ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटने विविध देशांनी प्रगत तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीवर वर्षभराचा प्रकल्प हाती घेतला. ट्रॅक केलेल्या 44 पैकी 37 तंत्रज्ञानामध्ये चीन आघाडीवर आहे.या क्षेत्रांमध्ये समाविष्ट होते — इलेक्ट्रिक बॅटरी, हायपरसोनिक्स आणि प्रगत रेडिओ-फ्रिक्वेंसी कम्युनिकेशन्स जसे की 5G आणि 6G, इ. चीनने जगातील 48.49 टक्के उच्च-प्रभाव संशोधन पेपर तयार केले. हे हायपरसोनिक्स आणि अशा अनेक विषयांसह प्रगत विमान इंजिनमधील जगातील मोठ्या 10 संशोधन संस्थांपैकी सात ्चीन मध्ये आहेत.
मात्र चीन तिथपर्यंत कठोर परिश्रमाने पोहोचला नाही, तर साम दंड भेद याचा वापर करून चीन तंत्रज्ञानाची महाशक्ती बनत आहे. 2020 मध्ये एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी खुलासा केला - “आम्ही आता 2,000 हून अधिक चोरी/घुसखोरी तपास आहेत ज्याचा संबध्द चीनी सरकारशी आहे. दर 10 तासांनी एक नविन चीनी चोरी उघड होते. गेल्या काही वर्षांमध्ये चोरीची वाढ ही 1,300 टक्के आहे.
चीनच्या मोठ्या प्रमाणावर बौद्धिक संपदा (IP) चोरीने अनेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे .चिनी आयपी चोरीमुळे युनायटेड स्टेट्स दरवर्षी $600 अब्ज गमावते.
चीनी कुप्रसिद्ध ‘ग्रेट फायरवॉल
आता चीनने केवळ चोरीच्या तंत्रज्ञानाने चीनी संपत्ती निर्माण केली नाही, त्याचा उपयोग चीनी जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठीही करत आहे. प्रत्येक चिनी नागरिकांवरती लक्ष/ पाळत ठेवली जाते ,ज्यामुळे यांचे लक्ष फक्त कामावरती असेल आणि सरकार विरोधी कारवायांवरती नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (CCP) वर्चस्वासाठी इंटरनेटवरील माहितीचा मुक्त प्रवाह हा सर्वात मोठा धोका होता. म्हणुन चीन ने सिल्व्हर ओक चोरलेले सॉफ्टवेअर चीनी कुप्रसिद्ध ‘ग्रेट फायरवॉल’ तयार करण्यासाठी वापरले. आपले सायबर योध्दे चिनी फायरवॉल मधून घुसखोरी करून चिनी नागरिकांना सत्य परिस्थिती सांगू शकतात का?
महत्वाच्या नागरिकांची टेहाळणी/पाळत ठेवण्याकरता अभिनव मार्ग
परदेशामध्ये महत्त्वाच्या नागरिकांवरती पाळत ठेवून हेरगिरी करण्याकरता चीनने अभिनव मार्ग शोधले आहेत .त्यापैकी एक म्हणजे चायनीज इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) मॉड्यूल. IoT चा वापर कृषी, उत्पादन, वाहतूक, CCTV, इ. स्मार्ट उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. जानेवारी 2023 मध्ये, ब्रिटीश सरकारच्या अधिकार्यांनी एका चायनीज सेल्युलर IoT मॉड्यूलचा शोध लावला, जो वरिष्ठ मंत्री वापरत असलेल्या कारमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस म्हणून वापरला जात होता. परदेशामध्ये महत्त्वाच्या नागरिकांवरती हेरगिरी करण्याकरता अशा मॉड्युल्समध्ये जवळपास काय चालले आहे ते ऐकणे, त्यांचे व्हिडिओ काढणे, महत्वाच्या व्यक्तींना ट्रॅक करणे, त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे अशी माहिती गोळा केली जाते आणि ज्याचे विश्लेषण आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने चीनमध्ये केले जाते. यामुळे मोठा धोका निर्माण होत आहे.
2017 मध्ये फिटनेस ट्रॅकिंग अॅप स्ट्रावामुळे अमेरिकन गुप्तचर संस्थांमध्ये धोक्याची घंटा वाजली, यूएस सैनिकांनी व्यायाम करताना फिटबिट सारख्या फिटनेस ट्रॅकर्सचा वापर करताना त्यांच्या गुप्त यूएस सैन्य तळांचे स्थान चीन ला दिले. रिअल-टाइम डेटा विश्लेषण क्षमता, बॅगेज-स्क्रीनिंग सिस्टम, इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, चायनीज स्नूपिंग(टेहाळणी करण्याकरता वापरली जाणारी साधने) लिस्ट फ़ार मोठी आहे.आयात केलेल्या प्रत्येक चिनी इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे मॉड्यूल घातलेले आहे. ज्यामुळे चीनला या डिवाइस मधून माहिती मिळते .ही माहिती चोरी थांबवायची असेल तर एकच उपाय ,कुठलाही चिनी डिवाइस वापरू नये.
