Total Pageviews

Saturday, 13 May 2023

#अरुणाचल प्रदेश मधील #भारत चीन सीमा सुरक्षित करण्यामध्ये देशाला प्रचंड य...

अनेक भागांमध्ये देशातल्या मोठ्या रस्ते बांधणार्या कंपन्यांना काम करू देण्यात अडथळे निर्माण केले जातात. अत्याधुनिक अत्याधुनिक उपकरणाने सज्ज असलेल्या बाहेरच्या कंपन्याची रस्ते बांधण्याची क्षमता ही अरुणाचल प्रदेश मधील कंत्राटदारां पेक्षा कधीही अनेक पट जास्त असते. काम तिथल्या तंत्राटदारांना द्यावे अशी मागणी सतत केली जाते. त्यामुळे वेगाने रस्ते बांधणीचे काम करणे अत्यंत आव्हानात्मक असते. असे मानले जाते की अरुणाचल प्रदेश मध्ये कुठली जमीन कोणाच्या नावावर ती आहे याचे फारसे रेकॉर्ड्स उपलब्ध नाही, म्हणूनच ज्या वेळेला नवीन रस्ते बांधण्याची योजना पुढे येते त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला तिथले जाती जमाती आपल्या झोपड्या बांधतात. ज्यामुळे सरकारला ती जमीन त्यांची आहे असे मानून त्यांना भरपाई देणे भाग केले पाडले जाते. 

No comments:

Post a Comment