Total Pageviews

Saturday, 11 June 2016

MODI DOCTRINE-भारत-अमेरिका संबंधांचे नामकरण ‘मोदी सिद्धांत’

अमेरिकेशी संबंध वृद्धिंगत करण्याच्या पंतप्रधान मोदींनी चालविलेल्या प्रयत्नांना, तसेच त्यांच्या भारत-अमेरिका संबंधांच्या विचारसरणीला अमेरिकेने ‘मोदी सिद्धांत’ (मोदी डॉक्ट्रीन) असे नाव दिले आहे. त्यांनी अमेरिकेन संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या भाषणाचे कौतुकयुक्त पडसाद अद्याप अमेरिकेत उमटत असून हा प्रसंग ऐतिहासिक असल्याचे वर्णन केले जात आहे. या दोन देशांमधील परस्पर संबंधांना केवळ द्विपक्षीय संबंधांचाच पैलू नसून जागतिक राजकारण आणि शांतताकारणाशीही ते जोडले गेले आहेत. हे दृढमूल संबंध गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र व्यवहार साहाय्यक मंत्री निशा देसाई बिस्वाल यांनी भारतीय समुदायासमोर बोलताना व्यक्त केली आहे. अमेरिकन संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर मोदींनी जे भाषण केले, ते दोन्ही देशांमधील संबंधांची आजवरची दिशा आणि यापुढची दिशा ठरविणारे होते. त्याचे वर्णन ऐतिहासिक या एकाच शब्दाने करता येईल. दोन्ही देशांच्या संबंधांमुळे आशिया ते आफ्रिका या पट्टय़ात चिरस्थायी शांतता, समृद्धी आणि स्वातंत्र्य यांचा सहयोग साधता येईल, असा विश्वास अमेरिकेलाही वाटू लागला आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. मेरिकन संसदेने नरेंद्र मोदी या व्यक्तीला केवळ गैरसमजाच्या आधारावर अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी परवाना नाकारला होता त्याच अमेरिकन संसदेने काल नरेंद्र मोदी यांचे प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. त्यांच्या ४५ मिनिटांच्या भाषणादरम्यान जवळजवळ चाळीसपेक्षा जास्त वेळा म्हणजे मिनिटामिनिटाला टाळ्या वाजतच होत्या. अनेक वेळा तर सदस्यांनी उभे राहून टाळ्या वाजविल्या. या टाळ्या केवळ सभ्यता म्हणून नव्हत्या. उभे राहून टाळ्या वाजविणे उत्स्ङ्गूर्त होते. मोदी यांचे भाषण केवळ सरकारी पद्धतीचे आणि अमेरिकेच्या संसदेत भाषण आहे म्हणून त्यांना बरे वाटावे, अशा प्रकारच्या वाक्यांनी भरलेले नव्हते. मोदी यांच्या प्रत्येक वाक्यात भारतीयत्वाच्या विचारांचा गंध होता. हे भाषण उत्तम पण सोप्या इंग्रजीत होते. समोर कागद न धरता मोदी यांनी ते उत्स्ङ्गूर्त वक्तृत्वाचा परिचय देत केले. भारतातील केजरीवालसारखे क्षुद्र आणि संकुचित आक्रस्ताळे याच मोदी यांच्या पदवीवर शंका घेत होते काय? असा संतप्त प्रश्न ऐकणार्‍यांच्या मनात निर्माण झाला. मोदी यांनी अमेरिकन संसदेतील या भाषणात महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग यांचा संबंध जोडत अहिंसेचे तत्त्व मांडले. हिंसेचे राजकीय कारणाने कोणत्याही प्रकारे समर्थन करण्याला त्यांनी विरोध व्यक्त केला. हिंसा ती हिंसाच, दहशतवाद तो दहशतवादच. त्यात चांगले आणि वाईट असा भेद होत नसतो, हे ठासून सांगितले. दहशतवादाच्या विरोधात एका आवाजात लढाई लढली गेली पाहिजे, हे त्यांनी सांगितले. अमेरिकन संसदेने पाकिस्तानला लढावू एङ्ग-१६ ही विमाने देण्यास नकार दिल्याच्या निर्णयाचा उल्लेख करीत अमेरिकन संसदेची स्तुती केली. सध्या जगात जिहादी दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. आधी तालिबान आणि आता ‘इसिस’च्या रूपाने क्रूर, अमानवीय अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर एका जागतिक व्यासपीठावरून बोलण्याची संधी मिळताच नरेंद्र मोदी यांनी या बाबतीत भारताचे जे चिंतन आहे ते अगदी स्पष्ट शब्दांत मांडले. या सगळ्या जागतिक दहशतवादाला अशिया खंडात भारताचे शेजारी देश कशाप्रकारे प्रोत्साहन देत आहेत याचा अगदी नि:संदिग्ध शब्दांत मोदी यांनी केलेला उल्लेख ङ्गार महत्त्वाचा होता. भारत-पाकिस्तान संबंधात अनेक वर्षांपासून अमेरिकेने संदिग्ध, मोघम भूमिका घेतल्या आहेत. दोघांनाही चुचकारले आहे. मात्र, पहिल्यांदा अमेरिकन संसदेने पाकिस्तानला लढाऊ विमाने सवलतीत देण्यास नकार देणारा ठराव केल्याने हे परिप्रेक्ष्य बदलत आहे. या बदलत्या वातावरणाचा अंदाज घेऊन मोदी यांनी आपल्या भाषणात भारताच्या शेजारी देशांकडून दहशतवाद पोसला जाण्याचा अगदी रोखठोक उल्लेख केल्याने त्याचा मोठा परिणाम भविष्यातील आंतरराष्ट्रीय संबंधांवर होणार आहे. अमेरिकन संसदेने दहशतवादाबाबत जगाला अगदी स्पष्ट संदेश द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मोदी यांनी दहशतवादाचा मोघम उल्लेख केला नाही, तर थेट लष्कर ‘तोयबा’, ‘तालिबान’ आणि ‘इसिस’ यांची नावे घेऊन ही सगळ्या जगाला आव्हान देणारी दहशतवादाची साखळी कशी आहे हे स्पष्ट केले. जगातील दहशतवादाला विरोध करण्याची भाषा अमेरिकेने वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर केली. मात्र, ‘तालिबान’पुरतीच त्यानंतरची कृती मर्यादित राहिली. