अण्णांचे जनलोकपाल
खोट्या तक्रारदारांचे काय?गेल्या मंगळवारी उपोषण सुरू करण्यापूर्वी अण्णा हजारेंना सकाळी दिल्ली पोलिसांनी अटक केली आणि त्यांना तिहार जेलमध्ये डांबले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार्या अण्णांच्या अटकेची सार्या देशभर चर्चा सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथून चार लाखांची लाच घेताना नागनाथ संबटवाड या भ्रष्ट सहाय्यक पोलीस आयुक्तास त्याच्याच कार्यालयातून गेल्या गुरुवारी अटक करण्यात आली तेव्हा सार्या महाराष्ट्र पोलिसांच्या माना लाजेने खाली गेल्या. कुणीही मध्यस्थ (वाटा द्यावा लागेल म्हणून) न ठेवता संबटवाडने स्वत:च आपल्या कार्यालयात चार लाखांची रोकड स्वीकारली. तेव्हा ऍण्टीकरप्शनच्या अधिकार्यांनाही धक्काच बसला. पैशासाठी माणसाने किती लालची असावे याचा एक नमुनाच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या अधिकार्यांना बघायला मिळाला. बरं, नागनाथला काही कमी नव्हते. एका माजी मुख्यमंत्र्यांच्या आशीवार्दाने त्याने आतापर्यंत सर्व क्रीम पोस्टिंग मिळविल्या आणि त्याने आपल्या नांदेड येथील मुखेड तालुक्यात अवाढव्य प्रॉपर्टी बनविली. पेट्रोल पंप उभारले, पदविका महाविद्यालयासाठी परवानगी मिळविली, मुंबईत खासगी व म्हाडामध्ये सदनिका विकत घेतल्या. तरीही संबटवाडचे समाधान झाले नव्हते. त्याला आपल्या सात पिढ्यांची सोय व्हावी इतकी गडगंज माया जमवायची होती. त्यामुळे तो कुणालाही बरोबर घेत नव्हता.आपले सहकारी अधिकारी व शिपायांनाही विचारात न घेता, आपल्या अधिकाराचा गैरवापर करून खंडणी गोळा करायचा. अखेर अतिलोभाने त्याचा घात केला. उपायुक्तपदाची बढती तोंडावर आली असतानाच हा ५४ वर्षाचा नागनाथ ट्रॅप झाला. नागनाथ ट्रॅप झाला तेव्हा मीरा रोड पोलीस ठाण्यातील कोणत्याही कर्मचार्याला आश्चर्य वाटले नाही. नागनाथ कधीतरी रंगेहाथ पकडला जाणार अशी सर्वांनाच खात्री होती आणि तसेच झाले. अण्णा हजारेंनी ज्या दिवशी दिल्लीत भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केले तेव्हा भ्रष्ट नागनाथ पकडला गेला. अण्णांच्या आंदोलनाला गती मिळाली. एसीपी दर्जाचा अधिकारी ट्रॅप होण्याची तशी पोलीस दलातील ही एक दुर्मिळ घटना आहे. या वर्दीचा तसा दरारा मोठा आहे. तरीही या वर्दीवर हात टाकण्याचे धाडस आज लोक करू लागले आहेत. हा अण्णांचा महिमा आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच लोक आता भ्रष्ट अधिकार्यांविरुद्ध उठाव करू लागले आहेत आणि हा उठाव दिवसेंदिवस वाढत असून आता कुणा भ्रष्ट अधिकारी अथवा कर्मचार्याची खैर नाही असेच दिसून येत आहे.मुंबईसह महाराष्ट्रातून दरवर्षी शंभर-सवाशे पोलीस लाच घेताना रंगेहाथ पकडले जातात. त्यात आता अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे भर पडणार आहे. तेलगीचा स्टॅम्प घोटाळा ज्या वर्षी म्हणजे २००३ साली मोठ्या प्रमाणात उघडकीस आला त्या वर्षी तर महाराष्ट्रातून सुमारे दोनशे पोलिसांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली. आता अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर ही संख्या दुप्पट तिप्पट होऊ शकते इतका असंतोषाचा भडका सर्वत्र पसरला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौमित्र सेन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यसभेत नुकताच महाभियोग पार पडला. त्यात सर्वपक्षीय खासदारांनी सौमित्र सेन यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली तेव्हा सौमित्र सेन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मी निर्दोष आहे. हा अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा परिणाम आहे. अण्णांच्या दबावामुळेच मला दोषी ठरविण्यात आले आहे असेही सेन म्हणाले. सौमित्र सेन किती दोषी आहेत किंवा निर्दोष आहेत हे सांगता येणार नाही, शेवटी हा विषय लोकसभेत अद्याप यायचा आहे. अण्णांच्या जनलोकपाल विधेयकाचा वापर कुणाला तरी सुपारी घेऊन संपविण्यासाठी नक्कीच होऊ शकतो हे मात्र सौमित्र सेन यांच्या जाहीर आरोपामुळे दिसून येते. अण्णांच्या जनलोकपालात भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास किमान दहा वर्षे व जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे, परंतु खोट्या तक्रारी करणार्यांना अण्णांच्या जनलोकपालात तुरुंगवासाची शिक्षा नाही. केवळ दंडाची शिक्षा आहे. त्यामुळे अण्णांचे जनलोकपाल विधेयक जसेच्या तसे अमलात आणल्यास त्याचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. ब्लॅकमेलर त्याचा फायदा घेऊन सर्वांना जेरीस आणू शकतात. देशद्रोही, राष्ट्रविघातक शक्ती ‘अल-कायदा म्यॅनुअल’प्रमाणे अण्णांच्या जनलोकपालाचाही देश पोखरण्यासाठी वापर करू शकतात. अण्णांचे जनलोकपाल बूमरँगसारखे आहे. ते कधीही उलटू शकते. त्यासाठी केंद्र शासन व अण्णा टीमने एकत्र येऊन सक्षम लोकपाल विधेयक तयार केले पाहिजे. आज मूळ व खर्या तक्रारदारांपेक्षा खोटे तक्रारदारच सर्वांना कामाला लावत आहेत. बलात्काराच्या खोट्या तक्रारी करून अनेकांना आयुष्यातून उठवले जाते. हे सिद्ध होऊनही त्यांचे कुणी वाकडे करीत नाही. अण्णांच्या जनलोकपालमध्येही खोट्या तक्रारदारांविरुद्ध कोणतीच ठोस कारवाईची तरतूद नाही म्हणजे रोगापेक्षा उपाय जालीम, असे व्हायला नको

No comments:
Post a Comment