Total Pageviews

Friday 8 April 2016

भारतात सुमारे आठ कोटी बांगला देशी मुसलमानांनी घुसखोरी केलेली आहे. त्यापैकी सुमारे तेरा लाख देशाच्या राजधानीत, दिल्लीत घुसलेले आहेत. प्रत्येकाकडे शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र व आधार कार्ड हटकून आहेच आहे. 'एकगठ्ठा मतदार' म्हणून काँग्रेसने या घुसखोरीला उत्तेजन दिले. 'आप' तर त्यापुढे एक पाऊल जाऊन दिल्लीतल्या 13 लाख 'गोपालां'चे पालक बनले आहेत.

दिल्लीच्या दंतवैद्याचा दुर्दैवी अंत 1 ***पराग नेरूरकर*** या घटनेच्या निमित्ताने बांगला देशी घुसखोर मुसलमानांचा व पर्यायाने देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अंदाजानुसार भारतात सुमारे आठ कोटी बांगला देशी मुसलमानांनी घुसखोरी केलेली आहे. त्यापैकी सुमारे तेरा लाख देशाच्या राजधानीत, दिल्लीत घुसलेले आहेत. प्रत्येकाकडे शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र व आधार कार्ड हटकून आहेच आहे. 'एकगठ्ठा मतदार' म्हणून काँग्रेसने या घुसखोरीला उत्तेजन दिले. 'आप' तर त्यापुढे एक पाऊल जाऊन दिल्लीतल्या 13 लाख 'गोपालां'चे पालक बनले आहेत. बुधवारी टी-20 सामन्यात भारताने बांगला देशचा पराभव केला. सारे भारतवासी खुशीत होते. पश्चिम दिल्लीतील विकासपुरी भागातील दंतवैद्य डॉ. पंकज नारंगदेखील अत्यंत आनंदाने आपल्या 7 वर्षांच्या मुलाबरोबर बाल्कनीत खेळत होते. खेळता खेळता, घरासमोरून स्कूटरवरून जाणाऱ्या चालकाला चुकून चेंडू लागला. डॉक्टरांनी चालकाची माफी मागितली. स्कूटरस्वार निघून गेला, पण त्याचा 'राग' मात्र निघून गेला नव्हता... काही वेळाने स्कूटरस्वार दहा-बारा जणांचा घोळका घेऊन आला. त्यांनी डॉक्टर नारंगना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मध्ये पडणाऱ्या शेजाऱ्यांनादेखील चोप दिला. आपल्या परिवारासमोर रक्तबंबाळ डॉक्टरांचा करुण अंत झाला. प्रकरण खुनाचे असल्यामुळे दिल्ली पोलीस यंत्रणा हादरली. पाच संशयित ताब्यात घेतले गेले. त्यात एक महिलादेखील होती. सारे संशयित शांतताप्रिय समुदायाचे असल्याचे कळल्यावर सोशन मीडियावर संतापाचा आगडोंब उसळला. शेजाऱ्यांनी हे सर्व संशयित 'बांगला देशी' घुसखोर असल्याचे ठामपणे सांगितल्यावर मात्र अवघा देश भीतीने थरारला. याच दरम्यान रजेवर असलेल्या दिल्लीच्या पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांनी बारा संशयित ताब्यात घेतले गेले असून त्यातील चार हिंदू असल्याचे 'ट्वीट' केले. अर्थात उरलेले आठ जण 'शांतिदूत'. या ट्वीटचा पर्दाफाश मात्र डोळे विस्फारणारा आहे. या कर्तव्यदक्ष उपायुक्तांचा बोलविता - खरे म्हणजे 'टिवटिवणारा' - धनी कोण? हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. मुळात संशयित ताब्यात घेतले गेले होते पाचच. मुख्य आरोपी नासीर खान. वय वर्षे 22. मासेविक्रीचा व्यवसाय. शाळा सोडल्यानंतर वडिलांचा व्यवसाय नासीरने पुढे चालू ठेवला. सोसायटीतीली सीसीटीव्हीतील चित्रणात दिसते, त्याप्रमाणे नासीरला प्रोत्साहन देणारी महिला नासीरची आई मेसर असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. एखाद्या व्यक्तीला ठार मारण्यास आई आपल्या मुलाला प्रोत्साहन देऊ शकते, हे आपल्या विचारशक्तीच्या पलीकडले 'तत्त्वज्ञान' आहे. अमीर खान. वय वर्षे 20. हा नासीरचा धाकटा भाऊ असून वडिलांना व भावाला तो व्यवसायात मदत करतो. व्यवसायाप्रमाणेच भावाच्या अपमानाचा बदला घेण्यातही त्याने मदत केली व सध्या पोलीसकोठडीत आहे. आमीर खान. वय वर्षे 21. शाळा सोडल्यावर तसा बेकारच. अधूनमधून इलेक्टि्रक रिक्षा चालवितो. हा नासीरचा मित्र. आमीर 'मित्रप्रेमाला' जागला व डॉक्टर नारंगाच्या मृत्यूला 'मैत्रिपूर्ण' मदत केली. दोघे मित्र सध्या तुरुंगात एकत्र मैत्री निभावतायत. शेवटचा संशयित 'गोपाल'. हा गोपाल 21 वर्षांचा असून रिक्षाचालक आहे आणि हो, तो नुसता चालक नाही, तर 'चालाक'देखील आहे. कारण तो नासीरचा 'मेव्हणा'देखील आहे. चरकलात ना? नासीरचा मेव्हणा 'गोपाल'.. घरवापसी झालीय का याची? 