Total Pageviews

Tuesday, 30 May 2023

साम दंड भेदचा वापर करून आर्थिक महाशक्तीकडे चिनी वाटचाल डावपेचांना कसे प...

चिनी मल्टी डोमेन युद्ध डावपेचांना कसे प्रत्युत्तर द्यायचे

स्वतःला समृद्ध करताना इतर सदस्य राष्ट्रांना फ़सवले 
2001 मध्ये जेव्हा चीन जागतिक व्यापार संघटनेत (WTO) सामील झाला तेव्हा त्याचा GDP $1.34 ट्रिलियन होता.जागतिक व्यापार संघटनेत सामिल झाल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी चीन लोकशाहीकडे वाटचाल करेल, अशी आशा व्यक्त केली होती.मात्र झाले याउलट, चीनने डब्ल्यूटीओच्या प्रत्येक नियमाचे उल्लंघन केले, जबरदस्तीने तंत्रज्ञान हस्तांतरण केले, बेकायदेशीर राज्य अनुदान दिले, परदेशी वस्तूंची चीन मध्ये आयात होउ दिली नाही. आणि चीनी फायद्यासाठी पुरवठा साखळी नियंत्रित केली. याचा परिणाम असा झाला की चीनने स्वतःला समृद्ध करताना इतर सदस्य राष्ट्रांना फ़सवले .
पूर्ण युरोप, अमेरिका आणि अशिया खंडातले अनेक देश चीनवर आता पूर्णपणे अवलंबित झालेले आहे आणि त्या त्या देशातील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा अंत झाला आहे.
बहुतेक प्रगत देशातील कॉर्पोरेटनी आपले कारखाने चीनमध्ये नेऊन युरोप आणि अमेरिकेच्या पायावरती कुऱ्हाड मारली होती.आता हा धोका लक्षात आल्यानंतर आता अनेक कारखाने,चीनच्या बाहेर आपल्या स्वतःच्या देशात किंवा भारत किंवा एशियातील देशात परत येण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये यश मिळणे इतके सोपे नाही.कारण ते चिनी आर्थिक चक्रव्ह्युव्हामध्ये पूर्णपणे अडकलेले आहे.
आज 18.32 ट्रिलियन डॉलर जीडीपीवर चीन जागतिक स्थरावर नंबर दोन ची आर्थिक शक्ती आहे. ग्लोबल फायर पॉवरनुसार, चीनकडे 3.14 दशलक्ष लष्करी कर्मचारी (सक्रिय 2 दशलक्ष), 4950 रनगाडे, 730 नौदलाची लढाउ जहाजे (2 विमानवाहू जहाजे आणि 76 पाणबुड्यांसह), आणि 3166 विमाने (1199 लढाऊ) आहेत. युनायटेड स्टेट्स आणि रशियाच्या मागे जागतिक लष्करी शक्तींमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

साम दंड भेदचा वापर करून टेक्नॉलॉजी महाशक्तीकडे वाटचाल
ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूटने विविध देशांनी प्रगत तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीवर वर्षभराचा प्रकल्प हाती घेतला. ट्रॅक केलेल्या 44 पैकी 37 तंत्रज्ञानामध्ये चीन आघाडीवर आहे.या  क्षेत्रांमध्ये समाविष्ट होते — इलेक्ट्रिक बॅटरी, हायपरसोनिक्स आणि प्रगत रेडिओ-फ्रिक्वेंसी कम्युनिकेशन्स जसे की 5G आणि 6G, इ. चीनने जगातील 48.49 टक्के उच्च-प्रभाव संशोधन पेपर तयार केले. हे हायपरसोनिक्स आणि अशा अनेक विषयांसह प्रगत विमान इंजिनमधील जगातील मोठ्या 10 संशोधन संस्थांपैकी सात ्चीन मध्ये आहेत.
मात्र चीन तिथपर्यंत कठोर परिश्रमाने पोहोचला नाही, तर साम दंड भेद याचा वापर करून चीन तंत्रज्ञानाची महाशक्ती बनत आहे. 2020 मध्ये एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर रे यांनी खुलासा केला - “आम्ही आता 2,000 हून अधिक चोरी/घुसखोरी तपास  आहेत ज्याचा संबध्द चीनी सरकारशी आहे. दर 10 तासांनी एक नविन चीनी चोरी उघड होते. गेल्या काही वर्षांमध्ये चोरीची वाढ ही 1,300 टक्के आहे.
चीनच्या मोठ्या प्रमाणावर बौद्धिक संपदा (IP) चोरीने अनेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे .चिनी आयपी चोरीमुळे युनायटेड स्टेट्स दरवर्षी $600 अब्ज गमावते.
चीनी कुप्रसिद्ध ‘ग्रेट फायरवॉल

आता चीनने केवळ चोरीच्या तंत्रज्ञानाने चीनी संपत्ती निर्माण केली नाही, त्याचा उपयोग चीनी जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठीही करत आहे. प्रत्येक चिनी नागरिकांवरती लक्ष/ पाळत ठेवली जाते ,ज्यामुळे यांचे लक्ष फक्त कामावरती असेल आणि सरकार विरोधी कारवायांवरती नाही. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या (CCP) वर्चस्वासाठी इंटरनेटवरील माहितीचा मुक्त प्रवाह हा सर्वात मोठा धोका होता. म्हणुन चीन ने सिल्व्हर ओक चोरलेले सॉफ्टवेअर चीनी कुप्रसिद्ध ‘ग्रेट फायरवॉल’ तयार करण्यासाठी वापरले. आपले सायबर योध्दे चिनी फायरवॉल मधून घुसखोरी करून चिनी नागरिकांना सत्य परिस्थिती सांगू शकतात का?

No comments:

Post a Comment