https://www.youtube.com/shorts/LD5U30JVTWk
आसाम व अरुणाचल या ईशान्येतील दोन महत्त्वाच्या राज्यांना जोडणारा
ब्रह्मपुत्रा नदीवरील पूल दुमजली आहे. हा बोगिबिल पूल रेल्वे व वाहने या
दोन्हींसाठी आहे. तो जवळपास पाच किलोमीटर लांबीचा आहे .त्यामुळे रस्त्याचे १७०
किलोमीटर तर रेल्वेचे तब्बल ७०५ किलोमीटर अंतर कमी होणार आहे.
आसामच्या दिब्रुगडला धीमाजीशी जोडणारा हा 4.94
किलोमीटर लांबीचा हा आसाम, ‘बोगीबिल’ पूल
देशातील सर्वाधिक लांबीचा ‘रेल कम रोड ब्रिज’ आहे.
या पुलामुळे चीनच्या सीमेनजीक हव्या त्या वेळी सामग्रीनिशी सहज जाता येणार आहे.
ब्रह्मपुत्रेसारखी महाकाय नदी अनेकदा पात्र बदलते. अशा
स्थितीत या साऱ्या प्रतिकूलतेवर मात केल्याशिवाय ईशान्येच्या विकासाला जशी चालना
मिळणार नाही.1962 च्या युद्धात चीनने तेथे आक्रमणही केले होते; मात्र
या युद्धानंतरही ईशान्य भारताकडे फारसे लक्ष पुरवले गेले नाही.
चीनबरोबरच्या युद्धावेळी सीमेनजीकची खडतर स्थितीही
भारताच्या पराभवाला कारणीभूत ठरलेली होती. या ठिकाणी रस्ते किंवा अन्य पायाभूत
सुविधा नव्हत्या. सैनिकांना रसद जलद गतीने मिळावी, अशी
स्थिती त्यावेळी नव्हती. या स्थितीत बदल करण्यासाठी अनेक दशके जावी लागली.
हा पूल दोन मजली असून, वरच्या
मजल्यावर तीन लेनचा रस्ता व खालील मजल्यावर दुहेरी रेल्वेलाईन आहे.
ब्रह्मपुत्रेच्या जलस्तरापासून 32
मीटर उंचीवर असलेला हा पूल स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे.
ब्रह्मपुत्र नदीच्या दोन टोकांना जोडणारा हा पूल तयार करणे
हे मोठे आव्हान होते.या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो, तसेच
भूकंपाची शक्यताही जास्त असते. पण हा पूल 8
रिश्टर स्केलपर्यंतच्या भूकंपाचा धक्का सहन करू शकतो.हा देशातील सर्वात मोठा पूल
आहे. भारतीय रेल्वेने हा डबल डेकर पूल तयार केला आहे. याच्या खालच्या डेकवर दोन
रेल्वे मार्ग आहेत. तर वरच्या डेकवर तीन लेनचा वाहतुकीचा मार्ग आहे.
भारतीय लष्करासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा
१९९७मध्ये माजी पंतप्रधान एचडी देवगौडा यांनी पुलाचं
भूमिपूजन केलं. मात्र, प्रत्यक्षात या पुलाचं बांधकाम वाजपेयी सरकारच्या काळात
सुरू झालं. तब्बल २१ वर्षांनंतर हा पूल वाहतुकीसाठी सज्ज झाला सुरक्षेच्या
दृष्टिनंही 'बोगीबील ब्रिज' महत्त्वाचा
आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारा हा पूल भारतीय लष्करासाठी अत्यंत उपयुक्त
आहे. आतापर्यंत दिब्रुगडमधून अरुणाचल प्रदेशात जायचे असेल, तर
गुवाहाटीमार्गे जावे लागत होते. त्यासाठी 500
किलोमीटरचा प्रवास करावा लागे; मात्र
आता या पुलामुळे हा प्रवास 100
किलोमीटरपेक्षाही कमी अंतराचा झाला आहे. पूर्वी धेमाजीहून डिब्रूगड पर्यंत 500
किमीचे अंतर कापण्यासाठी 34
तास लागायचे. आता हा प्रवास केवळ 10
किमीचा असेल आणि तोही 3 तासांत पू्ण होईल.
अरुणाचलची सीमा चीनला लागून आहे. इथे चीनकडून कोणताही हालचाल
झाल्यास भारतीय लष्कर या पुलाच्या माध्यामातून लवकरात लवकर अरुणाचल प्रदेशमध्ये
पोहोचू शकते. 'बोगीबील ब्रिज'च्या खाली दोन रेल्वे लाइन
टाकण्यात आल्या आहेत आणि त्याच्यावर तीन पदरी रस्ता आहे. या रस्त्यावरून
सैन्याच्या अवजड वाहनं, रणगाड्यांची
सहज वाहतूक करता येऊ शकते.
१२०० किमी लांबीचे नवे महामार्ग बांधून पूर्ण
गेल्या चार वर्षांत या प्रदेशात सुमारे १२०० किमी लांबीचे
नवे महामार्ग बांधून पूर्ण झाले आहेत, तर
कित्येक रस्त्याचं काम सुरू आहे. तसंच त्रिपुरा, मेघालय
आणि मिझोराम या तीन राज्यांमध्ये प्रथमच रेल्वे पोहोचली. प्रदेशातील सर्व मीटर-गेज
रेल्वे मार्गांचेदेखील ब्रॉड-गेजमध्ये रूपांतर झालं आहे. येत्या काळात मणिपूर
भारतीय रेल्वेच्या नकाशावर यावं, यासाठी
प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे,'उडान' हवाई
वाहतूक योजनेंतर्गत आगरताळा, शिलाँग, झॉल, दिमापूर, इंफाळ, पासीघाट, तेजू, गंगटोक
आणि सिल्चर या शहरांना गुवाहाटीशी जोडण्यात आलं आहे. आता अरुणाचल प्रदेशची राजधानी
इटानगरच्या विमानतळाचं बांधकाम सुरू आहे.
सारा देश
रस्त्यांनी, रेल्वेमार्गाने, जलमार्गांनीही बारमाही
जोडलेला असणे आवश्यक
19 किमी लांबीचा धुबरी फुलबारी पूल हा आसाममधील धुबरी आणि मेघालयातील फुलबारी यांना जोडणारा ब्रह्मपुत्रा नदीवरील 4 लेन पूल प्रकल्प सुरू
होत आहे. ही सगळी कामे केवळ ईशान्य भारत सामरिकदृष्ट्या विशेष आहे. लोहित नदीवरील
९.१५ किमी लांबीच्या ढोला-सादिया पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांमधलं
अंतर सुमारे सहा तासांनी कमी झालं आहे. याशिवाय ब्रह्मपुत्रेवर तीन आणि सिआंग
नदीवर दोन पुलांचं बांधकाम सुरू आहे. या अभियानामुळे पूर्वोत्तर भागातील अंतर्गत
वाहतूक आणि या राज्यांची उर्वरित देशाशी संपर्कता या दोन्हीला चालना मिळाली आहे.
सारा देश उत्तम रस्त्यांनी, रेल्वेमार्गाने आणि जलमार्गांनीही बारमाही जोडलेला असणे आवश्यक आहे. ईशान्य भारताच्या विकासाचा आणि सुरक्षेचा हा वेग असाच सुरू राहणे संपूर्ण देशासाठी गरजेचेच आहे. चीनपासून या भागाला जपण्यासाठी तो अधिकाधिक सुसज्ज व विकसित करणे ही काळाची गरज आहे.
No comments:
Post a Comment