Total Pageviews

Friday, 15 April 2016

हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही

कसे होणार हिंदूंचे? Saturday, April 16th, 2016 हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही. पठाणकोटच्या हल्ल्याचा बदला घेऊ असे एक विधान संरक्षण मंत्र्यांनी केले. तो बदला घेण्याचा दिवस जसा उजाडणार नाही तशी हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणी ठोकणार नाही. हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल! कसे होणार हिंदूंचे? कोणीही उठतो आणि हिंदुस्थानच्या कानफटात मारतो असे नेहमीच घडताना दिसत आहे. हिंदुस्थानातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा ‘इसिस’ने पुन्हा केली आहे. हिंदू लोकांसह इस्लाम न मानणार्‍या लोकांचा खात्मा करू, संपूर्ण हिंदुस्थानात शरीयत कायदा लागू करू असे या मंडळींनी सीरियात बसून जाहीर केले आहे. हिंदूंना खतम करण्याची भाषा यापूर्वी अल कायदा, तोयबासारख्या अतिरेकी संघटनांनी अनेकदा केली आहे. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे व हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा राहणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही. राममंदिरप्रश्‍नी भाजपने अलगद आपल्या काखा वर केल्या आहेत. येथील स्वत:स हिंदुत्ववादी मानणारे पुढारी अधूनमधून गर्जना करीत असतात, पण इसिससारख्या संघटनांशी मुकाबला करण्याच्या बाबतीत सगळ्यांच्याच मिश्या खाली पडत असतात. नागपुरात कन्हैयाकुमारच्या गाडीवर दोन दगड मारल्याने हिंदुत्व मजबूत होण्याऐवजी कन्हैयासारख्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळत आहे व ते हिंदुत्वासाठी बरे नाही. हिंदूंना मारण्याची भाषा जेव्हा केली जाते तेव्हा येथील हिंदुत्ववादी राज्यकर्ते कानात बोळे व तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन बसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ‘इसिस’ किंवा अन्य दहशतवादी संघटनांनी अशा प्रकारची धमकी येथील मुसलमानांच्या बाबतीत वा अन्य धर्मीयांच्या बाबतीत दिली असती तर एव्हाना सरकारातील बडे लोक छातीची ढाल करून त्यांच्या रक्षणासाठी उभे राहिले असते. मुसलमानांच्या वा ख्रिश्‍चनांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा गर्जना सरकारी पातळीवर झाल्या असत्या व अल्पसंख्याक म्हणून या लोकांच्या सुरक्षेसाठी चिंतामय उसासे टाकण्याची राष्ट्रीय स्पर्धाच लागली असती. पहा ना, कश्मीरातील हिंदू पंडितांचे जे शिरकाण गेली पंचवीसेक वर्षे सुरू आहे तो तरी काय प्रकार आहे? तिथेही पद्धतशीरपणे हिंदूंचा खात्माच झाला आहे व जे हिंदू पंडित वाचले आहेत ते आपल्याच देशात निर्वासिताचे जिणे जगत आहेत. आश्‍चर्य असे की, जे लोक कालपर्यंत हिंदू पंडितांची चिंता वाहण्याचे राजकारण करीत होते ते आज स्वत: कश्मीरात सत्तेत आहेत व ज्यांनी हिंदूंना पळवून लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशा लोकांबरोबर सत्तेची हातमिळवणी झाली आहे, पण तिथे आजही हिंदूंना प्रवेश नाही व हिंदूंनी पुन्हा परत यावे यासाठी विशेष प्रयत्न नाहीत. या देशात हिंदू असणे हा जणू अपराधच झाला आहे व हिंदू राज्यकर्तेच हिंदू समाजाचे सगळ्यात मोठे दुश्मन बनले आहेत. सत्तेने माणूस आंधळा होतो, पण इथे तर सत्तेमुळे डोळ्यांंच्या साफ खाचा होऊन बुबुळेच बाहेर पडली आहेत. म्हणूनच स्वराज्यातील हिंदूंची दुर्दशा व असुरक्षित जगणे राज्यकर्त्यांना दिसत नाही. हिंदूंना आपल्याच हिंदुस्थानात खतम करण्याची भाषा होत असताना हिंदूंच्या सुरक्षेबाबत एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही. पठाणकोटच्या हल्ल्याचा बदला घेऊ असे एक विधान संरक्षण मंत्र्यांनी केले. तो बदला घेण्याचा दिवस जसा उजाडणार नाही तशी हिंदू रक्षणाची आरोळीही कधी कोणी ठोकणार नाही. हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे राहावे लागेल! - See more at: http://www.saamana.com/sampadkiya/kase-honar-hindunche#sthash.pRRAfF7M.dpuf

No comments:

Post a Comment