निव्रुत्त दहशतवादी अब्दुल करीम टुण्डाची अटक:
दहशतवादाविरुधच्या लढाइमध्ये एक छोटे पाउल
आपल्या देशात काय चालले आहे?काश्मीरमधील पूंछ या सीमावर्ती भागात पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार चालु आहे. भारताने शस्त्रसंधी तोडल्याचा आव आणून त्याचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानी संसदेमध्ये संमत झाला.१६ ऑगस्टला तब्बल १० वर्षांनंतर पाकिस्तानी सैन्याकडून कारगिल व द्रास भागामध्ये शस्त्रसंधीचा भंग केला.
अरुणाचल प्रदेशात 20 किलोमीटर घुसखोरी केलेल्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी पिटाळल्याची बाब एका "व्हिडिओ'द्वारे उघड झाली आहे. घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने २२ ऑगस्टला प्रसारित केले.अरुणाचल प्रदेशच्या चागलागाम भागात 13 ऑगस्टला घुसखोरी करून दोन दिवस मुक्काम केलेल्या चिनी सैनिकांची भारतीय जवानांनी मानगूट धरली. हे जवान सैन्याच्या आसाम रायफ़ल युनिटचे होते.सैन्याच्या मेजर हुद्याच्या अधिकार्यानी जे धैर्य दाखवले, ते आपले राजकिय नेते चिन बाबत का दाखवु शकत नाही?त्यांनी चिनी तुकडीतील सैनिकांना पकडले.मग चिनी सैनिकानी "सॉरी' म्हणत माघार घेतली.
गेली १० वर्षे ही भारतीय संरक्षण दलांसाठी वाया गेलेले दशक मानले जाते. लष्करासाठी, या काळामध्ये सर्व नवीन प्रस्ताव तयार होते. मात्र त्यावर निर्णय झाले नाहीत. आताही ‘आयएनएस सिंधुरक्षक’मध्ये झालेल्या स्फोटांनंतर तिने सागरतळ गाठला आहे.
पाणबुडय़ांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव ८४ सालापासून असून आजही आपण त्यांची नियुक्त संख्या गेल्या २९ वर्षांमध्ये गाठू शकलेलो नाही. कारण नवीन पाणबुडय़ा विकत घेण्याचा वेग अतिशय कमी असून , पाणबुडय़ा निवृत्त होण्याचा वेग अधिक आहे. नव्या पाणबुडय़ा दाखल होण्याचा वेग मोठय़ा प्रमाणावर वाढवावा लागेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे हे त्या मागचे एक कारण आहे. बाकी देशपातळीवर मोठे निर्णय घेणे थाबंले आहे. या घटना थेट देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी संबंधित होत्या.
१७ ऑगस्टला दाऊद इब्राहिम या कुख्यात गुंडाचा प्रमुख हस्तक आणि लष्कर-ए-तोयबासाठी काम करणारा म्होरक्या सय्यद अब्दुल करीम ऊर्फ टुण्डा याला भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली.करीम टुंडाच्या अटकेने दिल्ली पोलीस व इतर संस्थांना आनंदाच्या उकाळ्या फुटल्या आहेत. या टुंडाचा एक हात स्वत:च बॉम्ब बनविताना तुटला आहे. त्यामुळे त्याला ‘टुंडा’ असे उपनाम पडले आहे. याने गेल्या वीस वर्षांत मुंबई, दिल्लीसह देशातील वेगवेगळ्या शहरात ४० बॉम्बस्फोट घडवून जी दहशत माजवली आहे. या ला पकडण्यासाठी पोलिसांना वीस वर्षे लागली यास काय म्हणावे? त्याचे वय ७० वर्षे आहे, या टुंडाचा मुलगा अब्दुल वारिस हादेखील दहशतवादी कारवायांत गुंतलेला आहे. लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी म्हणून अब्दुल सध्या जम्मू-कश्मीरमध्ये कार्यरत आहे. ही माहिती टुंडानेच दिली आहे.
दहशतवादी हल्यातील आरोपीचा म्हातारपणाने म्रुत्यु
उत्तर प्रदेशातील जन्मलेल्या व आता सत्तरी ओलांडलेल्या बिनकामाच्या अब्दुल करीम टुंडा या निव्रुत्त दहशतवादीला पाकिस्तानने अत्यंत चलाखीने पुन्हा भारतात पाठविले आहे. पाकिस्तानने सतत २० वर्षे करीम टुंडाचा भारतविरोधात वापर करून घेतला आणि त्यास सौदी अरेबियात पाठवून त्याची भारतात रवानगी केली आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबईवरील हल्ल्यात सहभागी झालेल्या आबू जिंदालचीही तीच गत केली होती. अमेरिकेचा दबाव आल्यानंतर पाकिस्तान आपल्याकडील भारतिय अतिरेक्यांना युनायटेड अरब अमिरात म्हणजेच (यूएई) आखाती देशात पाठविते आणि त्यानंतर त्या अतिरेक्यांची रवानगी भारतात करते. अब्दुल टुंडा यास यूएई सरकारने नेपाळला पाठविले. तेथून त्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. आता टुंडा बरेच काही सागंतो आहे. परंतु त्याच्या वर किती विश्वास ठेवावा याचा विचार करावा लागणार आहे.त्यावर आता पुढचे १५-२० वर्षे खटला चालेल.आपल्याला आठवत असेल की १९९३ दहशतवादी हल्यातील आरोपीचा म्हातारपणाने म्रुत्यु झाला. यावेळेस पण शिक्षेपेक्षा म्हातारपणाने म्रुत्यु अपेक्षित आहे.
