अलीकडील एका वृत्तानुसार, भारत -पाकिस्तान दरम्यानच्या सीमेवर ड्रोन दिसण्याच्या घटनांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०२१ मध्ये सीमेवर १०४ ड्रोन आढळले होते, तर २०२२ मध्ये ३११ ड्रोन्स आढळून आले आहेत. २०२२ मध्ये शस्त्रास्त्रे, अमलीपदार्थ यांची तस्करी करण्यासाठी ७७ ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता.
पाकिस्तानकडून शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याचे सर्वविदित आहेच. पण, अलीकड्या काळात त्यामध्ये बरीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया अधिक तीव्र करण्यासाठी त्या देशाकडून सातत्याने ड्रोनचा वापर केला जात आहे. पाकिस्तानची ‘आयएसआय’ आणि त्या देशात असलेल्या दहशतवादी संघटना यांच्याद्वारे शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर होत आहे. पाकिस्तानसमवेत असलेल्या ३ हजार, ३२३ किलोमीटर लांबीच्या सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलावर आहे.
अलीकडील एका वृत्तानुसार, भारत -पाकिस्तान दरम्यानच्या सीमेवर ड्रोन दिसण्याच्या घटनांमध्ये तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०२१ मध्ये सीमेवर १०४ ड्रोन आढळले होते, तर २०२२ मध्ये ३११ ड्रोन्स आढळून आले आहेत. २०२२ मध्ये शस्त्रास्त्रे, अमलीपदार्थ यांची तस्करी करण्यासाठी ७७ ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता. सीमा सुरक्षा दलाने अशा प्रकारची २२ ड्रोन्स पाडली होती आणि शस्त्रे, अमलीपदार्थ ताब्यात घेतले होते. सीमेपलीकडून येत असलेल्या ड्रोन्सचा विचार करता ३६९ ड्रोन्स पंजाबमध्ये, ७५ ड्रोन्स जम्मूमध्ये, ४० राजस्थानमध्ये आणि आठ गुजरातच्या सीमा भागात आढळले होते. पंजाबमध्ये १६४ ड्रोन्स अमृतसरवर, ८४ फिरोझपूरवर, ९६ गुरदासपूरवर आणि २५ अबोहर भागात आढळले होते.सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करू पाहणार्या ड्रोन्सचा पुरता बंदोबस्त करण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने संबंधितांना दिल्या आहेत. भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानची ‘आयएसआय’ तेथील दहशतवाद्यांच्या मदतीने भारतविरोधी कारवाया करण्यात कशी गुंतली आहे, याची थोडीशी कल्पना यावरून यावी
No comments:
Post a Comment