Total Pageviews

Monday, 19 August 2013

INS SINDHURAKSHAK

आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी - पाणबुडी निर्मिती क्षमता वाढवण्याची गरज रशियन बनावटीची आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीला १६/०८/२०१३ ला जलसमाधी मिळाली.सिंधुरक्षकला दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी तब्बल अडीच वर्षे रशियातील गोदीत पाठवण्यात आले होते. ४८० कोटी रुपये या आधुनिकीकरणावर खर्ची पडले,जे तिच्या मुळ किमतीपेक्षा दिडपट जास्त आहे. मुंबईच्या डॉकयार्डमध्ये उभ्या असलेल्या आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीत मंगळवारी मध्यरात्री तीन भयंकर स्फोट होऊन आगीचे तांडव घडले. या भीषण दुर्घटनेत पाणबुडीला समुद्रात जलसमाधी मिळाली. पाणबुडीवर असलेले नौदलाचे तीन अधिकारी व १५ जवानांचा अद्यापि शोध लागला नसून त्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे, तीन जवान मात्र सुखरूप बचावले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नौदलाच्या इतिहासात ही भयंकर दुर्घटना घडली. त्यामुळे स्वातंत्र्यदिन काळवंडून गेला आहे. मुम्बइच्या साऊथ ब्रेक वॉटर या गोदीत सिंधुरक्षक व सिंधुघोष पाणबुड्या बाजूबाजूला असताना ' सिंधुरक्षक ' मध्ये मध्यरात्री मोठी आग लागली.पाणबुड्यांमध्ये तळाला बॅटर्‍या आणि वरच्या भागात क्षेपणास्रे असतात. चार्जिंगच्या दरम्यान बॅटर्‍यांतून हायड्रोजन गॅस जमा होतो. हायड्रोजनने आग लागली असावी आणि ती टपावरील दारूगोळ्यांपर्यंत पोहोचल्याने भीषण स्फोट झाला असावा. प्रेशर हलमध्ये आग झपाट्याने पसरू लागली. पाणतीरांचा भाग पाण्याने भरला व नंतर ती पाण्याखाली गेली. आग भडकण्याचे कारण या घडीला माहिती नाही. कोणत्याही नौकेवर इंधन , दारुगोळा , प्राणवायूची नळकांडी , बॅटरीचे भाग अशा अनेक ज्वलनशील गोष्टी असतात व त्यापैकी कोणत्याही भागात बिघाड झाल्यास आग लागू शकते. मात्र आग लागल्यास मॅन्युअल व ऑटोमॅटिक दोन्ही पद्धतीच्या धोक्याच्या घंटा , निदर्शक असतात. ते का कार्यरत झाले नाहीत , याचा तपास करण्यात येईल. त्यासाठी काही फॉरेन्सिक पुरावे घेण्यात आले आहेत. सुरुवातीस छोटा स्फोट झाला व त्यानंतर मोठा स्फोट झाला. आगीमागील नेमके कारण समजू शकले नाही. मात्र झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून ही समिती चार आठवड्यांत आपला अहवाल देईल.स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी ही भीषण दुर्घटना घडल्याने यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. पण प्राथमिक चौकशीत तरी हा अपघातच असल्याचे स्पष्ट होत आहे. सिंधुरक्षकमध्ये मध्यरात्री १२ वा. पहिला स्फोट होताच पाणबुडीच्या वरील भागावर असलेल्या तीन जवानांनी पाण्यात उड्या घेतल्या. त्यानंतर काही क्षणातच दोन भीषण स्फोट झाले आणि आग लागली. त्यामुळे मिसाइल असलेल्या पुढील भागाला भोक पडले आणि पाणी आत घुसल्याने सिंधुरक्षक बुडाली. आयएनएस सिंधुरक्षक