Total Pageviews

Friday, 11 September 2015

इसिस’ची भीती कुणाला?

‘इसिस’ची भीती कुणाला? Saturday, September 12th, 2015 इस्लामच्या नावाखाली ‘चंद्रावर’ जरी काही खट्ट झाले तरी त्याचे पडसाद आपल्याकडील मुसलमानांत उमटतात. हे गंभीर आहे. म्हणून ‘इसिस’च्या बाबतीत येथील मुल्ला-मौलवींनी घेतलेली भूमिका चांगली असली तरी यापुढे त्यांनी ‘पुरोगामी’ विचारांची कास धरून मुसलमान तरुणांना योग्य मार्गाने नेण्याचा विडा उचलायला हवा. त्यातच सगळ्यांचे व इस्लामचेही कल्याण आहे. ‘इसिस’ची भीती कुणाला? हिंदुस्थानातील मुस्लिम धर्मगुरूंनी घेतलेल्या भूमिकेवर अमेरिकेने पसंतीची मोहोर उठवली आहे. हिंदुस्थानातील हजारावर मुल्ला-मौलवी एकत्र जमले व त्यांनी एकमताने निर्णय घेतला की, ‘इसिस’ या खतरनाक दहशतवादी संघटनेला आपल्या देशात अजिबात थारा मिळता कामा नये. इराक, सीरियात इसिसने जो भयंकर उत्पात आणि हिंसाचार घडवला आहे, त्यामुळे इस्लामचे काय भले झाले? हा प्रश्ननच आहे. इस्लामच्या नावाखाली लाखो मुसलमानांच्याच कत्तली सुरू आहेत. बॉम्बस्फोट घडवून एकाच वेळी शेकडो लोक मारले जात आहेत व हे सर्व मुसलमान आहेत. ‘इसिस’ला ‘इस्लामी स्टेट’ निर्माण करायचे आहे व त्यासाठी ते इस्लाम मानणार्याच निरपराध्यांना रोज कंठस्नान घालीत आहेत. जगाचा थरकाप उडवणारे भयंकर अत्याचार हे ‘इसिस’वाले करीत आहेत. आपल्याकडील ठाणे शहर व आसपासच्या परिसरातील पाच-सहा मुसलमान पोरे इराकमधील युद्धात भाग घेण्यासाठी मध्यंतरी तेथे गेली. त्यातले दोघे मारले गेले. म्हणजे हे ‘इसिस’चे लोण इथपर्यंत पोहोचले आहे. कश्मीर खोर्या्त ‘इसिस’चे झेंडे फडकवून हिंदुस्थानविरुद्ध घोषणा देण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘इसिस’ हा धार्मिक प्रकार नसून अल कायदाइतकाच भयंकर असा दहशतवादाचा नवा भस्मासुर आहे. दर दोन-चार वर्षांनी इस्लामच्या नावाखाली असे भस्मासुर निर्माण होतात व फक्त मुसलमानांच्याच नाही, तर संपूर्ण मानवजातीच्या मुळावर उठतात. ‘इसिस’च्या बाबतीत नेमके तेच घडताना दिसत आहे. या पार्श्व भूमीवर ‘इसिस’ ही इस्लामी आणि शरीयतविरोधी शक्ती असल्याचे जे ऐलान हिंदुस्थानातील मुल्ला-मौलवींनी आता केले आहे ते महत्त्वाचे ठरते. कारण ‘इसिस’पासून खरा धोका आहे तो या ‘फतवेबाज’ मौलवींना. इसिसचा जोर वाढला तर या मंडळींचे कोणी ऐकणार नाही ही भीती त्यांना वाटते. या मौलवींचे म्हणणे आहे की, ‘इसिस’ला थारा देऊ नका. ते शरीयत व इस्लामविरोधी आहेत. पण आम्ही तर म्हणू की ते मानवताविरोधी आहेत, अमानुष व निर्घृण आहेत, देशविरोधी आहेत म्हणून त्यांचा निषेध व धिक्कार व्हायला हवा आणि येथील मुल्ला-मौलवींनी देश व मानवतेसाठी ‘इसिस’च्या विरोधात मुस्लिम समाजात जनजागरण केले पाहिजे. याआधी तोयबा, हिजबुलसारख्या संघटनांनी दहशतवादी कृत्ये इस्लामच्याच नावाखाली घडवून आणली व आजही त्यांच्या हिंसाचारी कारवाया सुरूच आहेत. हिंदुस्थानातील मुल्ला-मौलवींनी पुरोगामी किंवा सुधारणावादी भूमिका घेऊन पावले टाकली तरच त्यांचा समाज अंधकारातून बाहेर पडेल. इसिस ‘शरीयत’विरोधी आहे, हे त्यांचे म्हणणे आहे व ते खरे आहे, पण ‘शरीयत’च्या बेडीतून मुस्लिम महिलांची सुटका करणे हाच खरा धर्म आहे. मात्र अशावेळी हेच मुल्ला-मौलवी त्याविरोधात बांग ठोकतात. ‘शरियत’च्या नावाने घालण्यात आलेली बंधने मुस्लिम महिलांवर कायम कशी राहतील, यासाठी आटापिटा करतात. धर्म व श्रद्धा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे हे मान्य केले तरी त्या धर्म व श्रद्धेच्या नावाखाली इतरांचे रक्त सांडणे याला धर्मांधतेचा अतिरेक म्हणावा लागेल आणि हा अतिरेक मुसलमानच काय, तर या देशातील कोणत्याही धर्माच्या लोकांनी करू नये. जगाच्या पाठीवर हिंदुस्थान हा सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेला दुसर्याण क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे इस्लामच्या नावाखाली ‘चंद्रावर’ जरी काही खट्ट झाले तरी त्याचे पडसाद आपल्याकडील मुसलमानांत उमटतात. हे गंभीर आहे. म्हणून ‘इसिस’च्या बाबतीत येथील मुल्ला-मौलवींनी घेतलेली भूमिका चांगली असली तरी यापुढे त्यांनी ‘पुरोगामी’ विचारांची कास धरून मुसलमान तरुणांना धर्मांध न बनविता योग्य मार्गाने नेण्याचा विडा उचलायला हवा. त्यातच सगळ्यांचे व इस्लामचेही कल्याण आहे.

No comments:

Post a Comment