गतिमान आणि प्रगत राज्य म्हणून लौकिक मिळवणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत अंमली पदार्थांचे प्रमाण वाढत आहे. तरुणाईभोवती पडणारा हा नशेखोरीचा विळखा ही चिंतेची बाब असून अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्री व सेवनाच्या बाबत सर्वंकष मोहीम उघडण्याची अत्यधिक आवश्यकता आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ही गरज ओळखून पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. परंतु अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रसाराबाबत कसून तपास करून त्यामागे असलेल्या देशविघातक शक्तींचा बुरखा फाडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अंमली पदार्थांच्या नशेमुळे तरुणाईवर होणारे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी नागरीकांनी व विशेषतः पालकांनी देखील अधिक दक्ष राहण्याची निकड आहे.
सांगलीत व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्र
पॅरोलवरील परदेशी नागरिकांना ‘ट्रॅक’ करणार; अमली पदार्थप्रकरणी मुख्यमंत्र्यांची माहिती
अंमली पदार्थ मुक्त युवा पिढीसाठी कोथरूडकरांचा शंखनाद, अमली पदार्थ विक्रीची माहिती देणाऱ्यास दहा हजारांच्या बक्षिसाची घोषणा
अंमली पदार्थ विकणार्या महिलेला अटक - Deshdoot
धूलिवंदनच्या पहाटेच करोडो रुपयांच्या अंमली पदार्थासह तीन आरोपीना अटक
पिंपरी- चिंचवड: गांजा तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना बेड्या; ९६ किलो गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नालासोपाऱ्यात एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त
मुंबई पोलिसांची उत्तर प्रदेशात लखनौ येथे कारवाई, 10 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये मोठी वाढ; वर्षभरात तब्बल 'इतक्या' कोटींचे अंमली पदार्थ जप्त
एमडी’तस्कर दांपत्याचे जिल्ह्यात नेटवर्क
पदरी सात अपत्य, करोनात व्यवसाय ठप्प, डोक्यावर कर्जाचा डोंगर, 'त्या' दाम्पत्याचा एक निर्णय, अन् पोलिसही चक्रावले
अंमली पदार्थांची तस्करी करणे गंभीर गुन्हा, उच्च न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये नेमकं काय?
आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या वार्षिक अहवालात ड्रग्ज तस्करी आणि ड्रग्ज वापरात इंटरनेटची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.
Drugs worth Rs 4,249.90 cr seized, 14,230 held for consumption in Maharashtra in 2024: CM Fadnavis
राज्य अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ३६४ पदांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
2. Analytical View
गेल्या काही दिवसांमध्ये सांगली, शिक्रापूर, विरार यासह अन्य ठिकाणी केलेल्या पोलीस कारवायांमध्ये कोट्यवधी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. सांगली, शिक्रापूर व विरार या तिन्ही ठिकाणी झालेल्या कारवायांमध्ये अटक केलेले आरोपी एका विशिष्ठ समुदायाचे असून यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांमध्ये विदेशी ड्रग माफियाचा सहभाग देखील उघडकीस आला आहे.
अंमली पदार्थांच्या विळख्यात प्रामुख्याने तरुणाई अडकते व त्यामुळे अर्थव्यवस्था तसेच सुरक्षेला मोठा धोका उद्भवतो हे सर्वमान्य जागतिक सत्य आहे. हे विचारात घेता अंमली पदार्थांच्या महाराष्ट्रातील वाढत्या प्रसारामागे देशविघातक शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंमली पदार्थांची तस्करी व व्यापार यांचा दहशतवादाशी असलेला संबंध लक्षात घेता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारने दहशतवाद, माओवाद व फुटीरतावाद यांच्या विरोधात सुरु केलेल्या कारवाईला मिळत असलेल्या यशामुळे दहशतवादी, फुटीरतावादी संघटना व त्यांना छुपा पाठिंबा देणाऱ्या देशभरातील व देशाबाहेरील वेगवेगळ्या संस्था, संघटना व पक्षांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे हे देखील येथे विचारात घ्यावे लागेल.
अंमली पदार्थांच्या राज्यातील वाढत्या प्रसाराची गंभीर दखल घेत राज्य सरकारने गेल्या काही दिवसात अनेक सकारात्मक पाऊले उचललेली आहेत. या संदर्भात विधान परिषदेत विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सविस्तर माहिती दिली आहे.