मुंबईमध्ये राहणारा डॉ. जलीस अन्सारी व अब्दुल टुंडा असे दोघे क्रूड बॉम्ब बनवू लागले आणि त्याचे बॉम्बस्फोट घडवू लागले. १९९४ सालच्या जानेवारी महिन्यात डॉ. जलीस अन्सारी पकडला गेला आणि मुंबईसह देशभरातील ५१ बॉम्बस्फोट मालिकांवर प्रकाश पडला.
डॉ. जलीस अन्सारी पकडला गेल्यानंतर अब्दुल टुंडाने भारत सोडला. त्याने पाकिस्तानात जाऊन आश्रय घेतला आणि आयएसआयच्या इशार्याने तो भारतात पुन्हा घातपाती कारवाया करू लागला. आयएसआयने गेेली २० वर्षे त्याचा पुरेपूर वापर करून घेतला आणि म्हातारा झाल्यावर त्याला पाकिस्तानातून हाकलले. असा एक अब्दुल टुंडा किंवा आबू जिंदाल हाती लागल्याने भारताचा काहीही फायदा होणार नाही. उलट त्याला पोसण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. पाकिस्तानात शेकडो अब्दुल टुंडा व दाऊदसारखे माफिया बसले आहेत. तेच आपला देश चालवीत आहेत आणि पोखरतही आहेत.
निव्रुत्ती’चा काळ तुरुंगात?
खतरनाक म्हणता येईल, अशा अब्दुल करीम ऊर्फ टुण्डा या ‘लष्कर ए तय्यबा’ या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला अटक करून भारतीय पोलिसांनी अतिरेकी कारवायांना आळा घालण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकल्याच्या आविर्भावात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे काहीच कारण नाही. गेली काही वर्षे हा टुण्डा संघटनेत सक्रिय नाही. या वयात येणाऱ्या आजारांशिवाय त्याला अन्य अनेक विकारांनी घेरले आहे. असा विकलांग टुण्डा हाती लागला, म्हणजे फार मोठे नाही.
उत्तर प्रदेशातील पिलखुआ या गावी असलेल्या टुण्डाच्या घरातील सगळय़ा वस्तूंचा लिलाव स्थानिक पोलिसांनी २० वर्षांपूर्वीच केला होता. भारताला हव्या असलेल्या ५० अतिरेक्यांची जी यादी पाकिस्तानला सादर करण्यात आली होती, त्यातही टुण्डाचे नाव होते. दहशतवादी संघटनांसाठी निधी उभा करण्यासाठी त्याने दाऊद इब्राहीमशी जवळचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे टुण्डाला अटक करून आपल्याला आणखी माहिती मिळू शकेल, असे वाटते आहे. परंतु गुन्हेगार निवृत्त झाल्यानंतर त्याला पकडणे आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील तपास करणे, हा काही शहाणपणाचा उद्योग नाही. भारतात घडलेल्या सुमारे ४० बॉम्बस्फोटांशी संबंधित असलेला हा टुण्डा गेली दोन दशके भारतीय पोलिसांना चकवा देत होता. वय वाढल्याने ,सतत पोलिसांचा ससेमिरा चुकवत आपले आजार सांभाळत जगणे हेही खरे म्हणजे जिकिरीचे असते. टुण्डाने निवृत्तीनंतरची सारी वर्षे सरकारी खर्चाने राहण्यासाठी ही अटक मान्य केली आहे. आजारांवर उत्तम उपचारही मिळतील आणि सरकारी खर्चाने जगणेही फारसे त्रासाचे होणार नाही.
आता मानवतावादी संघटना त्याला त्याच्या व यामुळे व्हीआयपी वागणुक द्यायला भाग पाडतिल. गेल्या २० वर्षांत भारतीय राजकारण्यांनी निवडणुकीतल्या आश्वासनात दाऊदला मुसक्या बांधून आणण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात काहीच घडले नाही. दहशतवाद मोडून काढण्यासाठी वेगवेगळय़ा पातळीवरील माहिती सतत गोळा करत राहावे लागते, तिचे विश्लेषण करावे लागते आणि अर्थही शोधावा लागतो. टुण्डाच्या अटकेने यातले काहीच आजपर्यंत हवे तसे झाले नाही, हेच स्पष्ट झाले आहे
टुंडाने दोन गोष्टी प्रामुख्याने सांगिले. पाकव्याप्त कश्मीरमध्ये बॉम्ब बनविण्याचे कारखाने आहेत व ते बॉम्ब भारतात फोडले जातात. तेथे दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे चालवली जातात व ते सर्व जेहादी भारतात घुसवले जातात. टुंडाने ही माहिती दिली . ती जुनीचआहे. दहशतवादी संघटना पाक मदतीने अशा पद्धतीने देशाला बेचिराख करण्यासाठी कारखाने सुरु ठेवत आहेत. अशा जेहादींचा खात्मा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पाकिस्तानला पोकळ इशारे देण्यात काहीच अर्थ नाही.
No comments:
Post a Comment