Total Pageviews

Saturday, 3 August 2013

MYANMAR MUSLIMS

<म्यानमारमधील मुस्लिम समाजावर विविध बंधनं-प्रा. अविनाश कोल्हे-नवशक्ती-०३/०८/२०१३ म्यानमार हा देश बुद्धीस्ट बहुसंख्य असलेला देश आहे. तेथे सत्तेची सर्व महत्वाची स्थानं बुद्धिस्टांच्या हाती आहे. असे असले तरी तेथे मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे. म्यानमारमधिल पश्चिम राखिन या प्रांतात तर मुस्लिम समाज बराच आहे. यामुळे तेथिल बुद्धिस्ट सत्ताधारी वर्गाला चिंता वाटायला लागली. यावर त्यांनी एक आगळाच उपाय काढला आहे.आपल्या देशातील अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या हा एक ज्वलंत विषय असतो. हिंदुत्ववादी अभ्यासक मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा नेहमी उपस्थित करत असतात. भारतात मुस्लिमांची संख्या वाढत आहे व लवकरच या देशात दुसरा पाकिस्तान निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात असते. या प्रचाराला मुस्लिम समाजातील प्रतिगामी शक्ती खतपाणी घालत असतात. `उनके पाच तो हमारे पच्चीस’ वगैरे घोषणा मुस्लिम समाजातील प्रतिगामी शक्ती सतत करत असतात. यामुळे हिंदुत्ववादी शक्तींच्या प्रचाराला धार चढते. अशा विषारी प्रचारामुळे आपल्या देशातील सामाजिक शांतता धोक्यात येत असते याचा कोणी विचार होत नाही. यामुळे इतर देशांत अल्पसंख्याक समाजाच्या लोकसंख्येची समस्या कशी हाताळतात हे जाणून घेणे उद्बोधक ठरू शकते. म्हणून आपला शेजारी देश म्यानमार हे कसे करतो हे समजून घेणे गरजेचे ठरते. म्यानमार हा देश बुद्धीस्ट बहुसंख्य असलेला देश आहे. तेथे सत्तेची सर्व महत्वाची स्थानं बुद्धिस्टांच्या हाती आहे. असे असले तरी तेथे मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय आहे. म्यानमारमधिल पश्चिम राखिन या प्रांतात तर मुस्लिम समाज बराच आहे. यामुळे तेथिल बुद्धिस्ट सत्ताधारी वर्गाला चिंता वाटायला लागली. यावर त्यांनी एक आगळाच उपाय काढला आहे. मे 2013 मध्ये पश्चिम राखिन प्रांतातील सरकारी अधिकारी वर्गाने असा नियम काढला की यापुढे त्या भागातील मुस्लिम समाजाने प्रत्येक कुटूंबात दोनपेक्षा जास्त मुलं होऊ द्यायची नाहीत. याद्वारे तेथील अधिकारी वर्गाची अशी अपेक्षा आहे की ते मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येला पायबंद घालू शकतील. अशाच प्रकारचा नियम मुस्लिम समाजातील बहुपत्नी प्रथेला आळा घालण्यासाठीही करण्याचा सरकार विचार करत आहे. सध्या दर कुटुंबामागे फक्त दोनच मुलं हा नियम पश्चिम राखिन प्रातांतील काही गावांनाच लागू करण्यात येत आहेत. जी गावं बांगलादेशच्या सीमेच्या जवळ आहेत त्या गावांना हा नियम लागू होईल. उदाहरणार्थ, बुथिडांग व मौंडाव या गावांत मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 95 टक्के आहे. जगात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही. म्यानमार सरकारला असे नियम करावे लागत आहेत यामागे काही गंभीर कारणं आहेत. गेले काही महिने तेथे मुस्लिम व बुद्धिस्ट यांच्यात दंगली सुरू आहेत. काही ठिकाणी खास करून जेथे मुस्लिम समाज बहुसंख्य आहे तेथे तर दंग्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. हे दंगे का वाढले आहेत याची चौकशी करण्यासाठी म्यानमार सरकारने एक आयोग नेमला होता. या आयोगाने दिलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की, ज्या भागात मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे तेथे दंगे होण्याची शक्यता जास्त असते. आपल्याकडेही ढोबळ मानाने हीच स्थिती आहे. भिवंडी, मालेगाव वगैरे महाराष्ट्रातील शहरांत मुसलमान समाज मोठय़ा प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील या गावांत हमखास दंगली होत असतात. आता म्यानमारमध्ये हाच अनुभव येत आहे. परिणामी चौकशी आयोगाने शिफारस केली की जर मुस्लिम समाजाची लोकसंख्या आटोक्यात ठेवायची असेल तर प्रत्येक कुटुंबात फक्त दोन मुलं असा नियम केला पाहिजे. त्यानुसार आता तेथे सरकारने नियम केला आहे. आयोगाच्या असेही लक्षात आले की काही भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या दहा पट वाढलेली आहे. याला लगाम घालण्यासाठी दुसरा संभाव्य उपाय म्हणजे मुस्लिम समाजात असलेली बहुपत्नीची रूढी. याला आळा घालण्यासाठीसुद्धा नियम करावा अशी आयोगाची शिफारस होती. येथे आपल्याला मुस्लिम समाजातील दुटप्पी वागण्याची चर्चा करावी लागते. बहुपत्नीचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. मुस्लिम पुरूषाला एकापेक्षा जास्त पत्नी करता येतात पण अपवादात्मक स्थितीत. हा प्रत्येक मुस्लिम पुरूषाचा अधिकार नाही. शिवाय ज्या स्थितीत ही चाल इस्लाममध्ये आली त्याचे संदर्भसुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. महंमद पैगंबर यांना इस्लामची स्थापना करतांना अनेक प्रसंगी लढाया कराव्या लागल्या. यात त्यांचे अनुयायी मारले जात. त्यांच्या विधवा बायकांना आधार मिळावा या हेतूने पैगंबरसाहेबांनी बहुपत्नी हा चाल सुरू केली. पण यासाठी अनेक कडक अटी घातल्या होत्या. जो पुरूष एकापेक्षा जास्त लग्न करेल त्याची आर्थिक स्थिती अतिशय चांगली असली पाहिजे. त्याला एकापेक्षा जास्त बायका पोसता आल्या पाहिजेत. पुरूषप्रधान संस्कृतीचा प्रभाव असलेल्या इस्लाममध्ये यथावकाश गैरप्रवृत्ती शिरल्या व प्रत्येक मुस्लिम पुरूष चार पत्नी करण्याचा आपला हक्क आहे, असे समजायला लागला. दुसरे म्हणजे अनेक मुस्लिम देशांनी या प्रथेला बंदी घातली आहे. जेथे मुस्लिम समाज अल्पसंख्याक असतो तेथे हा समाज कोणत्याही प्रकारच्या धार्मिक सुधारणा मान्य करत नाही. जर एखाद्या देशाने असा प्रयत्न केला तर लगेच `इस्लाम खतरेमें है’ अशी हाक देतात व त्या सरकारवर दबाव आणतात. भारतात स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली पण अजूनही समान नागरी कायद्याच्या दिशेने एकही पाऊल पडलेले नाही. म्यानमारमध्ये लष्करशाही असल्यामुळे तेथे दोन मुलं किंवा बहुपत्नीची चाल बंद करणे असे नियम सहज होऊ शकतात. भारतात लोकशाही असल्यामुळे येथे असे निर्णय सहसा होत नाहीत. यालाच काही अभ्यासक लोकशाहीच्या मर्यादा मानतात. या संदर्भातील आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लिम समाजाची मानसिकता. जगात दोन प्रकारचे मुस्लिम देश आहेत. एक म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्या दणदणीत असते असे देश. या वर्गात सौदी अरेबिया, इराक, इराण वगैरे देश मोडतात. अशा देशांची अधिकृत ओळख म्हणजे ते इस्लामिक देश असतात. उदाहरणार्थ पाकिस्तानचे कायदेशीर नाव आहे `इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’. अशा देशांचा बराचसा कारभार कुराणप्रमाणे चालतो. दुसरा प्रकार म्हणजे जेथे मुस्लिम समाज अल्पसंख्याक आहेत. श्रीलंका, भारत वगैरे देश या प्रकारात मोडतात. याखेरीज तिसरा प्रकार आहे ज्यात फक्त एकच देश आहे. हा प्रकार म्हणजे असा देश जेथे मुस्लिम समाज बहुसंख्य आहे पण इतर धार्मिक गटही लक्षणीय संख्येने आहेत. याचे एकमेव उदाहरण म्हणजे मलेशिया. तेथे मुस्लिम समाज सुमारे 55 टक्के आहेत तर चीनी समाज 30 टक्के आहे व इतर भारतीय आहेत. यामुळे सत्तेच्या जागी जरी मुस्लिम व्यक्ती दिसत असली तरी इतरांना सामावून घ्यावे लागते. असा प्रकार म्यानमारमध्ये नाही. तेथिल मुसलमान समाज अल्पसंख्याक आहे. पण जेथे या समाजाची लोकसंख्या एकवटली आहे तेथे दंगे व्हायला लागले आहेत. यावर उपाय म्हणून म्यानमारने आपल्या परीने उपाय सुरू केले आहेत. सध्या समोर आलेले उपाय याच प्रकारातील आहेत. याचा परिणाम काय होतो हे लवकरच कळेल

No comments:

Post a Comment