Total Pageviews

Wednesday, 12 August 2015

सैन्यात चला!-HOW TO JOIN INDIAN ARMY

सैन्यात चला! पदवीनंतर भारतीय सैन्यदलात (भूदल/नौदल/वायुदल) अधिकारी बनण्यासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सी.डी.एस.) देणं हा उत्तम पर्याय आहे. ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. या एकाच परीक्षेतून तिन्ही सैन्यदलाच्या चार वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्थांसाठी निवड केली जाते. संस्था १)इंडियन मिलिटरी अॅकॅडमी, डेहराडून (एकूण जागा- २००) यासाठी अविवाहित पुरुष उमेदवार पात्र ठरतात. वयोमर्यादा १९ ते २४ वर्षं. शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर ३२ जागा एन.सी.सी. 'सी' प्रमाणपत्र धारकांसाठी (आर्मी विंग) राखीव आहेत. प्रशिक्षण कालावधी दीड वर्षं. २) इंडियन नेव्हल अॅकॅडमी, इझ‌िमाला, केरळ (एकूण जागा- ४५ ) यासाठी अविवाहित पुरुष उमेदवार पात्र ठरतात. वयोमर्यादा १९ ते २२ वर्षं. शैक्षणिक पात्रता - बी.ई. (इंजिनीअरिंग पदवीधर) (एन.सी.सी. 'सी' प्रमाणपत्र (नेव्हल विंग) उमेदवारांसाठी ६ जागा राखीव आहेत. यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा २४ वर्षे आहे. तसंच बी.एस्सी.(भौतिकशास्त्र/गणित) चे विद्यार्थीसुद्धा पात्र असतात.) ३) एअरफोर्स अकॅडमी, हैद्राबाद (एकूण जागा- ३२) यासाठी अविवाहित पुरुष उमेदवार पात्र ठरतात. वयोमर्यादा २० ते २४ वर्षं. शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर (१२ वीला भौतिकशास्त्र व गणित असणं आवश्यक) किंवा बी.ई. (इंजिनीअरिंग पदवीधर) ४) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नई (एकूण जागा- १७५) (शॉर्ट सर्व्हिस कमिशन - पुरुष.) यासाठी विवाहित/ अविवाहित पुरुष पात्र ठरतात. वयोमर्यादा १९ ते २५ वर्षं. शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर ५) ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नई ( एकूण जागा - ११) (शॉर्ट सर्व्हिस कमिशन - महिला.) यासाठी अविवाहित महिला पात्र ठरतात. वयोमर्यादा १९ ते २५ वर्षं. शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर निवड प्रक्रिया लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. लेखी परीक्षा लेखी परीक्षेचं स्वरुप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतं. इंग्रजी, जनरल नॉलेज आणि एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स या विषयांवर प्रत्येकी १०० गुणांचे तीन पेपर्स असतात. प्रत्येक विषयासाठी २ तास कालावधी असतो. गणित विषयाचा अभ्यासक्रम दहावीच्या स्तराचा असतो. इतर विषयांचा स्तर पदवीस्तराचा असतो. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नईमधील प्रवेशासाठी गणित विषयाचा पेपर द्यावा लागत नाही. मुलाखत लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडलं जातं. यामध्ये इंटेलिजन्स व पर्सनॅलिटी टेस्टचा समावेश असतो. ग्रूप टेस्टमध्ये ग्रूप डिस्कशन, ग्रूप प्लॅनिंग, आऊटडोअर ग्रूप टास्क तसंच एखादा विषय देऊन त्यावर बोलायला सांगितलं जातं. मुलाखतीनंतर यशस्वी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. अर्ज कसा कराल? या परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन अर्जच स्वीकारण्यात येतील. ऑनलाईन अर्ज www.upsconline.nic.in या वेबसाइट वरुन भरता येतील. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत - १४ ऑगस्ट २०१५ परीक्षा दिनांक - १ नोव्हेंबर २०१५. परीक्षेबाबतील सविस्तर माहितीसाठी www.upsc.gov.in ही वेबसाइट पहावी

No comments:

Post a Comment