डिसेंबर १९९७ मध्ये नौदलात दाखल आयएनएस सिंधुरक्षक’ ही रशियन बनावटीची ‘किलो’ वर्गातील पाणबुडी रशियातील गोदीत तयार झाल्यानंतर डिसेंबर १९९७ मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली. ‘किलो’ या गटातील १४ पाणबुडय़ा भारताच्या ताफ्यात आहेत. डिझेलवर चालणाऱ्या या पाणबुडय़ा लढाऊ जहाजे आणि पाणबुडय़ाविरोधी मोहिमेसाठी वापरल्या जातात. त्याचबरोबर पाण्यातून जमिनीवर २०० किलोमीटपर्यंत मारा करतील अशी क्षेपणास्त्रे डागण्याचीही या पाणबुडीची क्षमता होती. या पाणबुडीची लांबी ७३ मीटर होती तर वजन २३०० मेट्रिक टन होते. समुद्रात ३०० मीटर खोल जाण्याची आणि ताशी १८ नॉट्स (सुमारे ३५ किलोमीटर) इतक्या वेगाने प्रवास करण्याची तिची क्षमता होती. एकदा इंधन भरले की ५२ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ४५ दिवस ही पाणबुडी समुद्रात फिरायची. एका दमात तब्बल ६४० किलोमीटरचा टप्पा पाण्याखालून गाठण्याची तिची क्षमता होती. यापूर्वी सिंधुरक्षक विशाखापट्टणम येथे असताना २०१० मध्ये तिच्यावर अपघात घडला होता. त्यावेळी बॅटरी विभागातील स्फोटामुळे एक कर्मचारी ठार तर दोघे जखमी झाले होते. यानंतर सिंधुरक्षकला दुरुस्ती आणि आधुनिकीकरणासाठी तब्बल अडीच वर्षे रशियातील गोदीत पाठवण्यात आले. त्याअंतर्गत या पाणबुडीत अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक शस्त्रास्त्र प्रक्षेपक यंत्रणा बसवण्यात आली. दूरसंचार यंत्रणाही अधिक सक्षम करण्यात आली. सुमारे ४८० कोटी रुपये या आधुनिकीकरणावर खर्ची पडले. त्यानंतर यावर्षी जानेवारी २०१३ मध्ये सिंधुरक्षक पुन्हा एकदा भारतीय नौदलात परतली आणि ३० एप्रिलला मुंबईत दाखल झाली. आधुनिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या पाणबुडीच्या वेगवेगळ्या चाचण्या यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या होत्या. जमीनीवरील आणि पाण्यातील लक्ष्यांचा अचूक भेद करण्याची या पाणबुडीची क्षमता या चाचण्यांमधून सिद्ध झाली होती, त्यामुळे पुढील दहा वर्षे ही पाणबुडी नौदलाच्या सेवेत कार्यक्षमपणे काम करेल अशी अपेक्षा होती. बचावकार्यात अडथळे २०१० मध्ये या पाणबुडीत सदोष बॅटरीमुळे आग लागली होती. त्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक होते, मात्र आपत्कालीन व्यवस्थापन कुचकामी ठरले.या पाणबुडीमध्ये तीन अधिकारी आणि १५ जवान आहेत.रशियन बनावटीची ही पाणबुडी बॅटरीच्या दुरुस्तीसाठी रशियात पाठवली होती. ती दुरुस्त होऊन आली आणि चार महिन्यांतच ही दुर्घटना घडली. स्फोटानंतरच्या पहिल्या दोन तासांतच पाणबुडीने सागरतळ गाठला तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घटनास्थळीच सुरू होती.