दोन पोलिस कर्मचारी जखमी, सभेवरुन परतणार्यांचा हैदोस
अकोला,
सीएए आणि एनआरसी विरोधात आज अकोला क्रिकेट क्लब मैदानावर झालेल्या तहफ्फुजे कानुने शरीअत कमिटी या मुस्लिम समाजाच्या संघटनेच्या सभेनंतर घराकडे परत जाणार्या जमावाने मदनलाल धिंग्रा चौकात ट्रफिक कर्मचार्यांसाठी लावलेल्या बुथवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत एका महिला पोलिस कर्मचार्याच्या डोळ्यास दूखापत झाली आहे. तर दूसर्या एका दगडफेकीत मुख्यालयात तैनात पोलिस कर्मचारी उमेश यादव याला पायाला दगड लागला असून तो जखमी आहे. गांधी रोडवर उभ्या असलेल्या गाड्यांना समाजकंटकांनी लक्ष केले. समाजकंटकांद्वारे काही ऑटोमध्ये बसलेल्या महिलांसोबत छेडछाड करण्यात आली असून ही अत्यंत लाजीरवाणी बाब अकोल्यात आंदोलनानंतर झाली.
अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित सभेनंतर घराकडे जाणार्या मुस्लिमांनी काही ठिकाणी दगडफेक करत कायदा आणि सुव्यवस्था बाधित आणली. दरम्यान, या दगडफेकी बसस्थानक चौकात उभ्या असलेल्या प्रमोद धर्माळे यांना लाठीने मारहाण केली. तर बसस्थानक चौकात उभ्या असलेल्या सुधीर शर्मा या ऑटोचालकाच्या ( एमएच 30 बीसी 1089) ऑटोवर दगडफेक करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात ऑटोचालकांचे नुकसान झाले. तर वझे फोटो स्टुडिओचे मालक सारंग वझे यांच्या वॅगन आर (एमएच 37 ए 29) या वाहनावर सर्वच बाजूने दगडफेक करत ते फोडण्यात आले. त्यांच्या वाहनावर लक्ष करत ते फोडण्यात आले. त्याच बरोबर आर्य समाज मंदिरात लग्नसाठी आलेल्या वर्हाड्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. यात (एमएच 30 एझेड 7816 ) आणि अजून एका वाहनाची तोडफोड झाली. तर बसस्थानक परिसरात राहूल कानडे या ऑटोचालकाच्या वाहनातील महिलांची छेडछाड करण्यात आली तर त्याचा ऑटो क्रमांक एमएच 30 बीसी 1844 याची तोडफोड करण्यात आली. महिलांची छेडछाड करण्याची लाजीरवाणी बाब अकोल्यात आंदोलनकर्त्यांनी का केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. संवेदनशील अकोला शहरात हिंदू समाजाने शांतता पाळली असून या घटनांनी समाज मनात तीव्र संताप आहे. दरम्यान, पोलिसांनी या पैकी काही घटनांचे चित्रीकरण केले असून बस स्थानक ते गांधी चौक मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासणे सुरु केले आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा (सिटीझन अमेंटमेंट अॅक्ट अर्थात सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणीवर (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन-एनआरसी) बहिष्कार टाकण्यासाठी आज क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तहफ्फुजे कानुने शरीअत कमिटीने या जाहिर सभेचे आयोजन केले होते. त्यानंतर अकोल्यात ही तोडफोड झाली. या आयोजन समितीत मुफ्ती -ए-बराब मौलाना अब्दुल रशिद रजिवी कारंजवी, मौलवी सफदर खान कासमी,मुफ्ती अशफाक कासमी, हाफिज मकसूद, मौलाना शाहनवाज खान, हाजी मुदाम, साजिद खान पठाण, रफिक सिद्धीकी, जावेद जकारीया, नकिर खान,मोईन खान, शेख अजीज सिकंदर यांचा समावेश होता. दरम्यान, सिटी कोतवाली पोलिसात गाड्या, ऑटो फोडणार्या समाजकंटाकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेतले असून सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे
No comments:
Post a Comment