http://suryahopes.in/
उत्तराखंड मदतकार्य- भारतीय लष्कराने सुरु केली वेबसाईट
उत्तराखंडमध्ये युद्धपातळीवर कार्य करणा-या भारतीय लष्कराने मदतकार्याची माहिती देणारी वेबसाईट सुरु केली आहे.
नवी दिल्ली- उत्तराखंडमध्ये अडकलेल्या हजारो नागरिकांना वाचवणा-या आणि अद्यापही युद्धपातळीवर कार्य करणा-या भारतीय लष्कराने मदतकार्याची माहिती देणारी वेबसाईट सुरु केली आहे. http://suryahopes.in/ या वेबसाईटवर भारतीय लष्कराच्या मार्फत सुरु असलेल्या मदत कार्याची माहिती देण्यात आली आहे. ही माहिती वेळोवेळी अपडेट केली जात आहे.
त्याच बरोबर भारतीय लष्कराकडून ज्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले आहे त्यांची नावे या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या वेबसाईटवरील find your loved one या विभागात उत्तराखंडमध्ये अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेता येईल.
महत्त्वाचे फोन नंबर, विभागवार सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आलेल्या व्यक्तींची नावे, जखमी व्यक्तींची नावे आदी तपशील या वेबसाईटवर देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment