SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Friday, 8 April 2016
श्रीनगर NIT कॅम्पसमध्ये 600 जवानांचा वॉच, विद्यार्थिनींना दिली बलात्काराची धमकी?-पाकिस्तानी झेंडे दाखवणारे व देशविरोधी घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या नॅशनल इन्स्टिीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) कॅपसमध्ये पॅरा मिलिट्री फोर्सचे 600 जवान तैनात करण्यात आले आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेत पॅरा मिलिट्री फोर्सचे जवान तैनात केल्याची ही देशातील पहिली घटना आहे. कॅम्पसमध्ये पाकिस्ताना झेंडे दाखवल्यानंतर झालेल्या वाद चिघळल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
1500 विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 600 जवान तैनात....
राजस्थानातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास करण्याची धमकी मिळाली आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थिंनी बलात्कार करण्याची धमकी दिली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विद्यार्थिंनींना मिळाली बलात्काराची धमकी
- परराज्यातील विद्यार्थ्यांना काश्मीरी विद्यार्थ्यांकडून धमकावले जात आहे. इतकेच नव्हेतर विद्यार्थिंनींना बलात्काराची धमकी दिली जात आहे.
- बिहारच्या विद्यार्थिनीने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, तिला काश्मीरी विद्यार्थिंनीकडून धमकी दिली जात आहे. ती क्लासमध्ये गेली नाही किंवा तिने बायकॉट ठेवला तर तिची स्थानिक लोकांकडून छेड काढली जाईल. इतकेच नव्हे तर स्थानिक लोक तिच्यावर बलात्कार देखील करतील.
- हॉस्टेलमध्ये जेवण मिळत आहे. मिळणार्या धमकीमुळे परराज्यातून आलेल्या विद्यार्थिंनींना प्रचंड भीती वाटत आहे.
पोलिस प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेवून....
- सीआरपीएफच्या दोन तुकड्या एनआयटी कॅम्पसमध्ये तैनात आहेत. कॅम्पसमध्ये पोलिस दिसत नसले तर ते प्रत्येक हलचालींवर लक्ष ठेवून आहेत.
- एनआयटी कॅम्पसमध्ये नेहमी काश्मीरी व बिगर काश्मीर विद्यार्थ्यांमध्ये वाद होत असतात. परिणामी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
- एनआयटी प्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये काश्मिरी आणि इतर राज्यातील असा भेद करता येणार नाही, सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संरक्षण देण्यात येत आहे, जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण?
नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये टीम इंडियाच्या वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवानंतर काही काश्मीरी विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी झेंडे दाखवत देशविरोधी घोषणाबाजी केली होती. या घटनेवरुन दोन गटात वाद झाला होता. यानंतर एनआयटी प्रशासनाने होस्टेल आणि क्लास बंद ठेवले होते.
प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये तिरंगा फडकावून राष्ट्रगीत गाऊन या घटनेचा विरोध केला.
लाठीजार्चनंतर बिघडली परिस्थिती...
-जम्मू-काश्मीर पोलिसांनी आपल्याला अमानुष लाठीचार्ज केल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. हे सर्व विद्यार्थी परराज्यांतील आहेत.
- संस्थेत शिकणारे काश्मिरी विद्यार्थी आणि परराज्यातील विद्यार्थी यांच्यात वादविवाद झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे.
- या प्रकारानंतर एनआयटी श्रीनगर चर्चेत आले आहे. घटनेनंतर कॅम्पसमध्ये सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे.
दोषींवर कारवाईचे मेहबूबा मुफ्तींचे अाश्वासन...
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्याशी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा अाढावा घेतला होता.
- दोषी विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मेहबूबा मुफ्ती यांनी दिले आहे.
'चोरांना सोडून संन्याशाला अटक', प्रशासनाच्या भूमिकेवर विद्यार्थी संतप्त
'चोरांना सोडून संन्याशाला अटक'
- जयपूरमधील राहाणार्या एका विद्यार्थ्यांने सांगितले की, वेस्टइंडीजने टीम इंडियाचा पराभव केला. नंतर एनआयटीच्या कॅम्पसमध्ये काही विद्यार्थ्यानी जल्लोष केला होता. एक एप्रिलला पाकिस्तानी झेंडे दाखवले होते. याला काही विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकावून विरोध केला.
- एनआयटीमध्ये 65 ते 70 टक्के विद्यार्थी जम्मू-काश्मीरबाहेरून येतात.
- एनआयटीचे डायरेक्टर प्रा.रजत गुप्ता यांनी याप्रकरणी 'चोरांना सोडून संन्याशाला अटक' अशी भूमिका घेतली. तिरंगा फडकावणार्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली.
- पोलिस मंगळवारी कॅम्पसमध्ये आले व त्यांनी तिरंगा फडकावणार्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.
- पाकिस्तानी झेंडे दाखवणारे व देशविरोधी घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
परराज्यातील काश्मीरी विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी
- कॉलेज प्रशासनाने परराज्यातील विद्यार्थ्यांना नापास करण्याची धमकी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना घरी जाण्यासही परवानगी दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रंचड दहशत पसरली आहे.
- याशिवाय विद्यार्थ्यांना काही स्थानिक संघटनांकडूनही धमक्या मिळत आहे.
- एनआयटीमध्ये जवळपास दोन हजार विद्यार्थी आहेत. 25 ते 30 टक्के जम्मू-काश्मीरमधील असून 70 टक्के विद्यार्थी इतर राज्यातील आहे.
- राजस्थानातील 400 विद्यार्थी असून यात 30 विद्यार्थिंनीचा समावेश आहे.
...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment