Total Pageviews

Sunday, 29 September 2013

SAMBA TERROR ATTACKS TALK TO PAKISTAN ONLY IFTHERE IS NO TERROR ATTACKS FOR 6 MONTHS

पाक पुरुस्क्रुत दहशतवाद थांबला तरच वाटाघाटी कराव्यात घुसखोरीचा डाव उधळला काश्मीरच्या केरन भागातील ताबारेषेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा मोठा डाव लष्कराने उधळून लावला आहे. तीस अतिरेक्यांचा एक गट लष्कराच्या सापळ्यात अडकला असल्याचे वृत्त आहे.लष्करी फौजांनी 24 सप्टेंबर रोजी या कारवाईला सुरवात केली होती. दहा ते बारा अतिरेक्यांचे देह आढळून आले आहेत, मात्र ते मारले गेले आहेत का याची खात्री कारवाई पूर्ण झाल्यावरच होईल, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कर व अतिरेक्यांमध्ये झालेल्या गोळीबारावरून मारण्यात आलेल्या अतिरेक्यांची संख्या तीसहून अधिक असेल. ही 'सफाई मोहीम' चालू असून, लवकरच हा परिसर मोकळा केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मिडियाने या बातमीला फ़ारसे महत्व दिले नाही. काश्मीरमध्ये कठीण परिस्थितीत लष्कर भूमिका बजावत आहे. पाकिस्तानकडून होणारा गैरप्रचार, स्थानिक जनतेचा रोष, राज्यातील राजकारण्यांकडून किंवा फुटिरतावाद्यांकडून त्यात ओतले जाणारे तेल आणि दुर्गम परिसर, अशा अनेक आव्हानांना लष्कर तोंड देत आहे. ताबा रेषेवर तेरा घुसखोरांना कंठस्नान घालून लष्कराने आपले सामर्थ्य दाखवून दिले.पाकिस्तानी लष्कर तेथील व्यवस्थेत आपले स्थान टिकविण्यासाठी भारतविरोधाचे "कार्ड' वापरत असते. सध्याचे लष्करप्रमुख जनरल अश्फाक परवेझ कयानी आता निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यांच्याजागी येणारे नवे लष्करप्रमुख आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. नवाझ शरीफ सत्तेवर आल्यानंतरही फरक पडलेला नाही पाकिस्तानातील लष्कर, आयएसआय , दहशतवादी यांनी भारताशी गेली काही वर्षे छुपे , गनिमी काव्याचे युद्ध पुकारले आहे. आता काही आठवड्यांतच काश्मिरात हिमवर्षाव सुरू होईल. त्या काळात घुसखोरी अशक्य होईल. दर किती काळाने एखादा हल्ला किंवा स्फोट केला की , आपले अस्तित्व टिकून राहील , याचे दहशतवाद्यांचे गणित असते. गेल्या दोन वर्षांत जम्मू-काश्मीर क्षेत्रात दहा दहशतवादी हल्ले झाले असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतीय गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीवरून, अडीच हजार प्रशिक्षित दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या काही महीन्यात पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून वारंवार असे हल्ले होत आहेत. पाकिस्तानी लष्कर व "आयएसआय' ही संघटना विविध मार्गांनी काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करते, हे कधीच लपून राहिले नव्हते. आजवर ते सारे प्रयत्न सैन्याने उधळून लावले असले, तरी काश्मिरातील परिस्थिती तणावग्रस्त ठेवून तेथील सैन्याच्या भूमिकेविषयी जास्तीत जास्त गैरप्रचार कसा करता येईल, हेच डावपेच पाकिस्तान खेळत आला आहे. नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतरही त्यात फरक पडलेला नाही एकीकडे न्यूयॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘शांतता चर्चे’ची तयारी सुरू असतानाच दहशतवाद्यांनी आज जम्मूत भयंकर हल्ला केला. लष्करी गणवेशात आलेल्या तिघाजणांनी आर्मी कॅम्प आणि पोलीस ठाण्यात घुसून गोळीबार केला.ज्या इमारतीत घुसून ते तीन दहशतवादी लष्करावर गोळीबार करत होते ती इमारत पहिल्यांदा तातडीने रिकामी करण्यात आली. दहशतवाद्यांवर जवानांचा गोळीबार सुरूच होता. पण ते टप्प्यात येत नाहीत असे वाटताच लष्कराने इमारतच उद्ध्वस्त करण्याचे ठरवले. या हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल बिक्रमजीत सिंग ,चार जवान आणि चार पोलीस शहीद झाले. या हल्ल्यात दोन नागरिकही मारले गेले. चकमकीत तीनही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. गेल्या दहा वर्षांतील जम्मू भागातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. काश्मीरप्रश्नी अमेरिका सक्रिय? इकडे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सैनिकांच्या रक्ताचे पाट वाहिले तरी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शांततेची कबुतरे आकाशात उडवली आहेत. न्यूयॉर्कमध्ये असलेल्या डॉ. सिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी ‘शांतता चर्चा’ होणारच, असे तुणतुणे वाजवले आहे. या हल्ल्याचा निषेध करताना संवादाच्या प्रक्रियेला सुरुंग लावण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावू, अशी गुळगुळीत प्रतिक्रिया डॉ. सिंग यांनी फ्रँकफर्टहून न्यूयॉर्कला रवाना होण्यापूर्वी दिली. शरीफ व डॉ. सिंग यांची रविवारी न्यूयॉर्कमध्ये भेट होणार आहे. 