नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये या वर्षी २५-२६
फेब्रुवारी रात्रीच्या ज्या एअरस्ट्राइकमुळे जगाला धक्का बसला त्याची जबाबदारी
होती एअर मार्शल सी. हरिकुमार यांच्यावर. हल्ल्यानंतर दोन दिवसांनी ते निवृत्त
झाले. एअर मार्शल हरी यांनी 'भास्कर'शी चर्चेदरम्यान या मोहिमेतील अनेक रहस्ये उलगडली. या
एअरस्ट्राइकनंतर त्यांनी माध्यमाला दिलेली ही पहिली मुलाखत आहे. ३९ वर्षांच्या
सेवेत ३३०० तास लढाऊ विमान चालवणारे एअर मार्शल हरी यांच्यासाठी सेवेतील शेवटचे १५
दिवस अत्यंत राेमांचक होते. त्यांनी या हल्ल्याची आखणी केली आणि अंमलबजावणीही...
स्ट्राइकच्या कंट्रोल रूमची जबाबदारी होती पश्चिम विभागाचे प्रमुख हरिकुमार
यांच्यावर.... त्यांच्याशी झालेल्या चर्चेतील हा संपादित भाग... हवाई
हल्ल्याचा निर्णय कधी, कसा
घेतला?
१४ फेब्रुवारीला पुलवामात
दहशतवादी हल्ला झाला त्याच दिवशी माझे हवाई दल प्रमुखांशी बोलणे झाले. मी म्हणालो, आता आपली भूमिका महत्त्वाची ठरू शकते, आपल्याकडे योजना असायला हवी. दरम्यान, कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक झाली. यात हवाई दल
प्रमुखही होते. तेथे त्यांनी हवाई हल्ल्याचा पर्याय सुचवला.
त्यानंतर तयारी कशी सुरू झाली?
हे सांगून काही फायदा नाही, परंतु आम्ही या मोहिमेसाठी सज्ज होतो. आम्हाला फक्त लक्ष्य हवे होते.
तुम्हाला लक्ष्याबद्दल (बालाकोटमध्ये जैश-ए-मोहंमदचा दहशतवादी तळ) माहिती कधी मिळाली?
हल्ल्यासाठी २५-२६ फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली होती. त्यापूर्वी सात दिवस याबद्दल आम्हाला माहिती देण्यात आली.
लक्ष्य कुणी दिले?
गुप्तचर संस्थांनी. दहशतवादी तळांची माहिती सरकारने 'रॉ'कडून मिळवली होती.
मोहिमेसाठी पायलट कसे निवडले?
हे जाणून घेणे महत्त्वाचे नाही...आम्ही सर्व आवश्यक साधने पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवली होती.
मोहिमेच्या रात्री २५ फेब्रुवारीला काय घडले होते? त्याच दिवशी तुमची रिटायरमेंट पार्टी होती. २८ फेब्रुवारीला तुम्ही निवृत्त होणार होतात...
दिल्लीच्या इंडिया गेटवरील आकाश मेसची ती संध्याकाळ कायम लक्षात राहील. त्या रात्री १२ नंतर माझा वाढदिवस होता. माझ्या मनात मात्र एक मोठी मोहीम होती. रिटायरमेंट पार्टी अगोदरच ठरली होती. मोहिमेची गुप्तता राहावी म्हणून आम्ही ती रद्द केली नाही. मी पार्टीत वेटरला बोलावले आणि त्याच्या कानात सांगितले की, लाइम कॉर्डियल (ज्यूस व साखरेचे पेय) डबल डोससोबत पाणी टाक. व्हिस्कीसारखा रंग दिसायला हवा. पार्टीत ८० अधिकारी होते. हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी मला लॉनकडे नेले. अंतिम तयारीबाबत मला विचारले आणि सांगितले की, मोहीम फत्ते झाल्यावर फोनवर फक्त 'बंदर' एवढाच शब्द बोला.
अशी राखली गोपनीयता....
स्ट्राइकच्या पूर्वसंध्येला रिटायरमेंट पार्टीत व्हिस्कीसारख्या रंगाचा ज्यूस घेतला, पत्नीलाही सुगावा लागला नाही...
मोहिमेची गुप्तता राखणे किती कठीण होते?
रात्री परतताना मी पत्नीला सांगितले की, उद्या चंदिगडमध्ये विशेष मुलांसाठी बांधलेल्या शाळेच्या उद््घाटनासाठी जाऊ शकणार नाही. हे ऐकून ती खूप नाराज झाली. एअरफोर्स वाइव्हज वेलफेअर असोसिएशनची ती अध्यक्ष असल्याने विमानात माझ्यासोबत येण्याचा तिला अधिकार होता. पश्चिम कमांडवर पोहोचताच मी अत्यावश्यक कामाचे निमित्त करून घराबाहेर पडलो आणि ऑपरेशन रूममध्ये दाखल झालो. मोहिमेची माहिती होतीच. एवढ्या घरून निरोप आला की माझे काही मित्र केक घेऊन घरी आले आहेत. मग मात्र काय करावे कळेना. परंतु, मोहिमेबद्दल संशय येऊ नये म्हणून मी लगेच घरी परतलो. केक कापला आणि कंट्रोल रूममध्ये दाखल होऊन पुन्हा मोहिमेच्या तयारीला लागलो.
