जम्मू-काश्मीरमधील रेल्वे जाळ्याचा नेत्रदीपक विकास
जम्मू कश्मीर राज्याची भौगोलिक परिस्थिती
लडाखला एक वेगळा केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर, सध्याच्या जम्मू कश्मीरला दोन मोठ्या भागांमध्ये वाटता येईल. पहिले जम्मू-उधमपूर चा भाग. हा भाग कश्मीर खोऱ्यापासून पिर पंजाल या पर्वत रांगांमुळे वेगळा होतो. पीर पंजाल पर्वताच्या उत्तरेला कश्मीर खोरे(Valley of Jhelum river) आहे, जे सपाट आहे, व 130 ते 140 किलोमीटर लांब आहे आणि 30 ते 40 किलोमीटर रुंद आहे. कश्मीर खोऱ्याला चारी बाजूने पीर पंजाल डोंगर आणि शमशाबारी डोंगर यांनी वेढलेले आहे. जम्मू भागामध्ये डोंगरांची उंची तीन हजार फुटापासून १०-११ हजार फूट एवढी आहे. श्रीनगर खोऱ्याच्या आसपास डोंगरांची उंची तीन चार हजार फुटांपासून दहा-अकरा हजार फूट एवढी आहे. आठ ते नऊ हजार फुटाच्या वरती बर्फ पडतो आणि उंच डोंगरावर कमीत कमी चार ते सहा महिने बर्फ असतो. डोंगराळ भाग असल्यामुळे इथे रस्ते बनवणे रस्ते किंवा रेल्वे बनवणे अतिशय कठीण असते.
रस्ते रेल्वे लाईन बांधली वेग आश्चर्य जनक
बर्फ पडल्यामुळे किंवा दरडी कोसळल्यामुळे रस्ते तीन ते चार महिने बंद असतात. इतके वर्ष या भागात रस्ते, रेल्वे विकासाची फारशी कामे झाली नाहीत .परंतु गेल्या काही वर्षापासून कश्मीरमध्ये रस्ते, रेल्वे लाईन आणि विमानतळे यांच्या बांधणीमध्ये क्रांती होत आहे. ज्या वेगाने रस्ते आणि रेल्वे लाईन बांधली जात आहे तो वेग आश्चर्य जनक आहे.एकेकाळी सर्वच बाबतीत मागे असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. ‘ त्या मध्ये रेल्वेसेवेचा ही समावेश आहे.
जम्मू कश्मीरला स्पेशल राज्याचा दर्जा दिल्यामुळे त्यांना विकासाला प्रचंड निधी मिळायचा. परंतु त्यापैकी 80 ते 85 टक्के रक्कम ही भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नव्हती. अनेक रस्ते कधीच बांधले जायचे नाही आणि वर्षभरानंतर ते वाहून गेले असे दाखवले जायचे. परंतु आता भारतातल्या नामवंत कंपन्या तिथे रस्ते, रेल्वे लाईन आणि विमानतळे बनवत आहेत, ज्यामुळे भ्रष्टाचार हा पूर्णपणे थांबला आहे आणि कामाचा दर्जा उक्रुष्ट झाला आहे.
प्रदेशात शांतता प्रस्थापित झाल्यामुळे पर्यटनास देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून, लाखोंच्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये जात आहेत.
रेल्वे ‘कनेक्टिव्हिटी’मध्ये चिनाब पूल हा मैलाचा दगड
No comments:
Post a Comment