राज्याभरात २ लाख बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. शुक्रवार, २४ जानेवारी रोजी नागपुर, यवतमाळ, अकोला दौऱ्यावर त्यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला.
किरीट सोमय्या म्हणाले की, "महाराष्ट्रात
२०२४ मध्ये २ लाख बांग्लादेशी रोहिंग्यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केले. त्यांना
जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी स्थानिक राजकीय नेत्यांनी दबाव आणला. हे सगळे प्रकरण
आता बाहेर येत असून त्यांना अनधिकृतरित्या जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
आतापर्यंत ज्या सव्वा लाख लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले त्याचा तपास
करण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मालेगाव येथील तत्कालीन
तहसीलदार नितीनकुमार देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबित केले
आहे. राज्य शासनाचे सहसचिव अजित देशमुख यांनी निलंबनाचा आदेश जारी केला.
राज्यात बांग्लादेशींना देण्यात येणाऱ्या जन्मप्रमाणपत्र घोटाळा
चर्चेत असताना आता यवतमाळ जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्रासाठी ११ हजारांहून अधिक अर्ज
आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
बाांग्लादेशी आणि रोहिंग्यांना देण्यात आलेल्या जन्म दाखला
घोटाळ्याचे प्रकरण आता अकोल्यापर्यंत पोहोचले आहे. अकोला जिल्ह्यात १५ हजार ८४५
बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
तमिळनाडू राज्यातील कोईम्बतूरच्या दहशतवादी विरोधी पथकाने बांगलादेशी
(Bangladeshi) घुसखोरांची तपासणी करत असताना ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली.
एटीएसने तिरूपूर आणि कोईम्बूतर जिल्ह्यातून त्यांना पकडण्यात आले. शिवाय
त्रिपुरामध्ये बांगलादेशींकडून होणाऱ्या शस्त्रांची तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस
आले आहे. तसेच तीन बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच आता दिल्ली
पोलिसांनी आम आदमी पक्षाचे आमदार महेंद्र गोयल यांच्याविरोधात नोटीस जारी केली
असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती सांगण्यात आली. अवैध
बांगलादेशी नागरिकांच्या कागदपत्रांशी संबंधित प्रकरण असून आमदार महेंद्र गोयल
यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पर्यटक असल्याचे सांगत बांगलादेशी नागिरकांची भारतात घुसखोरी,
५
जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
देशाची राजधानी दिल्ली येथे बांगलादेशी नागिरकांनी पर्यटक असल्याचे
सांगत घुसखोरी केली आहे. व्हिसा संपल्यानंतरही ते भारतात अनेक दिवसांपासून
वास्तव्य करत होते. यामध्ये महिलांचाही यामध्ये समावेश आहे. त्यांच्या कारवाईनंतर
त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी ३ जानेवारी
२०२५ रोजी घडली आहे.
बांगलादेशी हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्री ‘अॅक्शन मोड’वर
ठाणे : मुंबई आणि परिसरात बेकायदा राहणार्या बांगलादेशी ( Bangladeshi
) घुसखोरांना
हद्दपार (डी-पोर्ट) करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी
अधिवेशनात केली होती. त्यानंतर, राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली
असून बेकायदा वास्तव्य करणार्या बांगलादेशींचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात
केली आहे. २२ डिसेंबर रोजी भिवंडीत दहशतवादविरोधी पथक आणि ‘ठाणे गुन्हे अन्वेषण
शाखे’च्या पथकाने एका महिलेसह आठ बांगलादेशींना अटक केली. दरम्यान, धुळे
शहरातील एका लॉजमधून चार बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्य
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे हजारो रोहिंग्या आणि बांगलादेशी
घुसखोरांच्या जन्म दाखल्यांची बनावट कागदपत्रे उघडकीस आली आहेत. आता याप्रकरणाची
चौकशी करण्यात आली असून एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट कागदपत्रे उघडकीस आली होती.
एकूण ५२ हजारांहून अधिक बनावट जन्मदाखले असल्याची माहिती समोर आली आहे. या
फसवणुकीत पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळसह भारतातील अनेक राज्यातील नागरिकांच्या
प्रमाणपत्रांचा यामध्ये समावेश होत आहे.
No comments:
Post a Comment