चिखलमिश्रित पाणी व काळोख यामुळे रात्री उशिरापर्यंत बचावकार्यात अडथळे येत होते. ही दुर्घटना घडली त्यावेळेस पाणबुडीचे कमांडिंग अधिकारी त्यांचे काम संपवून निघून गेले होते. अडकलेल्यांमध्ये तीन अधिकारी असून त्यातील दोन विवाहित आहेत. इतर सहा नौसैनिकही विवाहित असून त्यापैकी अनेकांना दीड- अडीच- तीन वर्षांची लहान मुले आहेत. त्याकील तिघांच्या पत्नी मुंबईत असून बाहेरगावी असलेल्या इतर नौसैनिकांच्या कुटुंबियांना तातडीने मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेकदा अशा दुर्घटनेमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या मनस्थितीवर वाईट परिणाम होतो ते टाळण्यासाठी त्यांच्या मदतीला मानसोपचार तज्ज्ञांचे पथकही देण्यात आले आहे. त्या कुटुंबियांच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी नेवल वाइव्हज असोसिएशन (नावा) या अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनेने घेतली आहे. पाणबुडीच्या चांगल्या स्थितीबाबत शंका घेण्यासारखे काहीच कारण नाही. रशियामध्ये तिचे आताच पूर्ण आधुनिकीकरण करण्यात आले व एप्रिलमध्ये ती नौदलात पुन्हा रुजू झाली. गेल्याच महिन्यात तिला पाणबुडी विभागाच्या कमोडोरनी फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. तिने एक हजारांहून अधिक तासांची पाण्याखालची सफर पूर्ण केली होती. तिच्या सामग्रीची स्थितीही मजबूत होती. बॅटरी चार्जिंगसाठी पाणबुड्या बंदरात येतात व त्यानुसार तीन दिवसांपूर्वीच तिच्या बॅटरीचे चार्जिंग झाले होते. त्यामुळे बॅटरी चार्जिंगमुळे स्फोट झाल्याची शक्यता वाटत नाही नौदलाचा अपघातांचा इतिहास भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस सिंधुरक्षक’ या पाणबुडीला अपघाती जलसमाधी मिळाल्यानंतर याआधी नौदलातील अपघाती घटनांकडे एक दृष्टिक्षेप टाकला असता ‘आयएनएस सिंधुरक्षक’ याच पाणबुडीचे नाव समोर येते. मंगळवारच्या मध्यरात्री स्फोटांमुळे बुडालेल्या या पाणबुडीवर तीन वर्षांपूर्वीही आग लागल्याची घटना घडली होती.२०१०मध्ये ‘आयएनएस सिंधुरक्षक’ विशाखापट्टणम येथे होती. तेथे ‘आयएनएस सिंधुरक्षक’च्या बॅटरी कक्षात छोटासा स्फोट झाल्याने पाणबुडीवर आग लागली होती. या दुर्घटनेत एक खलाशी ठार झाला होता, तर दोघे जखमी झाले होते. ऑगस्ट १९९०मध्ये घडलेला अशीच एक दुर्घटना घडली होती. बंगालच्या उपसागरात आयएनएस अंदमान या जहाजाला जलसमाधी मिळाली होती. गळती लागल्याने बुडालेल्या या जहाजातील १५ खलाशांनाही जलसमाधी मिळाली होती.नोव्हेंबर १९९९मध्ये आयएनएस ज्योती हा नौदलाचा टँकर एका व्यापारी जहाजाला धडकला होता. २००४मध्ये झालेल्या या अपघातामुळे आयएनएस आग्रे हे जहाज काही काळ सेवेत नव्हते. डिसेंबर २००५मध्ये मुंबईजवळ आयएनएस त्रिशूल हे जहाज अंबुजा लक्ष्मी या व्यापारी जहाजाला धडकले होते. २००६ मध्येच नौदलाच्या विशाखापट्टणम येथील तळावर असलेल्या आयएनएस मगर या जहाजावर त्याच वर्षी लागलेल्या आगीत पाच खलाशी ठार झाले होते. २००८मध्ये नौदलाच्या कसरतींमध्ये भाग घेतलेली ‘आयएनएस सिंधुघोष’ मुंबईजवळ एका व्यापारी जहाजाला धडकली होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी किंवा ठार झाले नाही. मुंबईच्या बंदरातच २०११मध्ये आयएनएस विंध्यगिरी या लढाऊ नौकेची टक्कर एका व्यापारी जहाजाशी झाली होती. या अपघातात आयएनएस विंध्यगिरीला आग लागली होती.