https://youtube.com/shorts/2D47VqcAsQA?si=W1iyqftTrZk0j4_Y
https://youtube.com/shorts/2D47VqcAsQA?si=W1iyqftTrZk0j4_Y
चीनची कुरापत, लडाखचा भाग गिळण्याचा प्रयत्न, चीनकडून त्यांच्या होटन प्रांतात दोन 'काऊंटीची' घोषणा, तुमच्या चुकीच्या दाव्यांना कोणीही मान्यता देणार नाही, भारतानं सुनावलं
नवी दिल्ली : चीनमध्ये असलेल्या होटन प्रीफेक्चर प्रदेशात त्या देशाने दोन नव्या काऊंटींची घोषणा केली असून, त्यातील काही भाग हा लडाख या केंद्रशासित प्रदेशातील आहे. त्यामुळे चीनच्या या कृतीचा भारताने कठोर शब्दांत विरोध केला आहे. चीनने केलेल्या चुकीच्या दाव्यांना कोणीही मान्यता देणार नाही, असे भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी म्हटले आहे. होटन प्रीफेक्चर भागामध्ये हियान आणि हेकांग या दोन नव्या काऊंटीत भारताचा अविभाज्य भाग असलेल्या लडाखच्या काही प्रदेशाचा समावेश करण्याच्या चीनच्या कृतीचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे भारताने म्हटले आहे.
पूर्व लडाखमधील सीमातंट्यावर दोन्ही देशांनी एका कराराद्वारे तोडगा काढला असताना आता पुन्हा लडाखमधील भूभागावर डोळा ठेवून चीनने नव्याने कुरापत काढली आहे. त्यामुळे भारत व चीनमधील संबंध सुरळीत होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असे वाटत असतानाच हे नवे प्रकरण उद्भवले आहे.
No comments:
Post a Comment