*पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध पेटवून तालिबान बळकावणार देश ? अफगाण तालिबान बाहेरुन अन् टीटीपी आतून पोखरणार पाक*
पाकिस्तानातील तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दशहतवादी संघटनेला संपूर्ण बळ पुरवून पाकमध्ये यादवी माजवण्याच्या बेतात
अफगाण तालिबान आहे. एकाचवेळेला गृहयुद्ध तसेच सीमेवरील युद्धाचा सामना करण्याची वेळ पाकिस्तानवर ओढवावी, अशी अफगाण तालिबानची व्यूहरचना आहे.
खैबरपख्तुनखाँ, वजिरीस्तान हे सध्या पाकिस्तानात असलेले भाग अफगाणिस्तानचे असल्याचा अफगाण तालिबानचा दावा आहे. त्याला तसे ऐतिहासिक संदर्भही आहेत. दोन्ही देशांतील सध्याची सीमारेषा ड्युरंड लाईन म्हणून ओळखली जाते. येथे पाकिस्तानने घातलेले तारकुंपण अफगाण तालिबानने उखडून टाकलेले आहे.
गेल्या 2 महिन्यांत दोन्ही देशांदरम्यान सीमेवर (डुरंड लाईनवर) अनेकदा हिंसक चकमकी झाल्या आहेत. पाकिस्तानचे 12 सैनिक आणि 7 नागरिक त्यात मारले गेले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानात तहरिक-ए-तालिबानने अंतर्गत हल्लेही सुरूच ठेवले आहेत. इस्लामाबादेतील ताजा आत्मघातकी हल्ला तसेच टीटीपीने पाकिस्तानात समांतर सरकारची स्थापना करून शाहनवाज सरकारच्या सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान हे या व्यूहरचनेचाच एक भाग आहेत.
डिसेंबरमध्ये सर्वाधिक हल्ले (Pak vs Taliban)
मागील वर्षात डिसेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये सर्वाधिक 49 दहशतवादी हल्ले झाले, त्यात 32 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 17 नागरिक असे 56 जण मरण पावले आहेत.
सीमावाद काय?
• 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने बळकावल्यानंतर पाचव्याच दिवशी 20 ऑगस्टला आपण ड्युरंड लाईन ही अफगाण पाकदरम्यानची सीमा मानत नाही, असे स्पष्ट केले होते. (Pak vs Taliban)
पाकमधील खैबर पख्तुनखाँ हा भाग हा अफगाणिस्तानचा अविभाज्य भाग आहे, असेही तालिबानने जाहीर केले होते. लगोलग पाकने ड्युरंड लाईनवर लष्कर तैनात केले होते.
यानंतर तालिबानने सीमेवरील पाकच्या तपासणी चौक्या उडवायला सुरुवात केली. दोन्ही देशांदरम्यान सीमेलगतच्या भागांतून चकमकीही रोजच्या बनल्या.
पाकविरुद्ध दोन्ही तालिबान
अफगाणिस्तान तालिबान आणि टीटीपी या दोन्ही संघटनांचे हेतू तसेच मतप्रणाली सारखी आहे. इस्लामिक शरियाँ करणे, सरकार आणि नागरिकांचे संपूर्ण इस्लामीकरण करणे, हे दोघांचे उद्दिष्ट आहे. लागू
• अफगाण तालिबानला खैबरपख्तुनखाँ मिळवायचा आहे आणि टीटीपीला पाकमध्ये संपूर्ण शरियत लागू करायची आहे. टीटीपीच्या मते, विद्यमान पाकिस्तान एक परिपूर्ण इस्लामिक देश नाही.
...तर पाकला हल्ल्याचा हक्क : अमेरिका
दहशतवादाविरुद्ध स्वतःच्या बचावाचा पाकिस्तानला संपूर्ण अधिकार आहे, असे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता नेड प्राईस यांनी बुधवारी स्पष्ट केले. पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीने अफगाणिस्तानविरोधात दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्याचे समर्थन प्राईस यांनी केले.
No comments:
Post a Comment