राज्यातील अंमली पदार्थांच्या व्यापार आणि प्रसारास आळा घालण्यासाठी सरकारने राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केले आहे. त्याखेरीज या संदर्भात स्टेट अपेक्स लेव्हल कमिटी आणि अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स निर्माण करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात अंमली पदार्थांचा व्यापार रोखण्यासाठी केलेल्या कारवायांमध्ये पोलिसांना मिळालेले यश त्याचा दृश्य परिणाम मानला जात आहे. अमली पदार्थ तस्करी प्रकरणांतील पॅरोलवर असलेल्या परदेशी नागरिकांना इलेक्ट्रॉनिक गॅजेटच्या मदतीने ट्रॅक करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
पूर्वी अंमली पदार्थांची विक्री थेट होत असे. परंतु आता डार्कनेट आणि इन्स्टाग्रामद्वारे संदेश पाठवून ऑर्डर देण्यात येते आणि ड्रग्ज कुरिअर सेवेच्या माध्यमातून वितरीत केली जातात. याची गंभीर दखल घेत कुरिअर कार्यालयांची तपासणी सुरू करण्यात आली असून त्यांना जबाबदार धरण्यात येईल.
अंमली पदार्थांशी थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या संबंधित आढळलेल्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी हकालपट्टी केली जाईल असा इशाराही पुण्यात अशा सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून देण्यात आलेला आहे.
तरुणांना व्यसनामुक्त करण्यासाठी प्रशासनाने सांगलीत प्रायोगिक तत्वावर समुपदेशन व चिकित्सा केंद्र सुरू करावे, त्यासाठी शासन सामाजिक उत्तरदायित्व निधी देईल अशी सूचना देखील अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली.
सरकारने अशी पाऊले उचललेली असली तरी तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून सोडवण्यासाठी नागरिक आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी देखील या संदर्भात जागरूक राहून योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे.
शिवाजी रायगड स्मारक, अंकुर प्रतिष्ठान, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, अग्रेसर भारत आदी संघटनांनी एकत्र येत अंमली पदार्थमुक्त युवा पिढीसाठी नुकतीच कोथरूड येथे निदर्शने केली. नागरिकांनी देखील त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नागरिकांचा हा पुढाकार स्वागतार्ह आहे. अंमली पदार्थांविरोधातील लढा तीव्र करण्यासाठी अंमली पदार्थ विक्रीची माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रसंगी केली.
वर्ष २०२५ मधील ठळक घटनांवर दृष्टीक्षेप:
जानेवारी २८ - विटा एमआयडीसी येथे सांगली पोलिसांनी मेफेड्रॉन (एमडी ) हा अंमली पदार्थ निर्माण करणाऱ्या कारखान्यावर धाड घालून १४.५ किलोग्रॅम वजनाचे व २९ कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त केले व सुलेमान जोहर शेख, बलराज अमर कटारी आणि राहुदीप धनाजी बोरिचा यांना अटक केली.
९ फेब्रुवारी - मुंबई पोलिसांची उत्तर प्रदेशात लखनौ येथे कारवाई, १० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
२२ फेब्रुवारी - पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या एका महिलेसह संजय पांडुरंग मोहिते, मनसाराम नूरजी धानका यांना अटक करत ९६ किलो गांजा जप्त.
२२ फेब्रुवारी - फेवर ओमोफोन्वन (२६) या नायरेजियन महिलेसह नदीम सय्यद (२६) याला नालासोपारा लिंक रोडवर अटक करत एक कोटी रुपयांहून जास्त किंमतीचा मेफेड्रॉन (एमडी ) हा अंमली पदार्थ जप्त.
१४ मार्च २०२५ - विरारच्या म्हाडा परिसरात समीर साहेब (२८), जास्मिन युनूस (२६) आणि परवीन यांना अटक करून १ कोटी ८ लाख १० हजार रुपये किंमतीचे २५७ ग्रॅम गर्द जप्त.
१३ मार्च - शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात जबीन जावेद शेख (३८)हिला अटक करून तिच्याकडून ३ लाख १७ हजार १०० रुपये किमतीचा मेफेड्रोन (एमडी ) हा अंमली पदार्थ जप्त.
3. By The Numbers
सन २०२४ मध्ये राज्यात ४ हजार २४० कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त.
अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या १७ हजार ८५७ आरोपींना सन २०२४ मध्ये अटक.
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली. या फोर्ससाठी आवश्यक असणारे ३४६ पदांच्या मनुष्यबळाच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी ३१० पदे नियमित असतील तर ३६ पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत.
No comments:
Post a Comment