साखळीलॉजिस्टिक सिस्टममध्ये एम्बेड केलेले IoT मॉड्यूल्स
चिनी सिसिटीव्ही कॅमेरा हिक व्हिझन कंपनी भारतात सर्व ठिकाणी वापरली जाते. हिक व्हिझन आणि इतर सर्व चीनी कंपन्या चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांना बांधील आहेत, ज्यासाठी त्यांना चीनी सरकारच्या आदेशांचे पालन करणे आवश्यक आहे. चिनी सरकारने सांगितलेले हेरगिरीचे काम त्यांना करावेच लागते आणि जी माहिती स्वतःच्या बिजनेस मधून गोळा केलेली आहे, ती चिनी सरकारच्या बरोबर शेअर करावी लागते. पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक सिस्टममध्ये एम्बेड केलेले IoT मॉड्यूल्स भारतीय संरक्षण उत्पादकांच्या पुरवठा प्रवास कसा होतो हे सांगू शकतात. म्हणजे महत्त्वाचे स्पेअर पार्ट्स कुठल्या कारखान्यांमध्ये तयार होतात, कुठल्या प्रकारच्या गाडीने,रोडने किंवा रेल्वेने त्यांना सैन्याच्या डेपोमध्ये पोहोचवले जाते आणि तिथून पुढे सीमेवरती असलेल्या सैन्याकडे कसे पोहोचवले जाते, अशी कुठल्याही महत्त्वाच्या उपकरणाची साखळीची वाटचाल जर समजली तर त्याचा वापर धात पात करण्याकरता,ती साखळी तोडण्याकरता पाहिजे त्यावेळेस केला जाऊ शकतो.
चीन हिक व्हिझन सारख्या कंपन्यांच्या डेटाचा वापर करून स्पेअर पार्ट्स शस्त्रे प्रणाली वितरीत केली गेली आहेत आणि कोणत्या भारतीय संरक्षण तळावर आहेत याचे चित्र तयार करू शकते. चायनीज गुप्तचर एजन्सीद्वारे अतिसंवेदनशील असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी, डेटाचा वापर केला जाऊ शकतो.
2018 मध्ये चीनी हॅकर्सनी सरकारी गॅस कंपनी इंडेनच्या वेबसाइटद्वारे आधार डेटाबेसमध्ये घुसखोरी केली. त्यांनी नावे, पत्ते, फोटो, फोन नंबर, ईमेल आयडी, बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन) आणि शेवटी बँक तपशीलांसह भारतीय नागरिकांचा डेटा चोरला अशी बातमी आली होती. या चोरीमागे चिनी सरकार-समर्थित हॅकर्सचा हात आहे.
मग नेमके काय करावे
मोठ्या संख्येने चिनी हेर नेपाळच्या सीमेवरून भारतामध्ये नापाक कारवाया करण्यासाठी येतात.कुठलीही चिनी नागरिकांना नेपाळ सिमे द्वारे भारतात प्रवेश करण्यापासून थांबवले पाहिजे.
कुठल्याही प्रकारच्या चिनी सामग्रीचा वापर त्यामध्ये मोड्युस एम्बेड करून हेरगिरी करता केला जाऊ शकतो. म्हणूनच कुठल्याही प्रकारची चिनी सामग्री भारतात येऊ देऊ नये .परंतु चीन आपली सामग्री केवळ चीन मधूनच पाठवतो असे नाही. चिनी सामग्री हॉंगकॉंग, सिंगापूर, साऊथ ईस्ट देश , नेपाळ यांच्या मार्गाने सुद्धा भारतामध्ये प्रवेश करत असते. हे पूर्णपणे थांबले तरच देशावरती तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारी हेरगिरी थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकते. आज कुठली चिनी सामग्री आज भारतामध्ये आहे आणि त्यामधून कसे हेरगिरी केले जाते आहे ज्याचे तज्ञांकडून निरीक्षण करून घ्यावे आणि या सध्या भारतामध्ये असलेल्या मॉड्युलस निष्क्रिय बनवले जावे.
भाग दोन चिनी सायबर युद्धाला प्रतिउत्तर कसे द्यायचे
No comments:
Post a Comment