https://www.youtube.com/shorts/2-7la5tMGJo
युद्धभूमीवर एआयचा करा मर्यादित वापर : चीन लष्करी सुधारणांवर भर देणाऱ्या चीनने युद्धभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) मर्यादित वापर करण्याचा आदेश चीनच्या लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे. कोणताही निर्णय घेताना एआय हे पूरक साधन म्हणून वापरावे. मात्र, त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू नये, असे लष्कराने म्हटले आहे.
डेटा विश्लेषण, नियोजनासाठी एआयचा उपयोग होऊ शकतो, परंतु माणसाच्या कल्पकतेला हे तंत्रज्ञान पर्याय ठरू शकत नाही. युद्धात मानवी निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता या गोष्टी अपरिहार्य आहेत, असे चीनने म्हटले आहे. पूर्व लडाखमध्ये डेमचोक, डेपसांग येथे सीमेवरून दोन्ही देशांनी आपापले सैन्य २१ ऑक्टोबर रोजी मागे घेतले. २३ ऑक्टोबरला सीमातंट्यावरील तोडग्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात ब्रिक्स परिषदेदरम्यान चर्चा झाली. कैलास मानससरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे, नद्यांसंदर्भातील माहितीची देवाणघेवाण तसेच दोन्ही देशांतील व्यापार वाढविणे या विषयांवर दोन्ही नेत्यांनी बोलणी केली हाेती.
No comments:
Post a Comment