*पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष ठरला दहशतवादी ? इम्रान खान यांचे अनेक नेते रडारवर. दहतवादविरोधी कायद्याचा गुन्हा दाखल*
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) डझनभर नेत्यांवर तोडफोड, सुरक्षा जवानांवर हल्ला, तसेच भ्रष्टाचारप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालय परिसराबाहेर गोंधळ घालण्यात सहभागी असल्याचा आरोप करीत पोलिसांनी दहशतवादविरोधी कायद्याच्या विविध कलमांतर्गत रविवारी गुन्हा दाखल केला. इम्रान खान तोशाखाना प्रकरणाच्या बहुप्रतीक्षित सुनावणीला हजर राहण्यासाठी लाहोरहून इस्लामाबादला आले होते, आणि न्यायालय परिसरातच त्यांचे समर्थक आणि सुरक्षा जवानांमध्ये झडप झाली. शनिवारी पीटीआय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान २५ सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी सुनावणी ३० मार्चपर्यंत तहकूब केली.
पीटीआय कार्यकर्ते आणि वाँटेड अशा १७ नेत्यांविरोधात गु्न्हा नोंदवण्यात आल्याचे वृत्त जिओ वृत्तवाहिनीने दिले. पीटीआय नेते फवाद चौधरी यांनी रविवारी सांगितले की, पक्ष खान यांच्या निवासस्थानी बेकायदेशीर कारवाई केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे ७० वर्षीय प्रमुख इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानच्या तिजोरीतील (तोशाखाना) मौल्यवान वस्तू विकल्याचा तसेच आपल्या संपत्ती विवरणपत्रात त्याचा उल्लेख लपवल्याचा आरोप पाकिस्तान निवडणूक आयोगाने केला असून याप्रकरणी दाखल याचिकेसंदर्भात इम्रान यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (एडीएसजे) जफर इक्बाल यांच्या न्यायालयात उपस्थित राहायचे होते.
‘पीटीआय’वर बंदीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणार
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला (पीटीआय) प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सरकार तज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहे, असे पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी सांगितले. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला बंदी घालण्यात आलेला गट घोषित करायचा की, नाही याचे मूल्यांकन करण्यासाठी सरकार आपल्या कायदेशीर टीमशी सल्लामसलत करेल, अशी माहिती त्यांनी दिली.
आजी-माजींच्या पंतप्रधानांच्या लढाईत पाकिस्तान कंगाल-15 मार्च
पाकिस्तानला आणखी कर्ज देण्यास आयएमएफतर्फे नकार देण्यात आला आहे. आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानचे भवितव्य धोक्यात आले आहे. इम्रान खान आणि शेहबाज शरीफ यांच्यातील देशवासीय नरकयातना भोगत आहेत. पाकिस्तानचे
खायचे वांदे आहेत. मात्र, नेते आपसात भांडत आहेत.
आयएमएफ
कराराचे पालन व्हावे यासाठी नाणेनिधी आक्रमक आहे. अंमलबजावणीसाठी पाकिस्तानकडून आश्वासन घेतले जाणार आहे. देशातील राजकीय पक्षांनी अशी हमी द्यावी, असे नाणेनिधीचे म्हणणे आहे. पाकिस्तान आणि IMF यांच्यात तब्बल सात अब्ज डॉलरचा करार होणार आहे. मात्र, चर्चा अंतिम टप्प्यावर आली तरीही पाकिस्तानला अद्याप पहिला हप्ता जाहीर झालेला नाही.
No comments:
Post a Comment