सकाळी ६ ची वेळ..पणजीच्या रस्त्यांवर
अगदी तुरळक वाहनं होती.
सुश्शेगाद वृत्तीचे बहुसंख्य गोंयकर अद्याप
साखरझोपेत होते. पण नेहमीच्या सवयीनुसार एक स्कूटरस्वार आपल्या ऑफिसकडे निघाला
होता. इतक्या सकाळीही पणजीच्या मुख्य
चौकातील सिग्नल चालू होते. तो स्कूटरस्वार तिथे आला आणि लाल दिवा लागला आणि तो
थांबला.त्याचवेळी मागून एक आलिशान गाडी भरधाव वेगाने येत होती. रस्त्यावर कुणीही
नसताना तो स्कूटरस्वार लाल सिग्नलमुळे थांबेल असं त्या कारवाल्याला वाटलं नाही
त्यामुळे अचानक कार थांबवताना त्याची तारांबळ उडाली.
रागाने खाली उतरला आणि त्या स्कूटरस्वाराला
म्हणाला '”कित्या थांबलो रे?”
"सिग्नल बघ मरे'" स्कूटरस्वार म्हणाला. कारवाल्याचा पारा
अधिकच चढला. 'बाजू हो. तुका माहित असा मीया कोण असंय ता? xxxx पोलीस
स्टेशनच्या PI चो झील!'
तो स्कूटरस्वार म्हणाला 'अस्सें?
मग तुझ्या बापसाक जाउन सांग की माका
गोंय चो मुख्यमंत्री भेटलो होतो!!' खजील झालेला कारवाला स्कूटरस्वाराचे पाय धरू
लागला. पण त्याला थांबवत तो इतकंच म्हणाला की सिग्नल पाळत जा आणि तो ऑफिसकडे निघून
गेला.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे
नवे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या
साधेपणाचे असे अनेक किस्से गोव्यात प्रसिद्ध आहेत.
त्यांना एखादा टपरीवर चहा पिताना किंवा उभ्या- उभ्याच नाष्टा करताना गोव्यातल्या
लोकांनी अनेकदा पाहिलंय. मुख्यमंत्री असताना पर्रीकर कधीही सरकारी निवासस्थानात
राहिले नाहीत आणि सरकारी गाडीही क्वचितच वापरली. आपल्या मोठ्या मुलासोबत ते 2BHK फ्लॅटमधे
राहत ज्याच्या कर्जाचे हप्ते ते अजूनही भरत आहेत.
म्हापसा येथे गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात पर्रीकरांचा
जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार घडले.
आपल्या संघ पार्श्वभूमीविषयी पर्रीकर आजही अभिमानाने बोलतात. उच्चशिक्षणासाठी
पर्रीकर मुंबईच्या IIT मधे दाखल झाले.
मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी दोन महत्वाचे निर्णय
घेतले. गोव्यातील अवैध मायनिंग बंद केले आणि पेट्रोल- डिझेलवरचा कर २०% वरून ०.१%
वर आणला. गोव्यात पेट्रोल २०रू. स्वस्त झाले. या निर्णयावर प्रचंड टीका झाली.
होणारं प्रचंड महसुली नुकसान भरून निघणं अशक्य आहे आणि गोवा सरकार दिवाळखोरीत निघेल
अशी भिती व्यक्त होऊ लागली.
पण हिशोबी पर्रीकरांकडे सर्व प्लॅन
तयार होता. त्यांनी दाबोलीम अंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानासाठी लागणार्या व्हाईट
पेट्रोलवरचा करही घटवला आणि त्याबदल्यात विमान कंपन्यांनी गोव्यासाठीच्या
तिकीटदरात कपात केली. त्यामुळे देशी- विदेशी पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली. तसेच
त्यांनी गोव्यातील कॅसिनोंवरचे करही वाढवले.
अशा रीतीने गोव्यातील पर्यटन वाढले, स्थानिकांचे
रोजगार वाढले, उद्योगांना चालना मिळाली आणि महसूली नुकसानही
भरून निघाले.
