आहे.‘‘धर्मासाठी शहीद झाल्यास स्वर्गात पाहिजे ते उपभोगायला मिळेल. ७२ सुंदर पर्या आपल्या सेवेला असतील आणि त्या कधीच म्हातार्या होणार नाहीत, त्याही सदाबहार असतील! आपण शहीद झाल्यास आपल्या मृतदेहाला दुर्गंधीही येणार नाही, तर सुगंधी वास येईल. चेहर्यावर तेज राहील!’’ असे आपणास सांगितले गेले. त्यामुळेच आपण हिंदुस्थानात येऊन हल्ला करण्यास तयार झालो. परंतु आपण शहीद न होता वाचलो, असा कबुलीजबाब मोहम्मद अजमल कसाबने २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांना दिला. त्यावेळी पोलीसही आश्चर्यचकीत झाले होते. त्यांनी कसाबला सोबत घेतले आणि ताज व ओबेरॉय येथे एनएसजी कमांडोजच्या गोळीबारात मारले गेलेल्या त्याच्या नऊ साथीदारांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह दाखविले. कुठेही सुगंध नाही. उलट मृतदेह सडलेले, काळवंडलेले होते. त्यांच्या प्रेतांना दुर्गंधी येत होती हे कसाबच्या लक्षात आले. त्याचे ‘ब्रेन वॉशिंग’ केलेल्या पाकिस्तानी मुल्ला-मौलवींनी त्यांना धर्माच्या नावाखाली उल्लू बनविले होते. परंतु नंतर पश्चात्ताप होऊन उपयोग काय? पाकिस्तानचा हेतू साध्य झाला होता. देश-विदेशातील सुमारे पावणेदोनशे लोकांना ठार मारण्यात पाकिस्तानी अतिरेक्यांना यश आले होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस व कामा हॉस्पिटलजवळ ६६ च्या वर निरपराध्यांना ठार मारणारा कसाब आता मात्र आपला जीव वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करीत आहे. राष्ट्रपतींकडे त्याने फाशी रद्द व्हावी म्हणून दयेचा अर्जही केला आहे, तर पाकिस्तानकडे पत्र लिहून मदतीची याचना केली आहे. परंतु पाकिस्तानने अद्याप कसाबला अंगाला लावून घेतलेले नाही.मुस्लीम तरुणांना खोटी आश्वासने व आमिष दाखवून भडकविले जाते आणि त्यांच्याकडून धर्माच्या नावाखाली आत्मघातकी हल्ले घडवून आणले जातात. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह जनजागृती मोहीम सुरू करणार आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त असताना डॉ. सत्यपाल सिंह यांनी दहशतवाद्यांशी कसा सामना करता येईल, सतर्क कसे राहता येईल यावर तेथील शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांची शिबिरे आयोजित केली होती. त्यांना प्रशिक्षण दिले होते. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांची माहिती देताना मुस्लिम तरुणांना अतिरेकी कशी खोटी आश्वासने देतात आणि त्यांचा वापर करून घेतात यावरही डॉ. सत्यपाल स्वत: बोलणार आहेत. डॉ. सत्यपाल म्हणतात, मुस्लिम तरुणांना मोठ्या प्रमाणात धर्माच्या नावाखाली भडकविले जाते आणि त्यांच्याकडून घातपाती कारवाया करून घेतल्या जातात. परंतु हे तरुण दहशतवाद्यांच्या आमिषाला बळू पडू नये म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत. आता विचारांनी लढायची वेळ आहे शस्त्रांनी नव्हे, असेही डॉ. सत्यपाल सिंह म्हणतात. डॉ. सत्यपाल सिंह म्हणतात ते बरोबर आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. परंतु जे लोक या देशाची सीमा मानत नाही, मातृभूमीला वंदन करीत नाहीत त्या लोकांबरोबर विचाराने कसे लढणार? आज कश्मीर आपल्या हातातून जवळजवळ गेलाच आहे. लष्करी बळावर तो आज आपल्या ताब्यात आहे. जे कश्मीरमध्ये धुमाकूळ घालीत आहेत तेच मुंबईसह देशभरात आतंक माजवीत आहेत. ७२ सुंदर पर्या आपल्याला स्वर्गात उपभोगायला मिळतील असे सांगणार्या मुल्ला-मौलवींच्या प्रवचनावर विश्वास ठेवून कसाब व त्याच्या साथीदारांनी मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी हैदोस घातला, परंतु कसाबसारखे असे हजारो मुस्लिम तरुण आज धर्मासाठी काहीही करण्यास तयार आहेत. त्यांना कोण व कसे रोखणार?हिंदुस्थानसह सार्या जगात त्यांना इस्लामची हुकमत हवी अहे. त्यासाठीच साम-दाम-दंड-भेदाने त्यांचा हिंसाचार सर्वत्र सुरू आहे. जातीचे, धर्माचे विष ज्यांच्या रक्तात भिनले आहे त्यांच्याशी विचाराने काय लढणार? परंतु जे तलवारीने लढतात ते अखेर तलवारीनेच मरतात. तेव्हा डॉ. सत्यपाल सिंह यांनी दहशतवाद्यांशी कसा सामना करावा, कसे सतर्क रहावे यासाठी शाळा-कॉलेजात जरूर शिबिरे घ्यावीत, परंतु इस्लामी दहशतवाद्यांचा लढा हा न संपणारा आहे एवढे नक्की! जोपर्यंत आपल्या शेजारी पाकिस्तान आहे तोपर्यंत तो चालूच राहील, एवढे लक्षात ठेवा
No comments:
Post a Comment