Total Pageviews

Friday 29 April 2016

चला तुम्हाला मिनी पाकिस्तानमध्ये घेऊन जातो! -तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम-Canvassing in ‘mini-Pakistan’ of Kolkata Maleeha Hamid Siddiqui

चला तुम्हाला मिनी पाकिस्तानमध्ये घेऊन जातो! चला तुम्हाला मिनी पाकिस्तानमध्ये घेऊन जातो’, अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी येथील गार्डन रिच परिसराची ओळख करून दिल्याने वाद निर्माण झाला आहे. फिरहाद हकीम यांच्या या वक्तव्याचा परिणाम प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. फिरहाद हकीम स्वतः कोलकाता पोर्ट भागातून उमेदवार आहेत. पाकिस्तानमधील वृत्तपत्र ‘द डॉन’ची पत्रकार मलिहा हमीद सिद्दीकी गार्डन रिच परिसरात प्रचारसभेत सहभागी झाली होती. यावेळी मंत्री फिरहाद हकीम यांनी गार्डन रिच परिसराची ओळख ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून करून दिली. त्यांचे हे वक्तव्य डॉन वृत्तपत्राने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. त्यानंतर पाकिस्तान्यांनी हकीम यांच्या वक्तव्यावर आनंद व्यक्त केला तसेच या वक्तव्याला फेसबुकवर लाखो लोकांनी पसंतही केले. भारतात मात्र, आता हकीम यांच्या या वक्तव्यावर वादाला सुरूवात झाली आहे. भाजपने फिरहाद हकीम यांच्यावर टीका केली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, फिरहाद हकीम यांनी या मुद्यावर कोणतेही स्पष्टीकरण देणार नसल्याचे म्हटले आहे. Canvassing in ‘mini-Pakistan’ of Kolkata Maleeha Hamid Siddiqui — U : “Please come along and let us take you to mini-Pakistan in Kolkata,” says Bobby Firhad Hakim, MLA candidate of the incumbent party in West Bengal, All India Trinamool Congress, which is on its last leg of its canvassing and voters decide the party’s fate in the phase-wise West Bengal assembly elections scheduled to be held on April 30 and May 5. While traversing the dusty, uneven roads in one segment of his constituency, Garden Reach, also the residence of the last king of Awadh, Nawab Wajid Ali Shah, where he spent the last 30 years of his life, I am astonished by the lack of a cavalcade of vehicles that often accompanies ministers and low-level officials back home. Despite being a minister, only one vehicle follows Firhad’s car. His car halts as a procession of party activists holding party flags walk by chanting slogans in favour of Trinamool Congress leader and West Bengal Chief Minister Mamata “Didi” Banerjee. Upon seeing Bobby, the leading sloganeer starts to chant loudly: “Firhad Hakim zindabad, zindabad, zindabad (Long live Firhad Hakim). Pani ka mas’ala hal karnaywala, Firhad Hakim, Firhad Hakim (The one who has solved our water issues: Firhad Hakim, Firhad Hakim).” Others raise their hands and acknowledge him; sitting in his car Firhad, joins his hands in a namaste or waves at them. “There were no women in this rally?” I ask him. “No, Muslim women don’t come in such rallies,” he answers. Soon he descends from his car and is immediately surrounded by party workers and his security personnel. Clad in spotless white kurta and pajama and wearing joggers, Firhad is ready for door-to-door canvassing on a sultry day. This time I see women in Trinamool-print saris and am told they are Hindu and have no qualms in participating alongside men in campaigning. Earlier sitting in his lounge at his home on Peary Mohan Roy Road, Firhad sells his election rhetoric to me by listing all the works carried out by his party in the last five years. Associated first with the Congress party, Firhad has been in politics for 34 years working his way up to the ministerial level and said to be a key member of Didi’s cabinet. I comment