SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Friday, 10 June 2016
जोरदार मोदी
जोरदार मोदी
Friday, June 10th, 2016
अमेरिकेतून श्री. मोदी हे मेक्सिको देशात उतरले असून तेथेही हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचे नेत्रदीपक स्वागत झाले. इतकेच नव्हे तर मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी यांच्यासाठी स्वत: ड्रायव्हिंग करून एक प्रकारे गौरवाचे शिखर गाठले. एकंदरीत हिंदुस्थानचे पंतप्रधान जोरात असून जग पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर ते निघाले आहेत. त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा!
जोरदार मोदी
हिं दुस्थानातील राजकारण बरेचसे काँग्रेसमुक्त झाले आहे. पण अमेरिकन काँग्रेससमोर पंतप्रधान मोदी यांनी जोरकस व ऐतिहासिक भाषण केले आहे. मोदी विदेश दौर्यावर आहेत व ते अमेरिकेत जाऊन काय करतात व बोलतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मोदी यांच्या भाषणात जोर होता. हिंदुस्थानी लोकांना चांगले इंग्लिश बोलता येत नाही. हिंदुस्थानी मंडळी कसे गमतीदार उच्चार करतात, याच्या नकला अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार मि. ट्रम्प करीत होते, पण त्यांच्याच संसदेत हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी यांनी ‘भारतीय’ इंग्रजीत भाषण केले व मोदी यांच्या भाषणास वाक्यागणिक टाळ्यांचा कडकडाट करून आणि उभे राहून सिनेट सदस्य त्यांना जोरदार प्रतिसाद देताना दिसत होते. हा प्रतिसाद जोरदार होता. स्वदेशातील सभेत ज्याप्रमाणे एका बाजूने ‘मोदीऽऽ मोदीऽऽ’ अशा घोषणा दिल्या जातात आणि एक माहोल बनतो तसेच भारावलेले वातावरण अमेरिकन काँग्रेसमध्येदेखील मोदींचे भाषण सुरू असताना पहायला मिळाले. भाषण संपल्यावर सिनेटर लोकांनी मोदी यांना गराडा घातला व त्यांची स्वाक्षरी घेतली. अनेकांनी रेटारेटी करून मोदी यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढून घेतले. ही मोदी यांच्या
लोकप्रियतेची पावतीच
म्हणावी लागेल. परदेशात जातील तिथे मोदी यांचे अती जंगी स्वागत व शाही सोहळे साजरे होत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘मेरा देश बदल रहा है’ या म्हणण्यावर माना डोलावल्या जात आहेत व जग आता हिंदुस्थानला मानसन्मान देत आहे. मोदी यांनी हे सर्व अथक परिश्रमाने घडवून आणले याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा हे पंतप्रधान मोदी यांचे चांगले दोस्त बनले आहेत. राष्ट्राध्यक्षपदावरून ‘रिटायर’ होताच श्री. व सौ. ओबामा हे निवृत्तीनंतर सुरत, राजकोट, पोरबंदर, मनाली, महाबळेश्वर किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी तर स्थायिक होणार नाहीत ना? असे वाटावे इतका त्यांचा दोस्ताना घट्ट झालेला दिसत आहे. अमेरिकन राष्ट्रपतीचे इतके अलोट प्रेम आतापर्यंत कोणत्याही हिंदुस्थानी पंतप्रधानाला लाभले नसेल. मोदी यांनी आपल्या कर्तृत्वाने हे प्रेम मिळवले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मोदी यांनी सांगितले की, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अमेरिकेने हिंदुस्थानला केलेली मदत आम्ही विसरू शकत नाही. अमेरिकेने वेळोवेळी हिंदुस्थानला अडचणीच्या वेळी मदत केल्याची कृतज्ञता पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. ते त्यांच्या विनम्र स्वभावाला साजेसेच आहे. पण याच अमेरिकेने पाकिस्तानला अर्थपुरवठा व शस्त्रपुरवठा करण्याचे धोरण बंद केलेले नाही. एका बाजूला दहशतवादाविरुद्ध लढ्यात हिंदुस्थानला पाठिंबा द्यायचा व त्याच वेळी पाकिस्तानला एफ-१६ सारखी लढाऊ विमाने पुरवून
दहशतवादी राष्ट्राशी व्यापार
करायचा हे त्या देशाचे धंदेवाईक धोरण चिंताजनक आहे. मोदी यांच्या भेटीनंतर ओबामा यांनी पाकिस्तानला दम भरला व पठाणकोट हल्ल्यातील आरोपींवर कारवाई करा, असा इशारा दिला, पण कारवाई कोणी करायची? लादेनने अमेरिकेवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला कोणत्याही सूचना न देता त्यांच्या देशात घुसून लादेनला मारले व अलीकडे तालिबानी गटाचा प्रमुख मुल्लाह अख्तर मन्सूर यालाही त्याच पद्धतीने ठार करून सामर्थ्याची चुणूक दाखवली. म्हणजे अमेरिकेच्या शत्रूंना स्वत: घुसून ठार मारायचे व हिंदुस्थानच्या बाबतीत इशारे द्यायचे हा दुटप्पीपणा समजून घेतला पाहिजे. २०२२ पर्यंत हिंदुस्थान आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल असा विश्वास मोदी यांनी अमेरिकेत व्यक्त केला. २०२२ पर्यंत प्रत्येक गावात इंटरनेट उपलब्ध होईल. १०० स्मार्ट शहरे निर्माण करू, अशी माहितीही मोदी यांनी अमेरिकन काँग्रेससमोर दिली आहे. त्यामुळे येथील काँग्रेसजनांनी आदळआपट करायची गरज नाही. अमेरिकेतून श्री. मोदी हे मेक्सिको देशात उतरले असून तेथेही हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचे नेत्रदीपक स्वागत झाले. इतकेच नव्हे तर मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी यांच्यासाठी स्वत: ड्रायव्हिंग करून एक प्रकारे गौरवाचे शिखर गाठले. एकंदरीत हिंदुस्थानचे पंतप्रधान जोरात असून जग पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर ते निघाले आहेत. त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा
- See more at: http://www.saamana.com/sampadkiya/jordar-modi#sthash.8FFj74Vi.dpuf
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment