किश्तवाडमध्ये झालेली दंगल फ़ुटिरवाद्यांचे कारस्थन
काश्मीर खोर्यात ‘१९९0’ची पुनरावृत्ती ?
जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी घोषणा नेहमीच दिल्या जातात असे बिनदिक्कत सांगणार्या ओमर अब्दुल्ला यांच्या निषेध करावा तेवढा कमीच आहे. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये गेल्या शुक्रवारपासून उसळलेली दंगल आजतागायत शमलेली नाही. ही दंगल आता राज्याच्या आठ जिल्ह्यांत पसरली असून संचारबंदी, मोबाइल बंदी आणि लष्कर दाखल करण्यात आल्यानंतरही दंगल सुरूच राहते हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री यांच्या अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे.
किश्तवाड हिंसाचारावरून जम्मू-काश्मीरचे गृहराज्यमंत्री सज्जाद किचलू यांनी राजीनामा दिला .किचलूंवर दंगल भडकावल्याचा आरोप होता.आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.हिंसाचारात तीनजण ठार, ६८ दुकाने, सात हॉटेल आणि ३५ वाहने जाळली गेली.कश्मीरी पंडीताना खोर्यातून हद्दपार करण्याच्या २३ वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती होत आहे.
पद्धतशीर योजना आखून हजारो कश्मिरी पंडितांना यापूर्वीच राज्याबाहेर पळवून लावले गेले. शेकडो पंडितांची हत्या केली गेली. ‘तुमच्या मुलीबाळी आणि मालमत्ता इथेच सोडून चालते व्हा’, असे फर्मान सोडणारी पोस्टर्स कश्मिरी पंडितांच्या घरांवर चिटकवली गेली. अब्रूच्या भयाने कश्मिरी पंडित आपले सर्वस्व सोडून आज निर्वासितांच्या छावण्यांमध्ये विपन्नावस्थेत लाचारीचे जिणे जगत आहेत. सुमारे दोन लाख पंडितांपैकी केवळ आठशे कश्मिरी पंडितांची कुटुंबे तेथे उरली आहेत. कश्मिरी पंडितांना राज्यातून बेदखल केल्यानंतर आता जम्मू व आसपासच्या जिल्ह्यांतील हिंदूंना ‘टार्गेट’ करण्याचा कट कश्मिरी फ़ुटीरवाद्यानी आखलेला दिसतो.
गृहमंत्र्यांचे उत्तर
राज्य मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. १९९0ची पुनरावृत्ती होऊ न देण्याची ग्वाही देशाचे गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी संसदेत दिली.आम्ही जबरदस्तीचे पलायन आणि पुनर्वसन घडू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. १९९0मध्ये खोर्यातील काश्मिरी पंडितांना तेथून स्थलांतरण करण्यास भाग पाडले होते.पी. चिदंबरम यांनी राष्ट्रविरोधी घोषणांमुळेच दंगल भडकल्याचे मान्य केले.
जम्मू-काश्मीरमधल्या किश्तवाड शहरात हैदोस घालत हिंसाचार घडवणाऱ्या पाकिस्तानवादी-राष्ट्रद्रोहीना केंद्र सरकारने खंबीरपणे पकडायला हवे होते. किश्तवाड शहरात पाकिस्तान झिंदाबादच्या आणि भारताच्या विरोधी घोषणा देत, अल्पसंख्यांक हिंदूंच्या घरादारावर जमावाने चढवलेले हल्ले हे पूर्वनियोजित होते, अशी कबुली खुद्द मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीच दिली आहे, या कारस्थानामागे फ़ुटीरवाद्यांचा /पाकिस्तानचाच हात असावा, या संशयाला बळकटी येते.
पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने, जमावाला अधिकच चेव चढला आणि जम्मू भागातल्या अन्य जिल्ह्यातही दंगलींचा वणवा पेटला. सुरू झालेली दंगल पोलिसांच्याकडून आटोक्यात यायची शक्यता नसल्याची खात्री होताच, राज्य सरकारने तातडीने लष्कराला बोलवायला हवे होते. पण तब्बल आठ तासांनी किश्तवाडसह दंगलग्रस्त भागात लष्करी तुकड्या दाखल झाल्या आणि जवानांनी कडेकोट बंदोबस्त सुरू केल्यावरच दंगली आटोक्यात आल्या .
किश्तवाड दंगल
पाकिस्तान जिंदाबाद’, ‘हिंदुस्थान मुर्दाबाद’च्या घोषणा देत जम्मू पुन्हा एकदा पेटले . किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जमावाने अख्खे किश्तवाड शहर पेटवले. हिंदू व्यापार्यांची दुकाने पेटवण्यात आली. शेकडो घरे आणि हॉटेल्सही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
जमावाला भारतविरोधी घोषणा देत दंगल घडवायची चिथावणी देणारे काश्मीरच्या खोऱ्यात आहेत. जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडी आणि हुर्रियत परिषदेचे नेते काश्मीर खोऱ्यात वारंवार बंद घडवून, सामान्य जनतेला आपल्या दावणीला बांधायला सोकावले आहेत.त्यांचे हे सारे चाळे सरकार खपवून घेते आणि पिपल्स पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती याही दंगलखोरांचीच बाजू घेतात . सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करीत नाही.
