Total Pageviews

Thursday, 29 August 2013

YASIN BHATKAL INDIAN MUJAHIDIN MOST WANTED

SAKAL ARTICLE इंडियन मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा सदस्य यासीन भटकळ ऊर्फ मोहम्मद अहमद मोहम्मद झरार सिद्धिबापा याला आज (गुरूवार) सकाळी भारत-नेपाळ सीमेवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने अटक केली असून, यासीन भटकळ हा पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोटांमध्ये सहभागी होता. त्याच्याविषयी आणि स्फोटांविषयी 'सकाळ'ने तेव्हा घेतलेला आढावा... रियाझ, इक्बा्ल हे मुंबई प्रॉडक्ट "रियाज व इक्बाकल भटकळ हे मुंबई प्रॉडक्टस आहेत. दहशतवादाची भटकळमधील ही पहिली पिढी आहे. मंगळूरमध्येही इंडियन मुजाहिदीन सक्रिय असून, त्यांच्या वास्तव्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यांचा तसेच त्यांच्या काही साथीदारांचा शोध घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत,'' अशी माहिती कर्नाटकच्या पश्चिसम परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक गोपालस्वामी हुसूर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. "रियाज भटकळ नोव्हेंबर 2008 पर्यंत मंगळूरमध्ये होता. तेथे त्याचे महंमद अली या धर्मगुरूकडे सहा महिने वास्तव्य होते. त्याबाबतची माहिती मिळाल्यावर आम्ही छापा घातला. परंतु तत्पूर्वीच तो पळून गेला होता. त्या वेळी त्याचे पाच साथीदार पकडण्यात आम्हाला यश आले,'' असेही त्यांनी नमूद केले. रियाज भटकळ मंगळूरमध्ये असताना मुंबईच्या एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करीत होता. उलाला पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मोठा भूखंड विकसित करण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. त्यासाठी तो मंगळूर महापालिकेतही जात असे. भूखंडाच्या सपाटीकरणाचे बहुतेक काम पूर्ण झाले. त्याच दरम्यान मुंबईत स्फोट झाल्यावर तो पळून गेला, असेही त्यांनी नमूद केले. त्याची माहिती काढण्यासाठी इक्बाबलकडे पोलिस चौकशी करण्यासाठी गेले तेव्हा त्यानेही पलायन केल्याचे उघड झाले. भटकळ व मंगळूरमध्ये "सिमी' पूर्वी सक्रिय होती. सध्या या भागात पोलिस यंत्रणांचे खास लक्ष असल्यामुळे त्यांच्या कारवायांना प्रतिबंध बसला आहे. भटकळमध्ये जातीय तेढ आहे. एका बाजूला सधनता व दुसरीकडे गरिबी, अशी भटकळमध्ये परिस्थिती आहे. त्याशिवाय आखातातील देशांत असलेल्या युवकांचा गावात वावर आहे. मुंबईतही ते सक्रिय आहेत. त्यामुळे मोठ्या शहरांमधील गुंडगिरीही या गावात पसरली असल्याचे निरीक्षण गोपालस्वामी यांनी नोंदविले. मुंबई, पुणे, गुजरात पोलिस सतत संपर्कात असल्याचे त्यांनी नमूद केले. मंगळूरपासून जवळच असलेल्या उडपी या गावात प्रवीण पवार हे महाराष्ट्रीय अधिकारी अधीक्षक म्हणून नियुक्त आहेत. दहशतवादाचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा सहभाग होता. भटकळलाही त्यांनी अनेक वेळा भेट दिली आहे. ""भटकळच्या किनारपट्टीवर पूर्वी तस्करी होत असे. तेथील किनारपट्टीवर कोळी लोकांच्या जमिनी होती. त्यांची