मी गोव्याच्या जनतेचा ट्रस्टी आहे , त्यामुळे
जनतेचं नुकसान होईल असा एकही निर्णय मी घेणार नाही असं ते नेहमी म्हणत आणि
गोव्याच्या जनतेचाही त्यांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असे.
गेल्या दोन वर्षात गोव्याच्या
प्रशासनातून भ्रष्टाचार जवळपास हद्दपार झालाय. एजंट, कॉंट्रॅक्टर, सरकारी
कर्मचारी अगदी प्रामाणिकपणे कामं पूर्ण करत आहेत. गोव्याच्या अगदी लहानात लहान
गल्लीबोळातील स्वच्छ, चकचकीत रस्ते पाहिले की याची साक्ष पटते.
पर्रीकरांना निरनिराळ्या मार्गांनी लाच
देऊन त्यांची प्रतिमा डागाळण्याचेही अनेक प्रयत्न झाले पण पर्रीकर कशालाच बधले
नाहीत.
पर्रीकरांच्या धाकट्या मुलाला एकदा strokes चा
प्रचंड त्रास सुरू झाला. जीव वाचवायचा असेल तर तातडीने मुंबईला न्यायला हवं असं
डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळी मोदी नावाच्या एका उद्योगपतीने स्पेशल विमानाने
त्याला मुंबईला नेले. त्याला स्ट्रेचरवरून न्ह्यायचे असल्यामुळे विमानातील सहा
सीटस् काढण्यात आल्या आणि त्यांचे पैसे
भरले. पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचला. या मोदीचे मांडवी नदीत अनेक कॅसिनो
आहेत आणि तिथे त्याने काही अवैध बांधकामे केली होती. ती बाधकामे पाडण्याचे आदेश
पर्रीकरांनी दिले होते. आपल्यामुळे पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचली त्यामुळे हा
आदेश ते रद्द करतील अशा खात्रीने मोदी त्यांना भेटायला गेले.
कॉंग्रेसला याची कुणकुण लागली आणि आता
पर्रीकर जाळ्यात सापडणार असं त्यांना वाटू लागलं. पण झालं उलटंच. पर्रीकरांनी
मोदींना स्पष्ट सांगितले की एक बाप या नात्याने मी तुमचे आभार मानतो पण
मुख्यमंत्री म्हणून माझा निर्णय बदलणार नाही.
त्या संध्याकाळीच सर्व अवैध बांधकामे
उद्ध्वस्त करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्यांनी त्या सहा सीटच्या भाड्याचे पैसे
मोदींना देऊन टाकले.
५८ वर्षांचे पर्रीकर १६ तास काम करतात. मुख्यमंत्री
कार्यालयातील कर्मचार्यांनाही त्यांच्यामुळे उसंत मिळत नाही.
एके दिवशी काहीतरी महत्वाचं काम
असल्याने त्यांचे सचिव रात्री १२ पर्यंत ऑफिसमधे त्यांच्यासोबत होते. जाताना
त्यांनी विचारलं की उद्या थोडं उशीरा आलं तर चालेल का? यावर
पर्रीकर म्हणाले की हो चालेल. उद्या थोडं उशीरा म्हणजे साडेसहापर्यंत आलात तरी
चालेल! ते सचिव दुसर्या दिवशी साडेसहाला ऑफिसमधे आले तेंव्हा त्यांना वॉचमननं
सांगितलं की साहेब सव्वापाचलाच आले आहेत!!
अशा या नररत्नाची पारख नरेंद्र मोदी
नावाच्या रत्नपारख्याने कधीच केली होती. म्हणूनच संरक्षणमंत्रीपदासारखं
अतिमहत्वाचं खातं त्यांना मिळालं.
हॉटेलबाहेर एका रिक्षातून आलेल्या, स्वतःची
बॅग स्वतः उचलणार्या आणि साधा शर्ट, पँट आणि चप्पल परीधान करून कोणत्याही
संरक्षणाशिवाय आलेल्या नव्या
No comments:
Post a Comment