Total Pageviews

Wednesday, 12 August 2015

CHINESE ECONOMY IN DOLDRUMS M TIMES EDITORIAL

रयशक्तीच्या निकषानुसार चीनचे चलन युआन हे जवळपास ३७.५ टक्के अधोमूल्यित असतानाही 'पीपल्स बँक ऑफ चायना'ने जवळपास दोन टक्क्यांनी अवमूल्यन केल्याने जगभरातील अर्थकारणावर प्रभाव पडला असून राजकीयदृष्ट्या आश्चर्याचा धक्काही बसला आहे. त्यानुसार भारतातही रुपया आणि डॉलर यांच्यातील परिवर्तन दर बदलले आणि डॉलर अपेक्षेपेक्षा खूप चढा राहिला. यामागे तेथील औद्योगिक उत्पादनातील अपेक्षित वाढीच्या तुलनेत झालेली घट आणि आठ टक्क्यांपर्यंत खाली आलेला जागतिक निर्यातीचा दर त्याला प्रामुख्याने कारणीभूत असावेत. युआन हे चलन जगभरातील सर्वाधिक उलाढाल होणाऱ्या आठ चलनांपैकी एक आहे. त्यामुळे त्यातील इतक्या मोठ्या धक्क्याचे परिणाम होणारच होते. सलग दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात या चलनाचे अवमूल्यन झाल्याने आर्थिक मंदीच्या संशयाने भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, भारतातील आयटी आणि औषध कंपन्यांना वाढलेल्या डॉलरचा फायदा होईल. गेल्या तिमाहीत भारतातील अनेक आयटी आणि फार्मा कंपन्यांना झालेला फायदा हा त्याच कारणाने अधिक झाला होता. म्हणून त्याचे पडसाद इथल्या शेअर बाजारावर उमटलेले दिसले. चिनी आयात स्वस्त होईल, मात्र चालू शैक्षणिक वर्षात परदेशी, विशेषतः अमेरिका आणि युरोपीयन देशांत शिकायला चाललेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसेल. त्यांचे डॉलरच्या तुलनेत जमवलेले बजेट कोलमडणार आहे. कारण युआनच्या अवमूल्यनानंतर रुपया ०.८ टक्के उतरून डॉलरच्या तुलनेत जवळपास ६५ रुपयांपर्यंत पोचलेला आहे. चिनी युआनला सरकारने आपल्या नियंत्रणातून मुक्त करावे अशी मागणी पाश्चात्य, विशेषतः मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंध असलेल्या अमेरिकेकडून सातत्याने होत होती. त्याकडे, चीन गेली असंख्य वर्षे दुर्लक्ष करीत आहे. चिनी चलनाचे नेमके मूल्य बाजारपेठेने ठरविले पाहिजे आणि त्यासाठी या चलनाला बाजारपेठांत मोकळ्या प्रकारे वावरू द्यायला हवे, असा आंतरराष्ट्रीय आग्रह असला तरी चीनला सध्या तरी स्थानिक निर्यातदारांना दिलासा मिळावा आणि सतत मंदावत चाललेल्या अर्थकारणाला वेग मिळावा असे वाटते. तसे असले तरी तेथील डॉलरच्या माध्यमातून काम करणाऱ्या विमानसेवा व अन्य उद्योगांना त्याचा फटका बसणार आहे. या घटनेचे प्रत्यक्ष परिणाम कळायला काही दिवस जावे लागतील. चीनच्या जागतिक व्यापारविषयक भविष्यकालीन भूमिकेपासून चिनी आर्थिक विकासाच्या दाखल्याने देशात विकासाची स्वप्ने विकणाऱ्यांपर्यंत त्याचे परिणाम दिसणार आहेत. चीनची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत आहे, कदाचित ती इतकी खराब अवस्थेत आहे की ते कोणी जाहीर करू इच्छित नाही. कदाचित, ती तेथील बहुचर्चित आर्थिक धोरणांची पूर्वतयारी असू शकेल. चीनच्या खऱ्या खोट्या विकासाच्या आकड्यांची शपथ घेणारा एक मोठा वर्ग आपल्या देशात आहे. याआधीच्या यूपीए सरकारच्या काळात डॉलरच्या तुलनेत दररोज खालीवर होणाऱ्या दरांना घेऊन डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक समजावर संशय घेणारे आता डॉलर ६५ रुपयांपर्यंत गेल्यानंतर काय भूमिका घेतात, तेही पाहता येईल. दिलासा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक आपला प्रलंबित व्याजदर कपातीचा निर्णय आता घेऊ शकते

No comments:

Post a Comment