नंतर विक्री झाली व तेथे आलिशान बंगले उभारण्यात आले. आखाती देशांतून हे तरुण जेव्हा परततात तेव्हा या बंगल्यांमध्ये ते उतरतात,'' असे पवार यांनी सांगितले. या किनारपट्टी परिसरात कुख्यात गुंड छोटा शकीलचे काही हस्तक सक्रिय असावेत. भटकळमध्ये अमेरिकन बंगलाही प्रसिद्ध आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी अमेरिकन पद्धतीनुसार त्याचे बांधकाम झाल्यामुळे त्याला अमेरिकन बंगला म्हणतात. अगदी समुद्रकिनाऱ्यावर तो असल्यामुळे छोटी बोट बंगल्याच्या तळमजल्यावरही सहज पोचत असे. पुढे हा प्रकार लक्षात आल्यावर "सीबीआय', कर्नाटक पोलिस यांनी बंगला काही काळ सील केला होता. नंतर त्याच्या पुढे भराव उभारण्यात आला. या बंगल्यात रियाझ भटकळ व त्याच्या साथीदारांच्या बैठकी झाल्याचा पोलिसांचा दाट संशय आहे. (क्रमशः) शाहरुख ऊर्फ यासीन महंमद सैफ व महंमद खालिद हे दोघे मुंबईहून 26 ऑगस्ट 2008 ला मंगला एक्स्प्रे सने उडपी येथे आले. तेथे शाहरुख नावाच्या व्यक्तीने त्यांना एक पिशवी दिली. त्या पिशवीत स्फोटके होती. दिल्लीमधील बॉंबस्फोटासाठी ती वापरली गेली, असे पुढे त्या दोघांना पकडले गेल्यावर उघड झाले. त्याच तपासात शाहरुख म्हणजेच यासीन भटकळ होता, असेही निष्पन्न झाले आहे. याच यासीनने पुण्यातील स्फोटासाठी तसेच देशात अनेक ठिकाणी झालेल्या स्फोटांसाठी स्फोटके पुरविल्याचा संशय असल्याचे कर्नाटक पोलिसांनी सांगितले. यासीन भटकळ कोण? यासीन हा रियाझचा नातेवाईक असल्याचा पोलिसांचा संशय आहे. यासीन हाही भटकळ गावचाच आहे. 2007 मध्ये यासीनने केरळमध्ये जाऊन ई. टी. साईनुद्दीन याच्याकडून बॉंब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. दिल्लीत 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटासाठी यासीननेच बॉंब पुरविले असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यातील एका फ्लॅटमध्ये यासीन काही काळ राहत होता. तेथे तो बॉंब तयार करीत असे. यासीन हा पाकिस्तानात पळून गेल्याचा संशय आहे. ------------------------------------------------------ धागेदोरे पुण्यापासून भटकळपर्यंत... बॉंबस्फोटाच्या गुन्ह्याचा तपास करताना त्यातील स्थानिक साथ (लोकल हॅंड) एका पुणेकराची असल्याचे निष्पन्न झाले आहे. "इंडियन मुजाहिदीन'शी संबंधित असलेला हा पुणेकर म्हणजे मोहसीन चौधरी असून, अहमद सिद्दीबाप्पा झरार ऊर्फ शाहरुख ऊर्फ यासीन भटकळ याच्याशीही त्याचे संगनमत असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी पकडला गेलेला अब्दुल समद याचाच यासीन हा सख्खा मोठा भाऊ आहे. हा स्फोट घडवून आणण्यात स्थानिक सहभागही असावा, असा पोलिसांचा सुरवातीपासून कयास होता. मात्र, दीर्घकाळ तो निष्पन्न झाला नव्हता. मोहसीनवर संशय बळावला होता म्हणूनच रत्नाकर बॅंकेच्या नाना पेठ शाखेतील त्याच्याशी संबंधित 14 बॅंक खाती गोठविण्यात आली होती. ऑक्टोकबर 2008 पासून बेपत्ता झालेला मोहसीन जानेवारीमध्ये महाराष्ट्रातच असल्याचेही आता दिसून येत आहे. कारण, या स्फोटाचा कट उदगीरमध्ये रचला गेला. तेथे झालेल्या बैठकीत मोहसीन