जम्मू-काश्मीरच्याच पूंछ भागात सध्या पाकिस्तानी सैनिकांचा हैदोस सुरू आहे. शस्त्रसंधी आणि नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत पाक सैन्याने आपल्या जवानांवर हल्ले सुरू ठेवले आहेत. हे लक्षात घेता ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत अधिक सावध असायला हवे होते. किश्तवाडची दंगल खरेतर तेथेच निपटून काढायला हवी होती. किश्तवाडमध्ये दंगल उसळली त्या दिवशी किचलू त्याच शहरात होते. तरीही ही दंगल उसळली .
या राज्यामध्ये सुरक्षा जवानांच्या विरोधातली निदर्शने, निदर्शकांवर होणारा लाठीमार, गोळीबार आदी प्रकार सुरूच असतात. या वेळी दंगलखोरांनी पोलिसांची शत्रे चोरलेली आहेत. जम्मू भागात लोकांना अतिरेक्यांपासून स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी ग्राम सुरक्षा समिती स्थापलेल्या आहेत आणि या समितीच्या सदस्यांना बंदुका देण्यात आलेल्या आहेत. या बंदुका जुन्या बनावटीच्या म्हणजे पॉइंट ३०३च्या आहेत. परंतु किश्तवाडच्या दंगलीमध्ये जमावाने परस्परांवर गोळीबार केलेला आहे आणि त्यासाठी १२ बोअरच्या बंदुकीतून गोळ्या झाडलेल्या दिसत आहेत. याचा अर्थ ग्राम सुरक्षा समितीच्या आणि या चोरलेल्या बंदुकांचा वापर दंगल करणा-या जमावांनी केलेला आहे.
दंगल ही पूर्वनियोजित
रमजान ईदच्या दिवशी किश्तवाडमध्ये झालेली दंगल ही पूर्वनियोजित असण्याची शक्यता आहे असे उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. अब्दुल्ला म्हणाले, ''दंगलीच्या आदल्या दिवशी शस्त्रास्त्रांची एक दुकान लुटण्यात आले होते. त्यामुळे शक्यता आहे, की ही दंगल पूर्वनियोजित होते.
नियंत्रण रेषेवर घुसखोरी आणि गोळीबार करणार्या पाकिस्तानने आज जम्मू-कश्मीरमधील किश्तवाड येथील दंगलीच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले. किश्तवाड दंगलीतील हिंसा आणि हुर्रियत नेत्यांना झालेल्या अटकेबद्दल पाकिस्तानला चिंता वाटते आहे.किश्तवाडमधील दंगलीनंतर जातीय तणावाच्या अफवा पसरून जम्मू-कश्मीरातील वातावरण अधिक बिघडू नये यासाठी राज्य सरकारने इंटरनेट आणि मोबाईल फोन सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.मात्र उमर अब्दुल्ला ट्विटर सोशल मिडीया मधुन आपल्याला सोयिसकर अफ़वा मात्र पसरवत होते.
काय करावे
किश्तवाडमधील हिंदूंची घरेदारे पेटवून घडवलेल्या भीषण दंगलीचे लोण संपूर्ण जम्मू-ऊधमपुरमध्ये पसरले .दंगलीचा हा भडका संपूर्ण राज्यात पसरू लागल्यामुळे जम्मू, राजौरीसह एकंदर आठ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दंगलीमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई फ़ुटिर वाद्यांकडुन घेतली पाहीजे.
किश्तवारचा हिंसाचार हा केवळ एका भागातील हिंसाचार म्हणून पाहिला तर फार चिंतेचा विषय नाही. पण, पाच दिवसांत १६वेळा पाकिस्तानकडून संघर्षविरामाचे उल्लंघन होणे, चीनने सातत्याने कुरापती काढणे, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी भारतावर हल्ल्याच्या योजना लाहोरच्या मैदानात जाहीरपणे सांगितल्या जाणे, हे विषय एकत्रितपणे अभ्यासले, तर किश्तवार दंगल फार मोठ्या चिंतेचा हा विषय आहे. ही घटनांची मालिका स्थानिक पातळीवर ठरविली गेलेली नाही, याचाही यातून खुलासा व्हावा. किश्तवार हे संपूर्ण भारतावरचे संकट आहे. आपल्या सभोवताली होणार्या घडामोडींपासून सुद्धा आता सावध असले पाहिजे.
दंगल पीडितांना आवश्यक मदत मिळायला हवी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी. जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारने संयुक्तपणे काम करून त्वरित काबूत आणावी अन्यथा तेथील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर पुन्हा सुरू होण्याचा धोका आहे.
पाकिस्तानशी एकवेळ लढताही येईल. पण, आपल्या लोकशाही प्रणालीत शिरलेल्या पाक हस्तकांशी लढेणे सोपे नाही.काश्मीरची प्रगती होणे अथवा हा भूभाग शांत असणे पाकिस्तानला परवडणारे नाही ; म्हणूनच निमित्त मिळताच पाकिस्तानी घुसखोर खोऱ्यातील शांतीच्या दहशतवादाची आग लावून देतात. जम्मूतील हिंसाचार हाही त्याच कटाचा एक भाग आहे .
.
No comments:
Post a Comment