Total Pageviews

Tuesday, 3 September 2019

इमरानचा सायबर जिहादी डाव- TARUN BHARAT- दिनांक 03-Sep-2019 -अनय जोगळेकर



लष्कर-जैशसारख्या संघटनांना हाताशी धरून काश्मीर खोऱ्यात वा भारतातील महत्त्वाच्या शहरात हल्ले घडवणे आणि मग आंतरराष्ट्रीय मध्यस्थीची मागणी करणे, हा पर्याय वाटतो तितका सोपा नाही. या बाबतीत अमेरिकेसह अन्य देशांची पाकवर नजर आहे. त्यामुळे इमरान खानने भारताविरुद्ध सायबर जिहाद तीव्र केला आहे. गेल्या महिन्याभरात इमरान खान आपल्या प्रत्येक महत्त्वाच्या भाषणात हिंदुत्व आणि रा. स्व. संघाचा उल्लेख करत आहे.

इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानला आपल्या एकटेपणाची आणि हतबलतेची जाणीव झाली आहे.मुख्य म्हणजे ही जाणीव पाकिस्तान सरकारपुरती मर्यादित राहिली नसून पाकिस्तानी लष्करापर्यंत पोहोचली आहेआजवर लष्कर आणि आयएसआयने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानची सत्ता आपल्या हातात ठेवली आहेवेळोवेळी लोकशाहीचा गळा आवळून आणि देशात इस्लामिक मूलतत्त्ववादाचे विष पसरवूनही जनतेमध्ये आपली सकारात्मक प्रतिमा कायम ठेवण्यात लष्कराला यश आले आहेपाकिस्तानच्या अनेक उद्योगांमध्ये लष्कराचा किंवा निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा थेट सहभाग आहेत्यात मनोरंजन उद्योगही आला. पाकिस्तानी लष्कर आपल्या जनसंपर्क आणि प्रसिद्धी विभागाच्या (आयएसपीआर) माध्यमातून सिनेमा, टीव्ही मालिकागाण्यांचे अल्बम आणि नाटकांची निर्मिती करते आणि देशाची एकता आणि अखंडतेमध्ये आपली भूमिका किती महत्त्वाची आहे, हे जनमतावर ठसवते. इंटरनेट आणि समाजमाध्यमांच्या युगात रावळपिंडी तसेच अन्य महत्त्वाच्या शहरांमध्ये लष्कराकडून हुशार विद्यार्थ्यांना हेरून त्यांना प्रशिक्षित केले जातेत्यांना ट्विटर आणि फेसबुक खाती उघडून देऊन लष्करावर टीका करणारे पत्रकार, विचारवंत, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध उतरवले जाते. त्यामुळे थेट राजकारणात नसूनही लष्कर राजकारणाची सूत्रं आपल्या हातात ठेऊ शकते. पण गेल्या पाच वर्षांमध्येखासकरून सप्टेंबर २०१६ मध्येभारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश- ए-महम्मदच्या लाँचपॅडवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर ही परिस्थिती बदलू लागली. २६ फेब्रुवारी२०१९ रोजी मोदी सरकारने येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांचा विचार न करता ज्या प्रकारे पाकिस्तानमधील बालाकोट येथे जैशचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले आणि पुलवामाच्या हल्ल्याचा हिशेब चुकता केला,आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा वापर करत पाकिस्तानच्या तावडीत सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदनची एका दिवसात विनाअट सुटका केली, इस्लामिक सहकार्य परिषदेत विशेष अतिथी म्हणून सहभाग घेतला, त्यामुळे पाकिस्तानचा एक एक बुरुज ढासळत गेला. एवढ्यावरच न थांबता ५ ऑगस्ट रोजी अनुच्छेद ३७०च्या बहुतांश तरतुदी रद्द करत जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करून पाकिस्तानच्या वर्मी घाव घातलाया प्रकरणी कोणताही महत्त्वाचा देश पाकिस्तानची बाजू घेऊन उभा राहिला नाहीअण्वस्त्र युद्धाची धमकी देऊनही कोणी दखल घेतली नाही.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पाच-दहा वर्तमानपत्रांमध्ये काश्मीर खोऱ्यातील ब्लॅक आऊटबद्दल किंवा मानवाधिकारांबद्दल लेख छापून आणण्यात पाकिस्तानला यश मिळाले असले तरी काश्मीर खोऱ्यावरील पाकिस्तानचा दावा कोणीही उचलून धरला नाहीयामुळे पाकिस्तानी लष्कराने जनमानसात आपल्याबद्दल तयार केलेल्या प्रतिमेला तडे गेले आहेतपाकिस्तान आणि भारत यांच्यात युद्ध झाल्यास पाकिस्तान भारताला हरवू शकत नाही, हे पाकिस्तानच्या सुशिक्षित आणि उच्चभ्रू वर्गाला माहिती होते. आता जनसामान्यांचीदेखील तशी भावना झाली आहे. एकीकडे पाकिस्तानी रुपयाचे घसरते मूल्य, कर्जाचा वाढता बोजा, वाढलेली महागाई, ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सकडून लादल्या जाणाऱ्या निर्बंधांची टांगती तलवार यांचे चटके सहन करणाऱ्या पाकिस्तानी लोकांना पैशाअभावी आपण लष्करीदृष्ट्याही भारताचे काही वाकडे करू शकत नाही, याची जाणीव झाली आहे. आजवर किमान मुस्लीम राष्ट्रं काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची बाजू उचलून धरायची पणगेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनने नरेंद्र मोदींना आपापल्या देशांचे सर्वोच्च सन्मान दिले तर सौदी अरेबियाने रिलायन्स पेट्रोकेमिकल्समध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केलाबांगलादेशसोबत अफगाणिस्तान आणि तेथील सत्तेत वाटेकरू होऊ इच्छिणाऱ्या तालिबानने पाकिस्तानला साथ दिली नाहीपाकिस्तानी लष्करावरील जनतेचा विश्वास कमी होत असताना विरोधी पक्ष आपल्याला भारताविरुद्ध युद्ध करण्याचे आव्हान देऊन या आगीत तेल ओतण्याचे काम करतील, अशी लष्कराला भीती आहे. त्यामुळे काश्मीरमधील गळचेपीबद्दल छाती पिटणाऱ्या इमरान खान सरकारने विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना अटक केली आहे.

