Total Pageviews

Wednesday, 22 January 2025

बांगलादेशी घुसखोराच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या २००४ पासून भारतात करत होता वास्तव्य

 


इस्लामिक कट्टरवादी असलेल्या बांगलादेशातील दहशतवाद्यांना (Bangladeshi terrorist) आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने बांगलादेशास लागून असलेल्या धुबरी जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे एकूण अटकेची संख्या आता १४ वर गेली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती मंगळवारी दिली. ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याचे नाव हे अजिबर रहमान असून वय वर्षे ३१ आहे. ही अटक दि : १९ जानेवारी २०२५ रोजी घडली होती.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभात रविवार, दि. १९ जानेवारी रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या स्फोटाची जबाबदारी खालिस्तानी संगटना 'खलिस्तान जिंदाबाद फोर्स'ने स्वीकारली आहे. एका मेल द्वारे त्यांनी स्फोटाची जबाबदारी घेत पिलीभीत चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ही माहिती समोर आली.

देवभूमी द्वारकेमधील विधर्मीयांनी केलेली बेकायदा बांधकामे हटवून शासनाने द्वारकेतील सातही बेटांना अतिक्रमणमुक्तं केले आहे. मंगळवार, दि. २१ जानेवारी रोजी गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती दिली. एकूण ३६ बेकायदा बांधकामे यशस्वीरित्या हटवण्यात आली आहेत. द्वारका शहर व आसपासच्या सात लहान बेटांवर मशिदीसह बेकायदा बांधकामे करून सरकारी जमीन बळकावण्याच्या प्रयत्न विधर्मीयांनी केला होता. अखेर पोलीस व स्थानिक यंत्रणेने मिळून द्वारकामध्ये मेगा डिमोलिशन मोहीम सुरू केली एका आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या या मोहिमेअंतर्गत १०० टक्के बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आली.

एका बांगलादेशी (Bangladeshi)  अवैध घुसखोरास पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बांगलादेशी घुसखोर हा २००४ पासून भारतात वास्तव्यास असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याला शुक्रवारी १७ जानेवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीचे नाव हे एहसान हाफिज शेख असून घुसखोराचे वय वर्षे ३४ होते. 

एहसान हाफिज शेख हे २० वर्षांपूर्वी अवैधरित्या भारतात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. कोलकातामधील एका दलालाच्या मदतीने त्याने बनावट जन्मदाखल तयार केला. त्याने बनावट कागदपत्रांचा वापर करत भारतीय पासपोर्टसोबत इतर ओळखपत्रे मिळवली आहेत.

 दरम्यान , २००९ या वर्षांत पुण्यात स्थलांतरित होण्यापूर्वी बांगलादेशी घुसखोरी अहमदाबाद आणि मुंबईमध्ये वास्तव्य करत होता. २०१२ पासून तो महर्षी नगरमध्ये वास्तव्य करू लागला होता.

 एहसान हाफिज शेख कपड्याच्या कारखान्यामध्ये काम करत होता. पण नंतर त्याने स्वत:चा टी-शर्ट व्यवसाय सुरू केला. पोलिसांनी ७ आधार कार्ड, २ मतदार ओळखपत्र, २ वाहनाचा परवाना, तसेच ७ पॅन कार्ड, ४ पासपोर्ट, ९ क्रेडिट कार्ड, ९ डेबिट कार्ड, ८ जन्मदाखले आणि इतर ८ देशांचे चलन जप्त करण्यात आले आहे.

 यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून भाडेतत्वावर घराचा करार, कापड उद्योगाचे कागदपत्रे, सिम कार्ड जप्त करण्यात आले. एहसान हाफिज शेखवर भारत न्यासंहितेच्या कलम ३१८, ३३६, ३३८ आणि ३४० कलमांतर्गत पासपोर्ट कायदा आणि परदेशी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

No comments:

Post a Comment