'ह्यो गं ह्यो गं पाव्हणा, नासिरचा मेव्हणा... काहीतरी घोटाळा दिसतोय रं...' हो, खरेच घोटाळा होता. मोनिकाबाईंनी झाकले म्हणून उजाडायचे थोडेच थांबणार आहे? पोलीसी खाक्या दाखविल्याबरोबर 'गोपाल'चा 'नसीम' झाला. व्याघ्रकपट गळून पडले. विकासपुरीच्या स्थानिक रहिवाशांनी या भागातील बांगला देशी मुसलमान घुसखोर व रिक्षाचालक अत्यंत मुजोर असल्याचे सांगितले. ही मुजोरी कोणाच्या जिवावर? तर दिल्लीचे मुख्यमंत्री आमच्या पाठीशी कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभे राहतात या विश्वासावर! अर्थात, निर्भयाच्या 'मासूम' अल्पवयीन बलात्काऱ्याला शिवणयंत्र व रोख दहा हजार रुपये देऊन केजरीवालनी तो विश्वास सार्थ ठरविला आहे. आता तुम्ही विचाराल, एका राज्याचा पूर्ण दर्जा नसलेल्या मुख्यमंत्र्याला एवढी हिम्मत कोठून आली? गेल्या काही दिवसांतील दोन बातम्यांची जर संगती आपल्याला लावता आली, तर केजरीवालांचा 'हिम्मतवाला' कोण? याचा उलगडा आपोआप होईल. लंडनच्या मादाम तुसाँ या जगप्रसिध्द संग्रहालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेणाचा पुतळा बसविण्याची तयारी सुरू झाल्याचे वृत्त आले. पाठोपाठ केवळ आठवडयाभरात केजरीवालांचाही मेणाचा पुतळा तेथे बसविण्यात येणार असल्याची बातमी आली. दुसऱ्या बातमीत जगप्रसिध्द 'फोर्ब्स'च्या जगातील पन्नास प्रसिध्द व्यक्तींच्या यादीत भारतातील 'जगप्रसिध्द व्यक्तिमत्त्व' म्हणून फक्त आणि फक्त अरविंद केजरीवालांचे नाव आहे. 'गोपाल'च्या माजाचा साज आला लक्षात? तर या बनावट 'गोपाल'चे पितळ उघडे पडले आणि मोनिका ते ममता सगळयांची बोलती बंद झाली. सोशल मीडियावर बाटग्या 'गोपाल'चे 'नासीम' सत्य वणव्यासारखे पसरले. अर्थात, यानिमित्ताने बांगला देशी घुसखोर मुसलमानांचा व पर्यायाने देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. अंदाजानुसार भारतात सुमारे आठ कोटी बांगला देशी मुसलमानांनी घुसखोरी केलेली आहे. त्यापैकी सुमारे तेरा लाख देशाच्या राजधानीत, दिल्लीत घुसलेले आहेत. प्रत्येकाकडे शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र व आधार कार्ड हटकून आहेच आहे. 'एकगठ्ठा मतदार' म्हणून काँग्रेसने या घुसखोरीला उत्तेजन दिले. 'आप' तर त्यापुढे एक पाऊल जाऊन दिल्लीतल्या 13 लाख 'गोपालां'चे पालक बनले आहेत. पूर्वी शंकरपूर भागात वसलेले हे घुसखोर, ती बकाल वस्ती उठविल्यावर सरकारने पुनर्वसनाच्या नावाखाली दिलेल्या पक्क्या घरांचे मालक बनले आहेत. नवीन घुसखोरांच्या बकाल वस्त्या नव्याने वसत आहेत. या वस्त्या दिल्ली पोलिसांसाठी 'नो गो एरिया' बनल्या आहेत. भारताच्या मुळावर उठलेल्या इस्लामी आतंकवाद्यांसाठी या 'नो गो वस्त्या' 'स्लीपर सेल्स'च्या दृष्टीने नंदनवन ठरत आहेत. या वस्त्यांच्या आजूबाजूला राहणारा हिंदू समाज सतत भयकंपित स्थितीत वावरत असतो. डॉ. पंकज नारंगांच्या हत्येने तर त्याच्या भीतीवर शिक्कामोर्तबच झाले आहे. बांगला देशी मुसलमान घुसखोरांना शोधून काढून त्यांची 'घरवापसी' करण्याचे प्रचंड आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. तरी बरे, दिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. नाहीतर 'माकडाच्या हाती कोलीत' असा भयानक प्रकार झाला असता. एक गोष्ट मात्र खरी. सोशल मीडियामुळे डॉ. नारंगांच्या हत्येला वाचा फुटली व गोपालमधला छुपा नसीम बाहेर आला. नाहीतर दिल्लीच्या दंतवैद्याची दुर्दैवी हत्या एक दंतकथाच बनून काळाच्या उदरात गडप झाली असती

No comments:

Post a Comment