on his fluency in Urdu, which he speaks with a Bihari inflection, and he insists he is Bengali-speaking. “But you speak very good Urdu for a Bengali,” I persist with my query. Fessing up he divulges his forefathers were Bihari. “My paternal grandfather came from Gaya Zila in Bihar, settled in Calcutta and set up his business. My father Abdul Hakim was a law officer in the Calcutta Dock Labour Board. My mother was an assistant headmistress in Maulana Hasrat Mohani Girls High School. Her parents belonged to Faridpur, Bangladesh.” Popularly known as Bobby Firhad, a nickname his father bestowed on him after the Australian cricketer Bobby Simpson, “I wasn’t named after Dimple Kapadia!” he remarks referring to the one-time Bollywood heartthrob’s debut film Bobby, eliciting laughter in the room. His entry into politics came due to his keen interest in the socio-economic issues in his area, as he became the go-to man for everyone. Firhad was eventually elected as a local councillor, a position he held for 15 years. Then he became a member of the West Bengal legislative assembly and is currently the minister for urban development and municipal affairs. We begin walking in the squelchy narrow lanes of the neighbourhood that feel further constricted as more people join in and my ears start ringing with deafening sloganeering. With a fixed smile on his face, Firhad waves and gives candies to children. Banyan- and dhoti-clad scrawny men, children pouring water on themselves from water-filled buckets outside their flimsy homes, litter-heavy sewerage lines, young girls in black hijabs, men pumping water from hand pumps and bathing themselves on the lanes, kite-makers in their miniscule workshops, women gathered on rooftops of unpainted buildings, are some of the sights one observes. Nearly all posters and graffiti on the walls are pasted and scrawled in Urdu: “Firhad Hakim (Bobby) ko kaseer votoun say kaamyaab karain”, “Urs Ghareeb Nawaz: Aap tamaam hazraat say guzarish hai is urs muqaddas main hazir ho kar hazrat Khwaja Gharib Nawaz kay fuyooz say malaan houn”, “Ishtihaar lagana mana hai”. Firhad is right … This does feel like mini-Pakistan. Exhausted with sweat pouring down my body, I straggle behind the crowd till I am no longer able to keep pace. Seeing me loitering around with my notebook in hand the men in the neighbourhood want to know what TV channel I work for. When I tell them I am from Pakistan, they break into broad smiles and tell me of their relatives who live back home. I amble along the narrow lanes till I come upon a wide lane where a small stage is set up festooned with marigold and jasmine strings and poster of Didi and Bobby. Rows of green plastic chairs are placed on one side of the lane. The crowd waits for Firhad to complete his canvassing and address them from this stage. In the meantime, a local group stages a natak or drama cantering around Trinamool’s achievements इसिस‘च्या भारतातील भरतीचा म्होरक्या सीरियात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात नुकताच मारला गेला. त्यामुळे "इसिस‘मध्ये भारतातून होणारी तरुणांची भरती आणि त्यामुळे भारतापुढे असलेले आव्हान हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. "इसिस‘ने भारतात प्रवेश केला आहे काय? त्याचे स्वरूप काय आहे? जगात चर्चेचा विषय बनलेल्या या दहशतवादी संघटनेपासून देशाला धोका आहे काय? इसिसला रोखण्यासाठी काय करावयास हवे, या प्रश्नां ची राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू आहे. अलीकडेच "इंटेलिजन्स ब्यूरो‘ व राष्ट्रीय