Total Pageviews

Saturday 23 March 2019

बर्बाद गुलिस्ताँ करने को, बस एक ही उल्लू काफ़ी था- हर शाख़ पे उल्लू बैठा है, अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा!-TARUN BHARAT


पाकिस्तानचा जेवढा जीव तुटत नसेल, तेवढा यांचा जीव तीळतीळ तुटू लागला! पित्रोदांचे पित्त खवळले! वास्तविकदहशतवादाचा राक्षस जेव्हा पाळण्यात होता, तेव्हाच त्याला नेस्तनाबूत, उद्ध्वस्त करता आले असते.
बर्बाद गुलिस्ताँ करने को,
बस एक ही उल्लू काफ़ी था-
हर शाख़ पे उल्लू बैठा है,
अंजाम-ए-गुलिस्ताँ क्या होगा!

या शब्दांत शौक बहराइची नावाच्या शायराने फार पूर्वीच काँग्रेसचे वर्णन करून ठेवल्याचे दिसतेप्रसिद्धीचा झोत कायम आपल्याच चेहऱ्यावर राहावा म्हणून कुठल्याही थराला जाऊन चमकोगिरी करणाऱ्या महाभागांची काँग्रेसमध्ये अजिबात कमतरता नाही. म्हणूनच मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंगशशी थरूर अशा एकापेक्षा एक सरस चोंबड्यांच्या तोंडातून इथे अखंड मुक्ताफळे उधळली जातात.पक्षाला अडचणीत आणणाऱ्या वा वादग्रस्त विधानांना ‘वैयक्तिक...वैयक्तिकचा मुलामा देऊन काँग्रेसश्रेष्ठी त्यापासून दूर पळतातही, हे खरेच. पण ते तेवढ्यापुरतेच असते, कारण नंतर मात्र अशा फुटक्या मण्यांना पक्षात पुन्हा पावन करून घेतले जातेच. नीचकार मणिशंकर अय्यर या नमुन्यावरून तर त्याची खात्रीच पटतेआताही गांधी घराण्याचे इमानदार चाकर आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जगाच्या वेशीवर टांगली. “भारताने बालाकोटमध्ये खरेच एअर स्ट्राईक केला का? आपण खरेच ३०० दहशतवादी मारले का?,” अशा शब्दांत भारतीय वायुसेनेवर अविश्वास दाखवत पित्रोदा यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हवाल्याने “भारताने केलेल्या कारवाईत कोणीही ठार झाले नाही,” असे म्हणत हल्ल्याचे पुरावे मागितले. सॅम पित्रोदा एवढ्यावरच थांबले नाहीत तर, “भारताचा एअर स्ट्राईकचा निर्णय चुकीचा होतामूठभर दहशतवाद्यांच्या कर्माचा दोष सगळ्याच पाकिस्तान्यांच्या माथी मारणे योग्य नाही,” असे अकलेचे तारेही त्यांनी तोडले. नंतर मात्र पित्रोदा यांनी आपल्या विधानांबाबत सारवासारव केली व काँग्रेसनेही हेपित्रोदा यांचे वैयक्तिक मत असल्याचे म्हटले. हे अर्थातच काँग्रेसच्या कार्यशैलीला साजेसेच. कारण, कुठल्यातरी वफादारटुच्च्याने बडबड करायची आणि तोंड पोळायला लागले की, त्यातून माघार घ्यायची, हेच धोरण काँग्रेसने नेहमी अवलंबले. आताही तसेच झाले.