'भारत आणि पाकिस्तान या दोन देशांनी काश्मीरप्रश्न सोडवावा. या प्रश्नात आम्ही पडणार नाही', अशी अमेरिकेची आजपर्यंतची भूमिका होती; पण अफगाणिस्तानमधून सैन्य मागं घेतल्यावर दक्षिण आशियात शांतता राहावी, यासाठी अमेरिकेनं आपल्या भूमिकेत बदल करून काश्मीरप्रश्नात लक्ष तर घालत नाही? काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय पातळीवरचा प्रश्न असून, तो दोन्ही देशांनी ऐतिहासिक सिमला कराराअंतर्गत सोडवावा, अशी अमेरिकेची आजपर्यंतची भूमिका आहे. अमेरिकेनं काश्मीरच्या प्रश्नात हस्तक्षेप करावा, ही पाकिस्तानची पूर्वीपासूनची मागणी आहे. भारताचा मात्र अशा प्रकारच्या हस्तक्षेपाला सातत्यानं विरोध राहिला आहे. अमेरिका आणि पाकिस्तान यांचं शीतयुद्धकालापासून चालत आलेलं सख्य लक्षात घेता अमेरिकेची मध्यस्थी पाकिस्तानला फायद्याची ठरेल, अशी भारताला भीती आहे. या दहशतवादी हल्ल्यामागच्या सूत्रधारांना पाकिस्तान सरकार शिक्षा करत नाही, तोपर्यंत चर्चा होणार नाही, अशी भूमिका भारतानं घेतली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतो आहे. हा तणाव नियंत्रणात आणणं आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लवकरच संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या बैठकीनिमित्त न्यूयॉर्कमध्ये एकत्र येणार आहेत. या भेटीमधून चर्चेची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू व्हावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे.म्हणुन अमेरिकेच्या दबावाखाली आपले पंतप्रधान पाकिस्तानशी वाटाघाटी करत आहे.पण आपण अमेरिकेच्या दबावाखाली येऊ नये.जर भारतातले हल्ले कमित कमी ६ महीने थांबले तरच वाटाघाटी कराव्यात. राज्यातल्या देशप्रेमी नागरिकांना आणी सस्थांना आर्थिक मदत जनरल व्ही. के. सिंह माजी लष्करप्रमुखांच्या वक्तव्यानंतर की राज्य सरकारमधील मंत्र्यांना भारतीय लष्कराकडून पैसा पुरवला जातो, मोठे वादळ ऊठले.लष्करातील गुप्त विभाग राज्यातील फुटीरतावाद्यांच्या विरोधात काम करतो. त्यामुळे या विभागाची माहिती सरकारच्या अधिकार्यानी 'लीक' करणे चुकीचे आहे.दोषीना शिक्षा व्हायला पाहीजे. ज्या पद्धतीचा अहवाल बाहेर आला त्यामागे कट/कारस्थान आहे, 'जम्मू-काश्मीरात 'स्थिरता' कायम ठेवण्यासाठी राज्यातल्या देशप्रेमी नागरिकांना आणी सस्थांना सरकार आणी लष्कराकडून पैसा पुरवला जातो. काश्मीर खोर्यातील स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेला 'लाच' म्हणून संबोधणे चुकीचे आहे. ती रक्कम जनतेचे मन जिंकण्यासाठी देण्यात आली होती. हे सर्व राज्य सरकारला मदत करण्याच्या हेतूने करण्यात आले होते.२०१० मध्ये सरकार विरुढ मोठ्या प्रमाणात दगड फ़ेक केली जात होती.दगडफ़ेक करणार्या युवकांना आयएसआय' ५००-१००० रूपये प्रतीदिन देत होते.दगडफ़ेक आणी त्याला प्रत्युतर म्हणुन पोलिसांचे फ़ायरीग या चक्रव्युव्हात काश्मीर खोरे अडकले होते.याच वेळी काश्मीर क्रिकेट लिग सुरु करुन युवकांना दगडफ़ेकीतुन दुर केले गेले. अश्या अनेक ऊपायांकरता अनेक देशप्रेमी नागरिकांना आणी सस्थांना आर्थिक मदत करण्यात आली होती. त्यामुळेच पाकिस्तानच्या दुटप्पी वर्तनाविषयी भारतात संतापाची लाट उसळली. ती आता केवळ निषेध खलित्यांनी शमणारी नाही, तर काही ठोस प्रयत्नांची आवश्यकता आहे. पाकिस्तानने भारताशी छुपे युद्ध छेडले असून अशा परिस्थितीत पाकिस्तानशी कुठलीही चर्चा करता कामा नये. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मुळीच भेटू नये.सगळ्या देशाची हिच प्रार्थना आहे. २०१०ते 2013 काश्मीर मधला दहशतवादी हिंसाचार दहशतवादी हल्ले हिंसाचारत म्रुत्यमुखी पड्ले सिझ फ़ायर भंग पाकिस्तान कडुन सिमेपलीकडुन घुसखोरीचे प्रयत्न 2010 ४८८ ३७५ आकडे मिळत नाही १९१ 2011 ३४० १८३ आकडे मिळत नाही ५० 2012 ३९१ ११७ १२१ ३३ 2013 १२१ १४८ २३५ २८ Total* १३४० ८२३ ३५६ ३०२ *२५/०९/२०१३ पर्यंत

No comments:

Post a Comment