एक सजग आणि देशभक्त नागरिक बना
- रस्त्यावर
कचरा टाकू नका.
- इथे
तिथे थुंकू नका.
- वाहतुकीचे
नियम पाळा.
- सार्वजनिक
मालमत्तेची काळजी घ्या.
- हिंसक
आंदोलनांमध्ये
सहभागी होऊ नका.
- सोशल
मीडियावर वादविवाद टाळा आणि भडकवणारे पोस्ट टाकू नका.
- सायबर
गुन्हे आणि फसवणुकीबद्दल जागरूक रहा.
- देशाचे
कायदे आणि नियम पाळा.
- आपल्या
देशाच्या नेतृत्वावर आणि सैन्यावर विश्वास ठेवा.
- केवळ
चर्चा करण्यापेक्षा देशाला विकसित करण्यासाठी आपल्याकडून योगदान द्या आणि एक कृतिशील नागरिक बना.
नागरिक म्हणून तुमची कर्तव्ये
- शिक्षण:
स्वतःला आणि तुमच्या मुलांना शिक्षित करा. शिक्षणामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होतो.
- सफाई:
तुमचा परिसर स्वच्छ ठेवा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका.
- नियम
पाळा: वाहतुकीचे नियम आणि देशाचे कायदे पाळा.
- डिजिटल
व्यवहार:
शक्य असेल तिथे डिजिटल पेमेंट करा, रोख रकमेचा वापर कमी करा.
- झाडे
लावा: पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावा आणि त्यांची काळजी घ्या.
- स्वदेशी
वस्तू:
'मेक इन इंडिया'ला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करा.
सामाजिक कार्यात आणि देशाच्या प्रगतीत सहभागी व्हा
- जाती-धर्म किंवा परस्परांच्या उणिवा काढण्यासारख्या चर्चा टाळा आणि परस्परांबद्दल आदर विकसित करा.
- समानता:
कोणताही भेदभाव न करता सर्वांशी समानतेने वागा.
- मदत:
गरजूंना मदत करा.
- सामाजिक
कार्यात भाग घ्या: तुमच्या समाजाच्या विकासासाठी चाललेल्या कामांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हा.
- मतदान:
प्रत्येक निवडणुकीत मतदान करून योग्य सरकार निवडण्यास मदत करा.
देशभक्त नागरिक म्हणून माझी कर्तव्ये - फक्त वाचू नका, कृतीही करा!
मी सर्वप्रथम भारतीय आहे आणि याचा मला अभिमान आहे. आत्म-सुधारणा
- कौशल्ये:
नवीन कौशल्ये शिका आणि तुमच्या कामात सर्वोत्तम कामगिरी करा.
- कर
भरा: प्रामाणिकपणे कर भरा.
- वेळेचे
पालन: कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक जीवनात वेळेचे पालन करा.
- मी फक्त भारतीय वस्तूंचा वापर करेन.
- मी भ्रष्टाचार करणार नाही आणि त्याला प्रोत्साहनही देणार नाही.
- मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे करेन.
- मी माझी गाडी किंवा दुचाकी योग्य ठिकाणी पार्क करेन.
- राष्ट्रगीतासाठी मी उभा राहीन.
- मी सर्व प्रकारचा कचरा फक्त कचरापेटीत टाकेन.
- मी प्रदूषण करणार नाही.
- मी सार्वजनिक मालमत्तेचा वापर काळजीपूर्वक करेन. संप, मोर्चे किंवा आंदोलनादरम्यान कोणत्याही मालमत्तेचे नुकसान होऊ देणार नाही.
- सज्जनांची निष्क्रियता दुर्जनांना सक्रिय करते, म्हणूनच मी एक कृतिशील नागरिक बनेन.
- मी विज्ञान आणि अध्यात्म यांचा योग्य समन्वय साधेल.
- मतदान करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि ती मी नक्कीच पार पाडेन.
- मी कोणत्याही विध्वंसक कामात सहभागी होणार नाही.
सजग आणि जबाबदार नागरिक व्हा
- गरज असेल तरच वस्तू आणि सेवा खरेदी करा. समाधान, चंगळवाद आणि उपभोग यातील फरक नीट समजा.
- शक्य होईल तितक्या वस्तूंचा पुनर्वापर
(reuse) करा आणि त्यांचा पुनर्चक्रण
(recycle) करण्यासाठी मदत करा.
- रोकडविरहित
(Cashless) व्यवहार करा, कारण यामुळे भ्रष्टाचार, दहशतवाद, खोटे चलन आणि काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईत मदत होते.
- कायद्यांचे काटेकोरपणे पालन करा आणि प्रत्येक कामात सर्वोच्च गुणवत्तेला प्राधान्य द्या.
- चारित्र्य आणि ज्ञान हीच खरी संपत्ती आहे.
- कठोर परिश्रमाला पर्याय नाही.
- तुमच्या कोणत्याही कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या
हे
सर्व छोटेसे प्रयत्न एकत्र येऊन देशाच्या प्रगतीला
हातभार लावतील आणि भारताला अधिक
महान बनवतील.
आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्यात जगामध्ये सर्वोत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा.
- तुम्ही विद्यार्थी असाल, तर अर्जुनापेक्षाही चांगले विद्यार्थी बना.
- तुम्ही शिक्षक असाल, तर द्रोणाचार्यांपेक्षाही चांगले शिक्षक बना.
- तुम्ही शेतकरी असाल, तर जपानच्या शेतकऱ्यांपेक्षाही चांगले शेतकरी बना.
- तुम्ही उद्योजक असाल, तर गूगल किंवा मायक्रोसॉफ्टपेक्षाही मोठे बना.
जेव्हा प्रत्येक नागरिक आपापल्या क्षेत्रात जागतिक दर्जाचा बनेल, तेव्हाच हा देश एक महान शक्ती बनू शकतो.
No comments:
Post a Comment