अन्वेषण संघटनेने (एनआयए) कर्नाटकातील भटकळच्या इस्माईल मुसाफ रऊफ अहमदला पुणे विमानतळावर अटक केली. पुण्याहून दुबईमार्गे सीरियाला जाऊन तो "इसिस‘मध्ये सामील होणार होता, असे सांगण्यात येते. देशातून पलायन करण्यासाठी बंगळूर वा अन्य विमानतळांपेक्षा पुणे जास्त सुरक्षित असल्याचे त्याने जबानीत सांगितले. यापूर्वी एक फेब्रुवारी रोजी "एनआयए‘ने भोपाळमध्ये अजहर इकबाल या "इसिस‘ला पाठिंबा देणाऱ्या 24 वर्षांच्या युवकाला अटक केली. जानेवारीत संयुक्त अरब अमिरातीने धाडलेल्या व "इसिस‘ला सहानुभूती असलेल्या तीन भारतीयांना "एनआयए‘ने अटक केली. त्यात महाराष्ट्रातील महंमद फरहान, कर्नाटकाचा अदनान हसन व जम्मू-काश्मी्रचा शेख अजहर इस्लाम यांचा समावेश आहे. या तीन घटनांतून एक गोष्ट स्पष्ट होते, भारतातील मुस्लिम तरुणांचे मन वळविण्यात "इसिस‘ला यश मिळत आहे. आजवर अशा सुमारे 16 युवकांना "एनआयए‘ने अटक केली असून, "इसिस‘च्या सोशल नेटवर्कवरील आवाहनांनी सुमारे दीडशे मुस्लिम युवकांना जाळ्यात ओढले आहे. त्यांचे "ब्रेनवॉश‘ करण्यात आले आहे. "इसिस‘ने भारतात चंचुप्रवेश केला असला, तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ""तिला वेळेत रोखले नाही, तर देशापुढे दहशतवादाचा अधिकाधिक धोका निर्माण होईल,‘‘ असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीच्या एका उच्चाधिकाऱ्याने सांगितले. या युवकांचे दोन हेतू होते. दुबई व तुर्कस्तानमागे सीरियात जाऊन "इसिस‘चे सैनिक बनणे व दुसरा हेतू म्हणजे तेथून शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेऊन परतल्यावर भारतात दहशतवादी हल्ले करणे. भारतात वर्षानुवर्षे "जैशे महंमद‘ व "लष्करे तैयबा‘ या संघटनांचे अतिरेकी पाठवून हल्ले घडवून आणणाऱ्या पाकिस्तानच्या "आयएसआय‘ला व लष्कराला अशा युवकांचा आयता पुरवठा होईल. गेल्या काही महिन्यांत "इसिस‘च्या सीरियामधील राका या राजधानीवर व पलमैरा या ऐतिहासिक शहरावर अमेरिका व रशियाने हवाई हल्ले केले. तसेच सीरियन सैन्याचेही हल्ले होत असल्याने 27 मार्च रोजी "इसिस‘च्या ताब्यातून पलमैरा मुक्त झाले. होम्स व ऍलेप्पो भागात जोरदार लढाई सुरू असून, लटाकिया हा रशियाचा नौदल तळ असल्याने "इसिस‘ तेथे फारसे काही करू शकलेली नाही. सीरियातून "इसिस‘ची पीछेहाट होईल, तसे युरोपातील त्यांचे हल्ले वाढतील. त्याची अलीकडील उदाहरणे म्हणजे पॅरिस व ब्रुसेल्समधील हल्ले. "इसिस‘ आस्तेआस्ते दक्षिण आशियात प्रभाव वाढविण्याच्या प्रयत्नात असून, दक्षिण आशिया हे "सॉफ्ट टार्गेट‘ मानले जाते. बांगलादेश, मालदीव, पाकिस्तान व काश्मीटरमधील अतिरेक्यांतशी सोशल नेटवर्कद्वारे संपर्क साधला जातो. विशेष म्हणजे भारतात अटक झालेले सारे युवक शहरी आहेत. ते शिकलेले आहेत. त्यांना अवाच्या सव्वा आमिषे दाखविली जात आहेत. त्यावर सुरक्षा संघटनांना बारकाईने नजर ठेवावी लागणार आहे. गेल्या काही वर्षांत दहशतवादी हल्ल्यांचे दोन प्रकार समोर आले आहेत. पहिला योजनाबद्ध संघटित हल्ला, तर दुसरा एकट्या दहशवाद्याकडून होणारा (लोन वुल्फ) हल्ला. भारतात होणारे हल्ले पहिल्या प्रकारात मोडतात. अमेरिका व युरोपात होणारे हल्ले पहिल्या व दुसऱ्या या दोन्ही प्रकारात मोडतात. "वॉशिंग्टन पोस्ट‘ व "टाइम्स मॅप डॉट कॉम‘नुसार "इसिस‘ला इ. स. 750 व्या शतकातील इस्लामचे साम्राज्य स्थापन करायचे असून, "इसिस‘चा म्होरक्याॉ अबू बकर बगदादीने त्याचा नकाशाही तयार केला आहे. अण्वस्त्र मिळविण्याचे प्रयत्न त्यांनी चालविले आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. "इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स‘च्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, ""इसिसच्या संदर्भातील या जागतिक चित्राकडे पाहता, भारत स्वतःच्याच कोशात राहू शकेल काय?‘‘ सुदैवाची बाब म्हणजे दहशतवादी संघटनांना देवबंद, नदवा, फिरंगी महाल या मुस्लिम धर्मोपदेशक संस्थांनी केलेला जाहीर विरोध. आपली मुले "इसिस‘च्या कह्यात जाऊ नये, म्हणून त्यांच्या पालकांना खबरदारी घ्यावी लागेल, तसेच ती भरकटू नयेत, म्हणून सरकारला त्यांना योग्य उपजीविकेचा मार्गही उपलब्ध करून द्यावा लागेल.

No comments:

Post a Comment