कुटुंबासाठी
काय करू शकतो?
- आपल्या मुलांना लिहिण्याची, वाचण्याची आणि विचार करण्याची सवय लावा.
- मुलींना स्वसंरक्षणाचं शिक्षण द्या.
- लहान मुलांना वेगवेगळ्या अपघातांपासून कसं वाचायचं, याचं शिक्षण द्या.
- घरातल्या वडीलधाऱ्यांची त्यांच्या म्हातारपणी काळजी घ्या.
- कुटुंबात संवाद असणं खूप गरजेचं आहे. कुटुंबातील इतरांशी नेहमी संवाद साधा.
- एकमेकांना वेळोवेळी भेटून नातेसंबंध जिवंत ठेवा.
पर्यावरणासाठी
काय करू शकतो?
- ऊर्जा बचत करण्यासाठी LED बल्ब वापरा आणि वीज वाचवा.
- जलसंवर्धनाचे विविध उपाय वापरून पाणी वाचवा.
- कचरा व्यवस्थापन करा; ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्याचं योग्य विघटन करा.
- प्लास्टिक आणि कागदाचा अनावश्यक वापर टाळा आणि जिथे शक्य असेल तिथे पुनर्वापर करा.
- वाहन कमीत कमी वापरा. लहान अंतरासाठी चालत जा किंवा सायकलचा वापर करा.
- भाजीपाला, फळे आणि अन्नाची नासाडी टाळा.
- जास्त फुलझाडे आणि वृक्षारोपण करून झाडं लावा.
स्वदेशी
वस्तूंचा वापर करा
- घरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूसाठी स्वदेशी पर्याय शोधा, मग तो मोबाईल असो, लॅपटॉप असो किंवा इतर कोणतीही वस्तू.
- चीनी वस्तूंवर पूर्ण बहिष्कार घाला.
- कोणतीही खरेदी करताना त्याची डिजिटल पद्धतीने पेमेंट करा आणि रोख रक्कम (कॅश) वापरणं टाळा.
सामाजिक
कार्यात आणि देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा
- जाती-धर्म किंवा परस्परांच्या उणिवा काढण्यासारख्या चर्चा टाळा आणि परस्परांबद्दल आदर विकसित करा.
एक
सजग आणि देशभक्त नागरिक बना
- रस्त्यावर कचरा टाकू नका.
- इथे तिथे थुंकू नका.
- वाहतुकीचे नियम पाळा.
- सार्वजनिक मालमत्तेची काळजी घ्या.
- हिंसक आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नका.
- सोशल मीडियावर वादविवाद टाळा आणि भडकवणारे पोस्ट टाकू नका.
- सायबर गुन्हे आणि फसवणुकीबद्दल जागरूक रहा.
- देशाचे कायदे आणि नियम पाळा.
- आपल्या देशाच्या नेतृत्वावर आणि सैन्यावर विश्वास ठेवा.
- केवळ चर्चा करण्यापेक्षा देशाला विकसित करण्यासाठी आपल्याकडून योगदान द्या आणि एक कृतिशील नागरिक बना.
No comments:
Post a Comment