उपस्थित होता, अशी कबुली अटक केलेल्या हिमायत बेग व बिलाल यांनी पोलिसांकडे दिली आहे. जर्मन बेकरीतील फुटेजमध्ये सापडलेले छायाचित्र हे संशयित दहशतवाद्याचे होते. त्यावरून तपास करताना अब्दुल समदपर्यंत पोलिस पोचले. त्याला पकडल्यावर त्याचा सहभाग नव्हता, असे निष्पन्न झाले; परंतु त्याच्यासारखा दिसणारा त्याचा सख्खा मोठा भाऊ अहमद ऊर्फ यासीन भटकळ हाही या स्फोटाचा कट आखण्यात सहभागी असल्याचे तपासात आढळले आहे. मोहसीनचे कुटुंब मूळचे हैदराबादचे. त्याचे मामा येथील कौन्सिल हॉलमध्ये कामाला होते. उद्योग-व्यवसायासाठी हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे मोहसीनचे बालपण पुण्यात गेले. मोलेदिना हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यावर अठराव्या वर्षी एका बांधकाम व्यावसायिकाकडे शिपाई म्हणून सुरवातीच्या काळात त्याने काम केले. तेथे काम करताना त्याला मिळालेल्या क्वॉर्टरमध्ये "इंडियन मुजाहिदीन'चा संस्थापक इक्बा ल भटकळ हाही वास्तव्यास असे. नंतर चौधरी कुटुंब कोंढव्यात राहावयास गेले. तेथे "मुजाहिदीन'च्या दक्षिण विभागाचा प्रमुख रियाज भटकळ येत होता. कोंढव्यात अशोका म्यूजमध्ये दोन वर्षांपूर्वी "इंडियन मुजाहिदीन'चा तळ उद्‌ध्वस्त झाल्यावर मोहसीन बेपत्ता झाला होता. अहमदाबाद, मुंबई, दिल्ली आदी राज्यांतील स्फोट घडवून आणण्यात त्याचा सहभाग असल्याची पोलिसांकडे नोंद आहे. मोहसीनचा धाकटा भाऊ अकबर गुजरातमधील स्फोट प्रकरणी सध्या अहमदाबाद तुरुंगात आहे. अस्खलित मराठी भाषा बोलणाऱ्या मोहसीनचा इक्बारल, रियाज भटकळ यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाल्यावर दहशतवादी कारवायांकडे तो खेचला गेला व सध्या पाकिस्तानात पोचला आहे. तेथे "अलीसाहब' या नावाने त्याचे वास्तव्य असल्याचे दिल्लीत अटक करण्यात आलेल्या संशयिताने पोलिसांना सांगितले होते. रियाज व इक्बायलच्या माध्यमातूनच मोहसीनची अहमद झरार सिद्दीबाप्पा ऊर्फ यासीनशी ओळख झाली. यासीन हा मूळचा कर्नाटकमधील भटकळ गावातील रहिवासी. तेथील बंदर रस्त्यावर "झरार मंझिल' या बंगल्यावर अजूनही केंद्रीय तपास यंत्रणांचे लक्ष आहे. पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार कोणत्याही प्रकारची स्फोटके हाताळण्यात यासीनचा हातखंडा आहे. धर्मप्रचार व प्रसाराचा अभ्यासक्रमही त्याने पूर्ण केला आहे. काही काळ "अल्‌ कायदा'च्या हस्तकांशीही तो संपर्कात असल्याचे पोलिसांना आढळले आहे. अबुधाबी, दुबईमध्ये त्याने स्फोटकांचे प्रशिक्षण घेतले असून, सुरत, अहमदाबाद, बेंगळूरू व हैदराबादमधील स्फोटांत तो संशयित आहे. या पूर्वी स्फोट घडविताना कधी तो "शाहरुख', तर कधी "यासीन' या नावाने वावरत होता. उदगीरमध्येही मुक्काम... इक्बामल, रियाज भटकळ यांचा बालसवंगडी असलेला यासीन हा त्यांच्यामुळेच मोहसीनच्या संपर्कात आला. ही चौकडी एकत्र आल्यावर सुरवातीच्या काळात त्यांनी विविध प्रकारे जिहादी विचारांचा प्रसार करण्यास सुरवात केली. पुढे "लष्करे तैयबा'च्या संपर्कात आल्यावर दहशतवादी कारवायांत ते सक्रिय झाले. मोहसीनच्या मागावर पुणे