वास्तविकपुलवामातील निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकभोवती संशयाची भुते नाचविण्याचे काम काँग्रेससह विरोधकांनी इमानेइतबारे केलेपाकिस्ताननेही भारताने बालाकोटमध्ये कोणतीही कारवाई केली नाहीअसे म्हणत एअर स्ट्राईक झाल्याचे झिडकारलेच होतेखरे म्हणजे इथूनच काँग्रेस आणि पाकिस्तानची जीभ एकाच दिशेने चराचरा चालत असल्याचे लक्षात येत होतेआज सॅम पित्रोदा यांच्यासारख्या निष्ठावंताच्या विधानाने त्यावरच शिक्कामोर्तब झाल्याचे दिसते. पित्रोदा यांच्या विधानानंतर काँग्रेस वा पक्षश्रेष्ठी कितीही वैयक्तिकचा आव आणत असले तरी ते तितकेसे खरे नाही. कारणपित्रोदा यांच्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भारतीय वायुसेनेने जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यावर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागितलेच होते. (दरम्यान, एसएआर इमेजेससैन्यदलांची पत्रकार परिषद व मौलाना मसूद अझहरच्या भावाच्या कबुलीजबाबातूनही एअर स्ट्राईकची सिद्धता झाली आहे.) केवळ राहुलच नव्हे, तर माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही शब्दच्छल करत तोच कित्ता गिरवला होता. त्यामुळे सॅम पित्रोदा यांचे विधान वैयक्तिकश्रेणीत मोडत नाही, तर ते एक षड्यंत्र ठरते. भारतीय सैन्यदलांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे, देशवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे, केंद्रीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे, पाकिस्तानच्या जबानीशी जबान मिळवण्याचेहे कारस्थान काँग्रेस नेते वारंवार का करत असावेत? राजकारण म्हटले की, एखाद्या विचारसरणीला, पक्षाला, राजनेत्याला विरोध हा होणारचपण हे करताना देशाचा वा सैन्यदलांचा विरोध करण्याचे कारण कायसत्तेत नसताना अशाप्रकारे वागत असेल तर काँग्रेसने सत्तेवर असताना वारंवार होणाऱ्या जिहादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देश दहशतवाद्यांना आंदण दिला होता कामणिशंकर अय्यर यांनी केंद्रातील विद्यमान भाजप सरकारविरोधात मागितलेल्या पाकिस्तानी मदतीशी याचा काही संबंध आहे का? असे प्रश्नही निर्माण होतातज्याची उत्तरे नक्कीच मिळायला हवीत.

वस्तुतः देशातील संगणक क्रांतीत सॅम पित्रोदा यांचा मोठा सहभाग होता. देशात पसरलेल्या माहिती-तंत्रज्ञानाच्या अवाढव्य व्यापात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह पित्रोदा यांचीही महत्त्वाची भूमिका होती. पण म्हणतात ना, घर फिरले की, घराचे वासेही फिरतात. तशीच काहीशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहेम्हणूनच एका बाजूला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची ‘पप्पूगिरी’ देशात चर्चेचा विषय झालेला असतानाच दुसऱ्या बाजूला सॅम पित्रोदा यांच्यासारख्यांची ‘हुच्चगिरीही अनुभवायला येते. दुसरीकडे भारताने एअर स्ट्राईक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्यायला नको होता, पाकिस्तानला धडा शिकवायला नको होताअशा बेछूटपणातून काँग्रेसने आपल्या कार्यकाळात दहशतवाद्यांशी केलेल्या प्रेमळ व्यवहाराचीही खात्री पटते. म्हणूनच देशात काश्मीरपासून मुंबईदिल्लीपर्यंत फिदायीन हल्ले होत होते,तेव्हाही पित्रोदा वगैरे बुद्धीमांद्यांच्या सल्ल्याने पाऊल उचलणारे शेपूट घालून बसत होते. ‘कडी निंदाशिवाय एक शब्दही या लोकांच्या तोंडातून फुटत नव्हता अन् आता मोदी सरकारने हिंमत दाखवून दहशतवाद्यांना ‘एकाच्या बदल्यात दहाने उत्तर देण्याचा विडा उचलला तर काँग्रेसी बुळ्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या! पाकिस्तानचा जेवढा जीव तुटत नसेलतेवढा यांचा जीव तीळतीळ तुटू लागला! पित्रोदांचे पित्त खवळले! वास्तविक, दहशतवादाचा राक्षस जेव्हा पाळण्यात होता, तेव्हाच त्याला नेस्तनाबूतउद्ध्वस्त करता आले असते. पणकेंद्रात सत्तेत असूनही काँग्रेसने कधीही तशी पावले उचलण्याचे धाडस केले नाही. उलट चर्चाचर्चा आणि चर्चांचाच धोशा लावत पाकिस्तानला आणि मतांच्या भीकेपायी मुसलमानांना गोंजारण्याचेच काम केले. परिणामीकाँग्रेसच्या शेळपटपणामुळे आज पाकव्याप्त काश्मीर व काश्मीर खोऱ्यातील दोन-तीन जिल्ह्यांत का होईनादहशतवादाचा शेकडो तोंडांचा सैतान निर्माण झाल्याचे दिसतेदहशतवादाविरोधातील काँग्रेसी बोटचेपेपणामुळेच हजारो सैनिकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनाही प्राण गमवावे लागले. तरीही काँग्रेसी विचारजंत, ‘कशाला प्रतिहल्ला केला?,’ असे विचारतात. यावरूनच ही मंडळी देशातल्या सर्वच सोयीसुविधांचा उपभोग घेऊनही भारताची नव्हे तर पाकिस्तानचीच वकिली करत असल्याचे दिसते. ‘जिस थाली में खाया, उसी में छेद किया,’ यालाच म्हणतात ना?