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी दहशतवादाची ही नावे घेऊन दहशतवादाचा जागतिक परीघ इतका मोठा आहे याची जाणीव करून दिली. त्यानंतर ‘‘भूतकाळातील अडथळे मागे सोडू अणि भविष्याचा ठोस आधार तयार करू,’’ असा आशावादी दृष्टिकोन मांडला. सगळ्या जगाला दहशतवादाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या दहशतवादाशी लढताना पारंपरिक सैन्य, गुप्तचर व्यवस्था, राजनैतिक मुत्सद्देगिरी अशा सर्व पातळीवर लढून त्याला पराभूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादी संघटनांची नावे वेगवेगळी असली तरी त्यांची दहशतवादासंदर्भातील विचारसरणी एकच म्हणजे घृणा, हत्या आणि हिंसेची आहे हे त्यांनी ठासून सांगितले. मुंबईवरच्या हल्ल्याची आठवण त्यांनी करून दिली. त्यावेळी अमेरिका भारताच्या पाठीशी ठोसपणे उभी राहिल्याचे स्मरण करून दिले. ‘‘भारत आणि अमेरिका संबंध भविष्यात गतिशील राहतील आणि दोन्ही देशांतील या सहयोगाने आशियापासून आङ्ग्रिकेपर्यंत आणि हिंद महासागरापासून ते प्रशांत महासागरापर्यंत शांतता, समृद्धी आणि स्थिरतेचे वाहक बनू,’’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तो मैत्रीचे व्यापक क्षितिज नजरेसमोर उभे करणारा होता. स्वामी विवेकानंद आणि अटलबिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला. ‘‘भारत आणि अमेरिका हे जगातील दोन प्रगल्भ आणि जुनी लोकशाहीप्रधान संस्कृती जपणारे देश आहेत,’’ असे मोदी म्हणाले. अमेरिकेच्या संसदेतील या भाषणात भारतीयत्वाचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख करत, स्ङ्गुरण निर्माण होईल अशी अमेरिका आणि भारत यांच्यातील साम्यस्थळे सांगत मोदी यांनी अमेरिकन कॉंग्रेसचे मन जिंकून घेतले. नरेंद्र मोदी यांची तुलना अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांच्याशी करण्याचा मोह अमेरिकेतील विश्लेषकांना व्हावा, इतका मोदी यांचा प्रभाव अमेरिकेवर पडला आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाला मोदी यांनी जी गती दिली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. वैयक्तिक भावनिक संबंध, भारतीयत्वाचा गौरव, परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांच्या समूहात चैतन्याचा संचार अशा अनेक गोष्टी मोदी यांनी साधल्या आहेत. या सर्वांपेक्षाही प्रभावी म्हणजे परराष्ट्र धोरणात जगातून भारतात येणारा गुंतवणूकदारांचा ओघ वाढावा आणि भारताची अर्थिक स्थिती मजबूत व्हावी, असा दृष्टिकोन ठेवून त्यांनी परराष्ट्र धोरणाला त्या दृष्टीने जी गती दिली आहे ती अभूतपूर्व अशी आहे. मोदी यांच्या विदेश दौर्‍यावर सवंग टीका करणार्‍या विरोधकांना मोदी यांच्या या कामगिरीची कल्पना नाही असे नाही. मात्र, त्यांचा हेतू संकुचित राजकीय प्रतिमा हननाचा आहे. सर्वसामान्य जनता हे सगळे ओळखून आहे. भारताजवळ जगाला देण्यासारखे काय आहे आणि जगाकडून भारताच्या प्रगतीसाठी काय घ्यायचे आहे, याची स्पष्टता मोदी यांच्या परराष्ट्र धोरणात सतत दिसून येते. एनएसजीच्या सदस्यत्वाच्या विषयात चीनला एकाकी पाडण्यात भारत यशस्वी झाला आहे. दहशतवादाच्या बाबतीत पाकिस्तानचे काळे रूप जगासमोर आणण्यात आणि जगाने त्याला कृतिरूप विरोध केला पाहिजे इतपत त्याचे स्वरूप जगाला पटवून देण्यात मोदी यांनी जे यश मिळविले आहे ते अत्यंत लक्षणीय आहे. या पाच देशांच्या दौर्‍यात नरेंद्र मोदी यांनी आपल्या अभ्यासाने, अस्सल भारतीय विचारांच्या प्रकाशात मांडलेल्या विचाराने, सहज संवेदनशील व्यवहाराने, प्रभावी वक्तृत्वाने जग जिंकले आहे!

No comments:

Post a Comment