पोलिस गेल्या तीन वर्षांपासून होते. गेल्या दोन वर्षांपासून तो भारताबाहेर असल्याचा संशय व्यक्त होत असतानाच तो उदगीरला येऊन गेला होता, हे उघड झाल्यावर अन्य पोलिस यंत्रणांनाही धक्का बसला आहे. ------------------------------------------------- शांत भासणारे भटकळ झाले अस्वस्थ भटकळ. उत्तर कन्नड जिल्ह्यात पुणे-मंगळूर रस्त्यावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले टुमदार गाव. दक्षिण भारतातील संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणाऱ्या गावातील दैनंदिन व्यवहार सध्या नेहमीप्रमाणेच सुरू आहेत. वरवर शांत भासणाऱ्या या गावातील लोकांच्या मनात मात्र अस्वस्थता थैमान घालत आहे. कारण.... इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा जन्म झालेले हे गाव सध्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहे. "द हब ऑफ टेररीझम' असा या गावाचा होणार उल्लेख येथील रहिवाशांना बोचत आहे. त्यांच्या मुलांना नोकरी, शिक्षण, व्हिसा, पासपोर्ट आदी अनेक कारणांसाठी त्यांचे गाव "भटकळ' याची अडचण होत आहे. या गावातील रहिवाशांशी "सकाळ'ने संवाद साधल्यावर भटकळचे अनेक पैलू उजेडात आले. समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या या गावात पूर्वीपासून चार वर्षांपर्यंत सोन्याची तस्करी होत असे, अशी पोलिसांकडे नोंद आहे. विस्तीर्ण किनारपट्टी असलेल्या या गावात "नवायत' मुस्लिमांचे प्राबल्य आहे. सातशे वर्षांपूर्वी पाश्चिीमात्य देशांतून व्यापारासाठी आलेल्यांनी स्थानिक महिलांशी विवाह केले. त्यातून नवायत उदयाला आले. कोकणी व उर्दू मिश्रित त्यांची भाषा असल्यामुळे मराठी भाषा जाणणारी व्यक्ती त्यांचे संभाषण समजू शकते. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे नवायतांमधील घरटी एखादी तरी व्यक्ती आखातातील दुबई, सौदी अरेबिया आदी देशांत नोकरी-व्यवसाय करीत आहे. त्यामुळे त्यांची सधनता दिसून येते. येथील त्यांच्या कुटुंबीयांकडे आलिशान मोटारी, आधुनिक मोटारसायकली असून, त्यांचे बंगलेही टुमदार आहेत. ज्या घरांतील व्यक्ती आखातात नसतील, त्या मुंबईत कार्यरत आहेत. मंगळूरमध्ये दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला आहे. त्यामुळे थेट आखातातून येथे येऊन सुटी घालविणे त्यांना शक्यर झाले आहे. आखातातील देशांतील संस्कृतीही काही प्रमाणात येथे दिसून येते. येथील बाजार पेठेतील "दुबई मार्केट' येथे प्रसिद्ध आहेत. स्प्रे, चॉकलेटपासून आखातात मिळणारी प्रत्येक वस्तू या बाजारपेठेत उपलब्ध आहे. या गावातील मदानी कॉलनी, मगदूम कॉलनी, नवायत कॉलनी, बंदर रोड, आझादनगर, सुलतान स्ट्रीट भागात नवायत मुस्लिमांचे प्राबल्य आहे. तर हनुमाननगर, मंडकोठी, आसरकेली, जाली रोडमध्ये हिंदूंचे प्राबल्य आहे. सुमारे 45 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात 1992 पासून जातीय दंगलीची पार्श्वाभूमी आहे. भाजपचे आमदार डॉ. चित्तरंजन, प्रमुख कार्यकर्ते तिमप्पा नायक, श्रीधर नाईक यांचे गेल्या पंधरा वर्षांत येथे खून झाले आहेत. चित्तरंजन, नायक यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा तपास अद्याप लागलेला नाही. मुस्लिम संघटना "तंजिम'बरोबरच येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्वा हिंदू परिषद, श्रीराम सेना या सक्रिय आहेत. उत्तर कर्नाटकमधील एक संवेदनशील गाव, अशी ओळख असलेल्या भटकळचे नाव राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले ते मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन वर्षांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या 15 जणांना अटक केली तेव्हा. पुण्यातील जर्मन बेकरीत स्फोट झाल्यानंतर तो याच संघटनेने केला असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. त्यानंतर या गावात आता पुणे पोलिस, महाराष्ट्र एटीएसबरोबरच दिल्ली, गुजरात, "एनआयए' यांचीही वर्दळ वाढली आहे. या संघटनेचा संस्थापक व म्होरक्याय रियाज व इक्बा ल शहाबांदरी ऊर्फ भटकळ हे अद्याप देशाबाहेर आहेत. त्यांना पकडण्यासाठी भारतीय पोलिस यंत्रणांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय भटकळमध्ये पूर्वी राहत असलेले व सध्या फरारी असलेले पाच-सहा जण अद्याप फरारी आहेत. या गावातील एक प्रमुख कार्यकर्ते इनायतुल्ला शहाबांदरी म्हणाले, ""भटकळमधील काही जण संशयित दहशतवादी असतील तर त्यांना पोलिसांनी पकडावे; परंतु गावाची बदनामी का करीत आहेत. येथील सर्व जण दहशतवादी नाहीत. प्रत्येक गावात कमी-जास्त प्रमाणात अनुचित घटना घडत असतातच. भटकळमध्येच सर्व घटना घडतात, असे नाही. रियाज, इक्बा ल यांचा जन्म या गावात झालेला नाही. त्यांची हयात मुंबईत गेली आहे. त्यांचे एक घर येथे आहे, इतकाच त्यांचा या गावाशी संबंध आहे. सरसकट सर्वांकडे संशयाच्या नजरेने पाहणे योग्य नाही.'' ""रियाज, इक्बा्ल यांचे आडनाव शहाबांदरी आहे. यासीनचे सिद्दीबाप्पा आहे. पण, पोलिस त्यांचे आडनाव भटकळ असल्याचे जाहीर करीत आहेत. त्यामुळे येथील युवकांना शिकताना पावलापावलावर अडचण उद्‌भवत आहे. गावातून बाहेर पडलेली व्यक्ती काय करते, त्याचा गावातील लोकांशी काही संबंध कसा काय जोडला जातो, त्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत,'' असे सांगत होते रिझवान गंगावली. गावाचे नाव टाळा भटकळ हे गावाचे नाव आहे. संबंधित संशयितांना त्यांच्या नावानेच संबोधिले गेले तर गावाची होणारी बदनामी टळेल. येथे राहणाऱ्या निरपराधांची अडवणूक थांबेल. ती थांबावी अशी अपेक्षा करतानाच संबंधित संशयित गुन्हेगार असतील तर त्यांना जरूर शिक्षा व्हावी; पण त्यांच्यामुळे गावाचे नाव बदनाम होऊ नये, अशी भावनाही अनेकांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसह देशभरातील अनेक बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी यासीन भटकळ याला भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली आहे. भटकळ हा पाकिस्तानातील कराचीत बसून दहशतवादी हल्यांचे कट रचत होता. त्याच्या अटकेने 'इंडियन मुजाहिदीन'वरच बॉम्ब पडला असून या संघटनेची पाळंमुळं उखडून टाकण्यात भारताला यश मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment