Total Pageviews

Sunday, 1 January 2012

LIBERATION OF GOA

http://hemantmahajan12153.globalmarathi.com/5448234319986534800

गोवा सुवर्ण महोत्सवी मुक्तिदिन : भविष्यकाळात गोव्यासमोर वेगळीच समस्या
१९६१च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१चे युद्ध हा गोवा मुक्ती प्रक्रियेचा शेवटचा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त निर्णायक भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.

गोवामुक्तीसाठी झालेल्या दीर्घ लढय़ानंतर अखेर भारत सरकारने केलेली लष्करी कारवाई यशस्वी ठरली आणि १९ डिसेंबर १९६१ रोजी अखेर पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीने गोवा- दीव- दमणमध्ये गुडघे टेकले! मुक्तीच्या आधी गोव्याने काय गमावले होते आणि नंतरच्या वाटचालीत काय कमावले ? २५ नोव्हेंबर १५१० रोजी पोर्तुगीजांनी गोव्याच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हापासून गोमंतकीय जनतेचे जे नष्टचर्य सुरू झाले ते तब्बल साडेचारशे वर्षांनंतर १९ डिसेंबर १९६१ रोजी संपले.गोव्याला कुठे न्यायचे स्वप्न आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी, समाजधुरिणांनी पन्नास वर्षांपूर्वी पाहिले होते आणि गोवा आज कुठे येऊन ठेपला आहे, याचा लेखाजोखा मांडायला गेले तर निराशेचे कृष्णमेघ मनावर दाटल्यावाचून राहात नाहीत. १९६१ साली गोव्याने मुक्त श्वास घेतला .गोव्याची सर्वांगीण उभारणी करण्याचा अजोड प्रयत्न मुक्तीनंतरच्या पहिल्या दशकातच झाला.
साम्राज्य विस्ताराबरोबर धर्मप्रसार हाही पोर्तुगीजांचा मुख्य उद्देश होता. जबरदस्तीने लोकांचे धर्मातर करण्यात आले. मंदिरे पाडण्यात आली ख्रिस्ती सोडून सर्व लोकांचे नागरिकत्वाचे अधिकार काढून घेण्यात आले. १९१०मध्ये पोर्तुगाल प्रजासत्ताक झाल्यानंतर काही काळ थोडासा सुखावह होता; परंतु १९३२ मध्ये सालाझार नावाची व्यक्ती प्रधानमंत्रीपदावर आल्यानंतर पुन्हा एकदा दडपशाहीला सुरुवात झाली.

No comments:

Post a Comment