सोबतच सॅम पित्रोदा, “मोदी सरकार मजबूत असल्याचे म्हटले जात असले तरी लोकशाहीच्या भल्यासाठी मजबूत सरकार असणे गरजेचे नाही. हिटलरसह जगातले सगळेच हुकूमशहा मजबूत होते आणि चीनचे अध्यक्षही मजबूतच आहेत,” असेही म्हणाले. सॅम पित्रोदा यांच्या या विधानांवरूनइंदिरा गांधी वा राजीव गांधी यांच्या मजबूत सरकारबाबतही पित्रोदा यांचे हेच मत आहे का/होते का?, हा प्रश्न नक्कीच विचारावासा वाटतो. मात्र, पदप्रतिष्ठेच्या अर्थपूर्ण लाचारीपायी गांधी घराण्यापुढे लाळघोटेपणा करणारे पित्रोदा यावर काही बोलणार नाहीतच. पणपित्रोदा वगैरेसारख्यांच्या मातीखाऊ वक्तव्यांमुळे काँग्रेसची पुरती वाट लागेल, हे नक्की अन् हे एवढ्यावरच थांबणार नाही,उलट जसजसा लोकसभा निवडणुकीचा माहोल तापत जाईलतसतसे एकेक काँग्रेसी सोंगं बाहेर निघून वेडेवाकडे चाळे करतच राहतील अन् गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी उजाड झालेल्या काँग्रेसी बागेला बर्बाद केल्याशिवाय ही मंडळी शांत बसणारही नाहीचअर्थात त्यानेही लोकेच्छाच पूर्ण होईल म्हणा!
ज्यांनी आपली बुद्धी देशाबाहेर गहाण टाकत पाकिस्तान्यांपुढे लोटांगणे घातली, त्यांना हे कसे समजणार, कसे जाणवणार? ते पाकिस्तानचेच गोडवे गाणार!! सिद्धूनेही तेच केले.

चाळीसहून अधिक भारतीय सैनिकांच्या चिंधड्या करणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघा देश बदला घेण्याच्यासंतापाच्या भावनेने पेटून उठलेला असतानाच अस्तनीतल्या निखाऱ्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केलीपुलवामातील भीषण हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या गळाभेटीचे कर्ज डोक्यावर असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने दहशतवादाला देश आणि धर्म नसल्याची टिमकी वाजवलीआपल्या देशात कोणताही दहशतवादी हल्ला झाला की, भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याची स्पर्धा मातृभूमीशी प्रामाणिक असले काय अन नसले कायचा कृतघ्नपणा करणाऱ्यांकडून सुरू होते. स्वदेशाऐवजी, हुतात्म्यांऐवजी,भारतीयांऐवजी असल्या लोकांना पाकिस्तानचाच पुळका येताना दिसतो. सुरुवातीला दहशतवादाचा आम्ही निषेध करतोचे एखादे वाक्य फेकायचे आणि नंतर मात्र पाकप्रेमाचे जाहीर प्रदर्शन मांडायचे चाळे ही मंडळी नेहमीच करतातनवज्योतसिंग सिद्धूनेही कॉमेडी शोमधून दात विचकायचे अन् टाळ्या वाजवण्याचे काम करता करता पाकिस्तानचे कौतुक करण्याचा मार्ग चोखाळलाभाजपमध्ये अशी काही संधी नसल्याने मग सिद्धूने आम आदमी पक्षापासून ते काँग्रेसचा हात हातात घेण्यापर्यंतचाही प्रवास केला. अर्थातहे दोन्ही पक्ष आपल्यासारखाच विचार करणारे असल्याचा साक्षात्कार झाल्यानेच सिद्धूने हे केले असावेआप आणि काँग्रेसचे खेटे घातलेल्या या इसमाने दरम्यानच्या काळात दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकच्या नापाक भूमीवर आपल्या पावलांचे ठसे उमटवण्याचेही उद्योग केले.