पण भारतीय नौदलाचे अपघाताचे प्रमाण प्रगत देशाप्रमाणेच आहे.पण अश्या अपघातामुळे देशाचे नुकसान तर होतेच पण अश्या जहाज्या जागी नवीन जहाजे आणण्याकरता अनेक वर्षे लागतात.यामुळे आपले सुरषाकवच कमजोर होते. दुर्लक्षित पाणबुडी धोरणाचा नौदलाला फटका गेल्या अनेक वर्षांमध्ये पाणबुडी निर्मितीच्या क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज सातत्याने व्यक्त झाल्यानंतरही त्याकडे दुर्लक्षच झाल्याने त्याचा मोठाच फटका भारतीय नौदलाला आता सहन करावा लागतो आहे. २० पाणबुड्यांची गरज असताना केवळ १४ पाबणुडय़ा भारतीय नौदलाकडे आहेत. आयएनएस सिंधुरक्षकच्या जलसमाधीने त्यातील एक पाणबुडी आता कमी झाली आहे. दरम्यान पाणबुडीवरून जल, वायू आणि हवेत मारा करणारे ब्राह्मोस हे ब्रह्मास्र भारताने विकसित केलेले असले तरी ब्रह्मास्र आहे पण भाताच नाही, अशी अवस्था पाणबुडय़ांच्या बाबतीत भारतीय नौदलाची झाली आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर या देशाच्या तिन्ही बाजूंचे खात्रीशीर रक्षण करण्यासाठी प्राप्त परिस्थितीत भारतीय नौदलाकडे कमीत कमी २० पाणबुडय़ा असणे सामरिकदृष्टय़ा आवश्यक आहे. आश्वासक परिस्थितीसाठी ३० पाणबुडय़ा आवश्यक आहेत. पण प्रत्यक्षात बुधवारी जलसमाधी मिळालेल्या आयएनएस सिंधुरक्षकसह तो केवळ १४ होता. दुसरीकडे शेजारील राष्ट्र असलेले पाकिस्तान आणि चीन या दोघांनीही पाणबुडी निर्मितीमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. पाकिस्तान आणि भारताने नव्या पाणबुडय़ांच्या निर्मितीसाठी जवळपास एकाच सुमारास म्हणजे १५ वर्षांपूर्वी प्रयत्नांना सुरुवात केली. त्यानंतर अकुला वर्गातील दोन पाणबुडय़ा पाकिस्तानने तयारही केल्या. पण भारताने करार केल्याला अनेक वर्षे उलटल्यानंतरही स्कॉर्पिअन पाणबुडय़ा नौदलात केव्हा दाखल होणार त्या बाबत भारतीय नौदलात कुणीच ठोस काहीही सांगू शकत नाही. त्या करारावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर तर तो विषय अधिकच मागे पडत गेला. दरम्यान, चीननेही स्वतंत्रपणे पाणबुडी निर्मितीचा ध्यास घेतला असून त्या दिशेने यशस्वी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ते तंत्रज्ञान पाकिस्तानला हस्तांतरण करण्याचा करारही मध्यंतरी दोन राष्ट्रांमध्ये झाला. पण भारत आहे तिथेच आहे. एक महत्त्वाची बाब विकसित करण्यात मात्र भारताने अलीकडेच यश मिळवले ते म्हणजे पाणबुडीवरून जल, वायू आणि हवेत मारा करणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची निर्मिती. हा मोठा प्रगतीचा टप्पा आहे. पण ब्राह्मोस डागण्यासाठी आवश्यक ती पाणबुडय़ांची संख्या आपल्याकडे नाही. त्यामुळेच भारतीय नौदलाची अवस्था ब्रह्मास्त्र आहे पण भाताच नाही, अशी झाली आहे. आयएनएस सिंधुरक्षकच्या दुर्घटनेनंतर ही परिस्थिती अधिकच अधोरेखित झाली आहे. ‘

No comments:

Post a Comment