मेजर अतुल गर्जे यांना मरणोत्तर सेना पदक वृत्तसंस्था
Monday, August 15, 2011 AT 02:15 AM (IST)
Tags:
नवी दिल्ली - देशाची सेवा करताना अतुलनीय धाडस दाखविल्याबद्दल 14 जवानांना "शौर्य चक्र'ने सन्मानित करण्यात येणार आहे; तर "आर्मी एव्हिएशन स्क्वाड्रन'चे मेजर अतुल गर्जे यांना मरणोत्तर "सेना पदक' जाहीर झाले आहे. 114 जवानांना "सेना पदक' जाहीर झाले असून उद्या स्वातंत्र्यदिनी त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी विभागातील अमरजितसिंग, ले. कमांडर फिरदोस दारबशाह मोगल (नौदल) आणि फौजदार आशिषकुमार तिवारी (केंद्रीय राखीव पोलिस दल) यांना मरणोत्तर "शौर्य चक्र' दिले जाणार आहे. अमरजितसिंग यांनी शत्रूशी एकहाती लढा देऊन आपल्या सहकाऱ्यांना वाचविले होते. अनेक गोळ्या अंगावर झेलूनही त्यांनी सहकाऱ्यांना धोकादायक परिस्थितीतून निघून जाण्यास मदत केली होती.
ले. कमांडर मोगल यांनी पाणबुडीची दुरुस्ती करण्यासाठी बाहेर आलेल्या आपल्या सहा सहकाऱ्यांना वाचविले होते. पाणबुडी खवळलेल्या समुद्रात असताना दुरुस्तीसाठी बाहेर गेलेले जवान जोरदार लाटेमुळे लांब फेकले गेले. मात्र, मोगल यांनी अपूर्व शौर्य दाखवून त्यांना पुन्हा पाणबुडीवर येण्यास मदत केली होती. त्या वेळी त्यांच्या डोक्याला जखम झाल्याने त्यांना वीरमरण आले.
फौजदार तिवारी यांनी नक्षलवाद्यांना एकट्याने शोधून काढल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सिधू सोरेन हा नक्षलवादी नेता ठार झाला होता. तिवारी यांना अनेक गोळ्या लागूनही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गोळीबार करून नक्षलवाद्यांना रोखून धरले. प्रतिक्रिया सर्वांना मनाचा मुजरा. त्यांच्या कुटुंबियांना सरकारने सन्मानाने वागवावे हीच सदिच्छा. जय जवान जय भारत. सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली. सर्व वीरमाता-पिता-पत्नी यांनाही अभिवादन. आम्ही सर्व भारतवासी तुमचे देणे लागतो. मी आशा करतो कि ज्यांना ज्यांना शक्य आहे ते ते Army Central Welfare Fund द्वारा अश्या हुतात्म्यांच्या वा जायबंदी सैनिकांच्या कुटुंबियांना मदत पोहोचवतील. धन्य तुझे बलिदान.. पुढच्या वेळी युद्धात आधी राजकारण्यांना पुढे करा. लागुदे त्यांना गोळ्या, जरा पापे कमी होतील त्यांची.
On 15/08/2011 02:55 AM chicago said:
On 15/08/2011 02:56 AM Saurabh Ranade said:
On 15/08/2011 02:57 AM rk said: president medals, indian army, independence day,

No comments:
Post a Comment