लष्कर आणि जैशसारख्या संघटनांना हाताशी धरून काश्मीर खोऱ्यात किंवा भारतातील महत्त्वाच्या शहरात हल्ले घडवून आणणे आणि मग आंतरराष्ट्रीय मध्यस्थीची मागणी करणे, हा पर्याय वाटतो तितका सोपा नाही. या बाबतीत अमेरिका आणि अन्य देशांची पाकिस्तानवर नजर आहे. त्यामुळे इमरान खानने भारताविरुद्ध सायबर जिहाद तीव्र केला आहे. गेल्या महिन्याभरात इमरान खान आपल्या प्रत्येक महत्त्वाच्या भाषणात हिंदुत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत आहे.संघ आणि भाजप यांची विचारसरणी हिटलर आणि त्याच्या नाझी पक्षाशी मिळतीजुळती असून त्यांनी ज्याप्रकारे दुसरे महायुद्ध लादले त्याप्रमाणे मोदी आणि संघाने इस्लाम आणि मुसलमानांविरुद्ध युद्ध पुकारले आहे. भारतात गोहत्येवरून मुसलमानांवर झालेले हल्ले, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीद्वारे (NRC) आसाममधील १९ लाख लोकांना-जे मुख्यतः बांगलादेशी घुसखोर आहेत-वगळणे ते अनुच्छेद ३७० आणि काश्मीरमधील संचार आणि इंटरनेट बंदी हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत, असे ते सातत्याने सांगत आहेत. भाजप आणि संघाची भारतातील मुसलमानांना दुय्यम दर्जा देण्याची योजना असून ती अंमलात आणल्यानंतर ते पाकिस्तानकडे मोर्चा वळवणार आहेतअसली बकवास ते सकाळ-संध्याकाळ विविध माध्यमांत करत असतात. इमरान खान टीव्हीवर भाषणं करताना जाणीवपूर्वक जपाच्या माळेचे मणी ओढत आपली इस्लामिक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करतात.

शुक्रवार३० ऑगस्ट रोजी काश्मीरबद्दल आपली संवेदना दाखवण्यासाठी पाकिस्तानने आपल्या नागरिकांना दुपारी १२ वाजता हातातली कामं बाजूला टाकून अर्ध्या तासासाठी रस्त्यांवर उतरायचे आवाहन केले. त्यात आघाडीचे सिनेकलावंत आणि खेळाडूंनाही सामील करून घेण्यात आले. गंमत म्हणजे काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आयोजित केलेल्या या आंदोलनात काश्मीर बनेगा पाकिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या. आज भारताविरुद्ध सायबर जिहाद पुकारणाऱ्या इमरान खान यांना हे आठवत नाही की, जे आरोप ते भारताविरुद्ध करत आहेतनेमक्या त्याच मुद्द्यावर त्यांच्या कायदे आझम महंमद अली जिनांनी भारताची फाळणी करून पाकिस्तान मिळवला. पाकिस्तान सेक्युलर असावाअशी जिनांची इच्छा असली तरी त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच पाकिस्तानने इस्लामी मूलतत्त्ववादाची वाट धरलीइस्लाम सोडून अन्य धर्मीयांना द्वितीय श्रेणीची वागणूक दिली जाऊ लागलीधर्मनिंदेबाबत कडक कायदे करून त्यात अल्पसंख्याकांना हकनाक गोवले गेलेसिंधमध्ये हिंदू मुलींना लग्नासाठी पळवून किंवा बळजबरी करून त्यांचे धर्मांतरण करण्यात आले. इस्लाममधील अहमदीयांना धर्माबाहेर काढण्यात आले. सुफी आणि शिया पंथियांशीही भेदभावाचे धोरण अंगिकारले गेलेपूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकांवर अनन्वित अत्याचार केल्यामुळेच बांगलादेशला आपले स्वातंत्र्य घोषित करावे लागले. एवढेच कायसंयुक्त प्रांतातील ज्या लोकांनी पाकिस्तानच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले त्यांनाही ‘मुहाजीरम्हणून सावत्रपणाची वागणूक मिळते. विशेष म्हणजे पाकिस्तानला संलग्न शिनजियांग प्रांतात चीनकडून उईगर मुसलमानांना लाखोंच्या संख्येने बंदिस्त केले जात आहेत्यांना धर्मपालन करू दिले जात नाही; हे पाकिस्तानला दिसत नाही. पाकिस्तानने पुकारलेला सायबर जिहाद थोडक्यात आटोपला नाही तर भारतानेही त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला हवेपाकिस्तान आणि त्याच्या मित्रराष्ट्रांची मुसलमानांविरुद्ध दडपशाहीवर फेसबुक, ट्विटर तसेच यु-ट्यूबसारख्या माध्यमांतून उर्दू, पश्तो, बलुची आणि सिंधी भाषेत मजकूर आणि व्हिडिओंची निर्मिती करून प्रसारित झाले पाहिजेत. आपण जी काडी पेटवली आहेत्याने आपले घर जळून खाक होईल, याची जाणीव पाकिस्तानला करून द्यायला हवी.


No comments:

Post a Comment