इमरान खानच्या पंतप्रधानकीच्या शपथविधीला गेलेल्या सिद्धूने शांततेची कबुतरे उडवण्याची नौटंकी करत पाकिस्तानसारखा देश नसल्याचे म्हटलेअर्थात सिद्धूचे म्हणणे एकादृष्टीने बरोबरच आहे कीकारण दहशतवादाला रसदपुरवठा करुनही, दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा वापर करायला देऊनही, दहशतवादी हल्ले करूनही नामानिराळे राहण्याचास्वतःलाच दहशतवादाचा बळी म्हणवण्याचा निर्लज्जपणा बाणवलेला पाकिस्तानसारखा देश जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे असेल, म्हणाअन् अशा उलट्या बोंबा मारणाऱ्या देशाच्या पंतप्रधानाला,लष्करप्रमुखाला कवटाळणार कोण, तर सिद्धू!! पाकव्याप्त काश्मीरच्या कथित पंतप्रधानाच्या मांडीला मांडी लावून बसणार कोण, तर सिद्धू!! धारातीर्थी पडणाऱ्या सैनिकांचा अवमान करत दहशतवादाचा कोणताही देश नसल्याचे तारे तोडणार कोण, तर सिद्धू!! दुसरीकडे पाकिस्तानचे नाव काढले की हळव्या होणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धूला फुटणारे उमाळे काही आजचेच नाहीत२०१८ सालच्या ऑक्टोबरमध्येही हिमाचल प्रदेशातील लिटरेचर फेस्टिव्हलवेळी सिद्धूने पाकिस्तानवर स्तुतिसुमने उधळण्याची कामगिरी केलीच होती. सिद्धूने दक्षिण भारतात गेलो वा तिथल्या शहरांत-गावांत फिरलो कीभाषेपासून खानपानापर्यंत प्रत्येकच गोष्ट बदलते,” असे म्हणत पाकिस्तानात मात्र असे काही होत नसल्याचे उद्गार काढले होतेवस्तुतः भारतीयत्व अंगात मुरलेल्या प्रत्येकालाच इथल्या सामाजिक,सांस्कृतिक वैविध्याची पुरेशी जाण आहे.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर १२५ कोटी भारतीय शोकसागरात बुडालेले असताना किडक्या प्रवृत्तीच्या लोकांनी झाल्या घटनेतून राजकीय डाव साधता येईल का, असा विचार केला. भारतीय राजकारणात ५० वर्षांपासून सक्रिय असलेल्या आणि एकेकाळी संरक्षणमंत्रिपद भूषवलेल्या शरद पवारांनीदेशाचे रक्षण करण्यात ५६ इंची छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आल्याची टीका केली. शरद पवारांसारख्या अनुभवी माणसाने खरे म्हणजे आपल्या ज्येष्ठपणाचापोक्तपणाचा परिचय करून देत अशा आणीबाणीच्या प्रसंगी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भाषा करायला हवी होतीपण गेल्या साडेचार वर्षांपासून सत्ता नसल्याने पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी अवस्था झालेल्या पवारांना राजकारण करण्याचा मोह कसा आवरेल? परिणामी, पवारांनी मोदींवर टीका करण्याचाच मार्ग पत्करला. हे पवारांनीच केले असेही नाही, तर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही, “आता ५६ इंची छाती फुगवून उत्तर देणार का,” अशी विचारणा केली.जिंदमधल्या पराभवाने विचित्र मनस्थिती झालेल्या रणदीप सुरजेवालांना दहशतवादी हल्ल्याचेही गांभीर्य राहिले नसल्याचेच यावरून स्पष्ट होतेपवार वा सुरजेवालांच्याही पुढे जात खरा कहर केला तो मुंब्र्याच्या गल्लीत उनाडक्या करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांनी. आपला दाढी कुरवाळण्याचा अजेंडा पुढे चालवत आव्हाडांनी, पुलवामातील हल्ला मुस्लीमविरोधी राजकारणाचा परिपाक असल्याची तोंडपट्टी केली. एकीकडे दहशतवादाला धर्म नसतोचे पालुपद लावायचे आणि दुसऱ्या बाजूला स्वत:च मुस्लिमांचा संबंध अशा हल्ल्यांशी लावायचा, हे कसले लक्षण? म्हणजे यांना वीरांची, वीरमातांची, वीरपत्नींची वा देशाची चिंता नाहीतर मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची काळजी. आपण जिथे राहतो, तिथेच घाण करणारी ही मंडळी देशाच्या राजकारणातसमाजकारणात काही एक स्थान राखून असतील तोपर्यंत बाह्य शत्रुंची गरज ती काय, हा प्रश्नही त्यामुळे निर्माण होतो. म्हणूनच परक्या भूमीतील दुश्मनांसह मायभूमीतल्या देशविरोधकांनाही धडा शिकवण्याची मागणी जनतेमधून होते. अर्थातजनता आपल्या हाती असलेल्या मतदानाच्या अस्त्राचा वापर करून ते करतेही आणि करेलही, हे निश्चित!!


No comments:

Post a Comment