नागरी वस्तीचे नुकसान होऊ नये
अशी अामची योजना होती. जेथे लोकांचे नुकसान होईल असे लक्ष्य सोडून दिले. दहशतीला
वचक बसवण्याचा हेतू होता. त्यासाठी बालाकोट उत्तम टार्गेट होते.' - सी. हरी कुमार, माजी एअर मार्शल
चकवा देण्यासाठी सहा विमाने दुसऱ्या दिशेने पाठवली, नंतर हल्ला केला...
मोहिमेसाठी ग्वाल्हेर येथूनही काही विमानांनी उड्डाण केले, त्या वेळी ग्वाल्हेर येथे काय घडत होते ?
गुप्तता राखण्यासाठी ग्वाल्हेरच्या बेसनजीकच्या परिसरातील मोबाइल आणि इंटरनेट सेवा जाम करावी का, यावर अाम्ही सखोल विचारमंथन केले. मात्र, अशा पावलाने गुप्तता राखली जाणार नाही, असा विचार केला.
मात्र मोठ्या प्रमाणात फायटर्सच्या हालचाली गुप्त कशा ठेवता येणार होत्या ?
त्यासाठी व्यापक योजना तयार करण्यात आली होती. मोहिमेवर जाणारे जिगरबाज वैमानिकांशी व्यक्तिगत भेटी घेणे गरजेचे होते. मी २१ फेब्रुवारीला ग्वाल्हेरला गेलो. वैमानिकांशी चर्चा केली. उड्डाणे गुप्त राखणे ही मोठी अडचण होती. त्यांच्या हवाई मार्गाची अडचण ही होती की, दिल्लीहून रवाना होणारी नागरी उड्डाणे वरच्या दिशेने जात असतात, तर दिल्लीकडे येणारी देशांतर्गत व विदेशी उड्डाणे खालच्या दिशेने उतरत असतात. अशात नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रडारवर मोठ्या संख्येने लढाऊ विमानांचे ब्लिप आल्याने खळबळ उडाली असती. ही शक्यता लक्षात घेऊन रेथियॉन रडारवर येणाऱ्या ब्लिपकडे (एक प्रकारची सूचना ) दुर्लक्ष करण्यासाठी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला सरकारच्या विशेष दूताबरोबर विमानतळावर पाठवण्यात आले.
एअरस्ट्राइकसाठी २५-२६ फेब्रुवारीच्या रात्रीची वेळच का निवडली ?
काही कारणे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मात्र, हेतू साध्य करण्यासाठी संबंधित तीन परिस्थितीतून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. पहिले व सर्वात मोठे कारण हे होते की, सर्व दहशतवादी एकत्र असताना हल्ला करायचा होता. ते रात्रीच्या वेळीच शक्य होते. या अतिरेकी तळावर सलात अल फज्र नमाजच्या वेळी पहाटे चारपासून हालचाली सुरू होतात, हे आमच्या लक्षात आले होते. त्यामुळे याच्या एक तास आधी ते अंथरुणात असायला हवेत. भारतात त्या वेळी साडेतीन वाजलेले असतील तर पाकमध्ये तीन. दुसरे कारण, चंद्राच्या स्थितीचे होते. १९ फेब्रुवारीला पौर्णिमा होती. २६ फेब्रुवारीला मोहिमेच्या वेळी तीन ते चार या काळात चंद्र क्षितिजापासून ३० डिग्रीवर हवा होता. हा चंद्रप्रकाश मोहिमेसाठी आदर्श होता. त्या दिवशी पश्चिम विक्षोमाची हालचाल फारशी नव्हती. बॉम्बवर्षावात जोराचे वारे अडथळा ठरू शकले असते. त्याचाही विचार करण्यात आला.
मोहिमेच्या काळात तुमची धडधड वाढवणारी वेळ आली का ?
होय, एकदा आली होती. आपली लढाऊ विमाने जेव्हा लक्ष्याकडे झेपावली होती, तेव्हा मुरीदच्या (रावळपिंडीजवळील ठिकाण, येथे पाकिस्तानचा एअरबेस आहे) अाकाशात पाकिस्तानी हवाई दलाचे एक टेहळणी विमान आणि एक लढाऊ विमान गस्त घालत असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आम्ही दोन सुखोई-३० आणि चार जग्वार विमाने बहावलपूरच्या दिशेने रवाना केली. आपल्या या विमानाच्या हालचालीने पाकिस्तानी विमाने तिकडे वळली आणि धोका टळला. आपल्या फायटरनी आधीच पोझिशन घेतली होती. पहिला एअरस्ट्राइक ३ वाजून २८ मिनिटांनी झाला आणि चार वाजेपर्यंत मोहीम फत्ते झाली होती. सर्व लढाऊ विमाने सुरक्षितपणे पश्चिम क्षेत्रातील दोन विमानतळांवर उतरली होती. पाकिस्तानी एअरफोर्सची प्रतिक्रिया काय होती ?
ते हाय अलर्टवर होते. मात्र, या हल्ल्याने ते हवालदिल झाले होते. हल्ल्यानंतर तत्काळ
त्यांची विमाने बालाकोटच्या आकाशात घिरट्या घालत होती. आणखी एखादा हल्ला होईल याची
त्यांना भीती वाटत होती.
पाकच्या लढाऊ विमानांपासून बचाव करत बालाकोटवरील हल्ला यशस्वी कसा झाला ?
पाकच्या लढाऊ विमानांपासून बचाव करत बालाकोटवरील हल्ला यशस्वी कसा झाला ?
No comments:
Post a Comment