कुर्ल्याचा रियाज भटकळचा गोवंडीचा साथीदार अफताब उस्मानी हा सध्या गुजरात बॉम्बस्फोटप्रकरणी साबरमती तुरुंगात खितपत पडला आहे. एकेकाळी खंडणीसाठी मुंबई शहरात प्रचंड अंदाधुंद गोळीबार करणारा अफजल नावाचा हा गँगस्टर आता एक खतरनाक इस्लामी अतिरेकी झाला आहे. त्याला नियमितपणे भेटायला जाणार्या व एकमेकांचे निरोप पोचविणार्या अफजलच्या फैज नावाच्या भावाकडून मुंबईतील १३ जुलैच्या बॉम्बस्फोटाचे काही धागेदोरे सापडतात काय म्हणून मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्यांनी फैजला चौकशीसाठी चेंबूर कार्यालयात बोलविले. परंतु अगोदरपासून रक्तदाबाच्या विकाराने त्रस्त असलेल्या मध्यमवयीन फैजला मेंदू विकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले. याचा सारा फटका आता एटीएस व क्राइम ब्रँचच्या तपास अधिकार्यांना बसला आहे. काही मशिदीतून पोलिसांना कोणतेही सहकार्य करू नका, चौकशीसाठी बोलविले तर जाऊ नका, असे खुलेआमपणे फैज याच्या मृत्यूनंतर सांगण्यात आल्याचे नमाज पढण्यासाठी गेलेल्या नमाजींनी पोलिसांना सांगितल्यामुळे तर तपास अधिकारी पूर्णपणे थंडावले आहेत. पुराव्याशिवाय बोलावू नका, त्यांना हात लावू नका, तपास रखडला, अतिरेकी सापडले नाहीत तरी चालतील; परंतु अल्पसंख्याकांना चौकशीसाठी बोलावून त्यांची नाराजी ओढवून घेऊ नका. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला मार खायचा नाही असे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी मुंबई पोलिसांना दरडावून सांगितले आहे. त्यामुळे १३ जुलै बॉम्बस्फोटाचा तपास ठप्प झाला आहे. राज्यकर्त्यांनाच आज बॉम्बस्फोटात ठार झालेल्या, गंभीर जखमी होऊन आयुष्यातून उठलेल्या निरपराध्यांबद्दल कळवळा नाही. त्यांना अतिरेकी लवकर पकडले जावेत असे वाटत नाही. निरपराधांना न्याय द्यावासा वाटत नाही. मग तपास अधिकारी तरी कशाला आपला जीव धोक्यात घालून तपास करतील? संशयितांना चौकशीसाठी बोलावून वादाच्या भोवर्यात का सापडतील?आपल्या शेजारील पाकिस्तान नावाच्या शत्रूराष्ट्रात शांतता नाही. त्याची फळं आपल्या देशवासीयांना भोगावी लागत आहेत. इस्लामच्या नावाखाली मुस्लिम तरुणांना भडकविले जात आहे. मुळात पाकिस्तानला आपल्या देशातील मुसलमानांबद्दल काडीचेही प्रेम नाही. धर्माशीही त्यांचं देणंघेणं नाही. आज पाकिस्तानात रोज बॉम्बस्फोट घडविले जात आहेत. रोज वांशिक वादातून हत्या केल्या जात आहेत. गेल्याच आठवड्यात इस्लामाबादच्या क्वेट्टा शहरात कट्टरपंथीय सुन्नींकडून १८ शियापंथीयांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा खरा अड्डा आहे. हिंदुस्थानातील दहशतवादाला पाकिस्तानचेच खतपाणी आहे. पाकिस्तानात जोपर्यंत शांतता नांदणार नाही तोपर्यंत हिंदुस्थानी नागरिक सुखाने जगणार नाहीत. धर्मासाठी काम केले, ‘जिहाद’ पुकारला तर स्वर्गात चांगले स्थान मिळेल, अय्याशी जीवन जगता येईल अशी खोटी आश्वासने देऊन मुस्लिम तरुणांना बॉम्बस्फोट घडविण्यास सांगितले जाते. आत्मघातकी हल्ला करावयास लावला जातो, परंतु अशा घातपाती कारवायांनी आतापर्यंत कोणताही धर्म संपलेला नाही. मुंबईसह देशभरातून बॉम्बस्फोट मालिका घडवून हिंदू धर्म नष्ट होणार नाही. हिटलरने सारी ज्यू जमात नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, विडा उचलला होता. पण काय झाले? ज्यू टिकले आणि वाढले, मात्र हिटलर स्वत:च संपला. मग दहशतीच्या जोरावर हिंदूंना संपविण्याचे मनसुबे तरी कसे पूर्ण होतील? हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या भरकटलेल्या लोकांकडून तरी ते शक्य नाही. या देशाने व जगाने यापूर्वीही दहशतींचे टोक पाहिले आहे. मध्ययुगातील नादीरशहा, तैमुरलंग हे स्वत:ला सम्राट समजायचे. घ् स् ूप एूूा. मी म्हणजे राज्य असे समजून या राज्यकर्त्यांनी प्रजेला अनंत यातना दिल्या. दहशतीच्या जोरावर राज्य केले. दहशतवादाचे प्रणेते हिटलर, स्टॅलीन, मुसोलिनी हे तर नरराक्षस होते. त्यांच्या पाशवी, सैतानी, क्रूर कृत्यांनी जग हादरले होते. युरोपला भयभीत केले होते. दहशतवाद हे युद्ध नव्हे, गनिमीकावाही म्हणता येणार नाही, तर ही एक विकृती आहे. विकृतीमधूनच आता कुठेही गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट, हिंसाचार घडवून मुलांचा, महिलांचा बळी घेतला जात आहे. त्यात इस्लामच्या नावाने दहशत निर्माण करणारे बॉम्बस्फोटात मुसलमानांचेही बळी घेत आहेत. ओसामा बिन लादेन हा विकृत होता. त्या विकृतीमधूनच त्याने जगभरात आपली पिलावळ तयार केली. ती पिलावळच निरपराधांचे बळी घेत आहे. अखेर हेच अतिरेकी बॉम्बस्फोट करून करून थकतात आणि मग शरणागती पत्करतात. कुणीतरी धर्माच्या नावावर आपला वापर करून घेत आहे हे लक्षात आल्यावर, पैसे संपल्यावर, खाण्यापिण्याचे हाल झाल्यावर त्या अतिरेक्यांना सुबुद्धी सुचते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जात, धर्म, पंथ, वंश यांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्यानेच कट्टरपंथी तयार होत आहेत आणि हे रोखणे आता कुणाच्याच हातात राहिलेले नाही
No comments:
Post a Comment