Total Pageviews

Friday 25 April 2014

NEPAL INDIA RELATIONS & NEW GOVT

नेपाळमधील स्थिती आणि नव्या सरकारचे धोरण ब्रिगेडियर हेमंत महाजन नेपाळसारखे राष्ट्र काल-परवापर्यंत स्वत:ला अभिमानाने जगातले एकमेव हिंदू राष्ट्र म्हणवत होते. नेपाळचे हिंदुस्थानशी संबंध अत्यंत सलोख्याचे होते. कारण दोन देशांमध्ये समान संस्कृती आणि धर्माशी निगडित पुरातन परंपरेचा समान धागा आहे. तथापि, चीनला आपला प्रेरणास्रोत मानणारे माओवादी या अतूट नातेसंबंधांची नाळ तोडू पाहात आहेत. नेपाळ सीमेवरील आपल्या देशातील सीमावर्ती राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार. मात्र गेल्या काही वर्षांत या दोन्ही राज्यांमध्ये नेपाळ सीमेला लागून असलेल्या भागात मदरशांची संख्या धोकादायकरीत्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हजारो मदरसे निर्माण झाली असून पलीकडे नेपाळच्या भूमीतही अशीच परिस्थिती असल्याची माहिती सशस्त्र सीमादलाच्या प्रमुख संचालकांनी दिली आहे. हिंदुस्थान-नेपाळ सीमेवरील आपल्याकडील प्रांत सुमारे ३४३ मशिदी, ३०० मदरसे आणि १७ मशीद वजा मदरसे प्रति १० किलोमीटर परिसरात आहेत. नेपाळकडील सीमावर्ती भागात २८२ मशिदी, १८१ मदरसे आणि ८ मशीद वजा मदरसे आहेत. या मशिदी आणि मदरशांना सौदी अरेबिया, कुवेत, इराण, पाकिस्तान, बांगलादेश आदी मुस्लिम देशांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक पुरवठा होत असतो. येथील उलेमा नेपाळमधील बँका, उद्योजक आणि दूतावासासोबत घनिष्ठ संबंध ठेवून आहेत. या आर्थिक व्यवहारांचे संचलन इस्लामिक डेव्हलपमेंट बँक, जेद्दा आणि पाकिस्तानातील हबीब बँक यांच्यामार्फत होते. आखाती देशातील हिंदुस्थानी मुस्लिमांशीही येथूनच व्यवहार केला जातो. पाकिस्तानच्या हबीब बँकेची नेपाळमधील हिमालया बँकेबरोबर भागीदारी झाल्यापासून त्यांनी आपले जाळे हिंदुस्थान - नेपाळच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात पसरवले आहे. परदेशी चलनाचे हिंदुस्थानी चलनात परिवर्तनही नेपाळमध्येच करून हा पैसा हिंदुस्थानात आणला जात असल्याचा संशय अनेक तज्ज्ञांनी व गुप्तचर विभागाने व्यक्त केला आहे. या सीमावर्ती भागातील मशिदी व मदरशांना मुस्लिम नेते, तबलिगी जमात आणि नेपाळमधील पाकधार्जिणे नेते वेळोवेळी भेट देत असतात. ‘नेपाळी इस्लामी युवा मंच’ व ‘नेपाळी इत्तेहाद संघा’च्या माध्यमातून नेपाळमध्ये बस्तान बसविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. ईशान्येकडील दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी त्या स्थापण्यात आल्या आहेत. नेपाळमधील पाकिस्तानी वकिलातही त्यात मागे नाही. बनावट हिंदुस्थानी चलनाच्या तस्करीसाठी नेपाळ आता कुप्रसिद्ध होऊ लागला आहे. त्यामागे पाकिस्तानी वकिलातीमधील काही अधिकार्‍यांचा हात आहे. नेपाळमध्ये प्रभाव वाढविण्यासाठी ‘नेपाळी नॅशनॅलिस्ट पार्टी’ या नावाचा पक्ष स्थापन करण्याचा घाट आता ‘आयएसआय’ने घातला आहे. तिबेटचा लढा हिंदुस्थान व युरोपियन युनियन यांच्या पाठिंब्याने चालतो हा चीनचा आरोप आहे. आता नेपाळमधील तिबेटींना सतर्क राहावे लागेल. नेपाळमधील चीनच्या हालचाली वाढत आहेत. इतकी वर्षे सर्व नेपाळी राजांनी चिनी नेत्यांशी विश्वासाचे संबंध ठेवले होते. एवढेच नव्हे तर हे सर्व राजे सोयीने हिंदुस्थानविरुद्ध चीनचा वापरही करीत होते. आज चीनने नेपाळमधील गुंतवणुकीतून हिंदुस्थानला मागे टाकण्याची शिस्तबद्ध योजना हाती घेतली आहे. केवळ पर्यटन, हॉटेल व्यवसायात नेपाळ-चीन अशा ७५ प्रकल्पांना संयुक्तरीत्या आरंभ झाला आहे. अप्पर त्तिशुली आणि राहुघाट या जलविद्युत योजना चीनने खिशात घातल्या आहेत. तिबेटमध्ये चीनने सुरू केलेला रेल्वे मार्ग वाढवून नेपाळपर्यंत आणण्याचा चीनचा मनसुबा आहे. नेपाळला हिंदुस्थानचा भौगोलिक वेढा असला तरी चीन आता उत्तरेकडून नेपाळला रेल्वेद्वारा खुला मार्ग देणार आहे. नेपाळ हे एकमेव हिंदू राष्ट्र आहे. अर्थात पाकिस्तानी आयएसआय तसेच चीन नेपाळवर नजर ठेवून आहेत. नेपाळमध्ये सध्याचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करीत आहे. ख्रिश्‍चन व मुस्लिम समाज आपला धर्म व संस्कृतीचा नेपाळमध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदुस्थान सरकारला नेपाळकडे छोटा भाऊ म्हणून लक्ष द्यावे लागेल. एकवेळ अशी होती की, नेपाळ प्रत्येक मुद्यावर एक असायचा, आज राज्य, सीमा, भाषा, जातपात या मुद्यांवर अशांतता निर्माण केली जात आहे. आज हिंदुस्थानने जर नेपाळला मदत केली नाही तर नेपाळचा घास गिळण्यात चीन यशस्वी होईल व भविष्यात हिंदुस्थानला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. नेपाळमधील अनेक लोक हिंदुस्थानात पोटापाण्यासाठी व अन्य कामांसाठी येत-जात असतात. नेपाळमधील जनता आजही हिंदुस्थानवर प्रेम करते, परंतु चीन मात्र नेपाळी जनतेला आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. नेपाळमधील रस्ते आणि रेल्वेच्या प्रकल्पांसाठी गुंतवणूक करणे जरुरी आहे. याशिवाय सीमेवर एकात्मिक सीमाशुल्क केंद्रे उभी केली पाहिजेत. मात्र नेपाळला केवळ आर्थिक मदत करून चालणार नाही. तेथील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये समेट घडवून आणणे आवश्यक आहे. विविध पक्ष आणि गटातटांमध्ये विभागलेली. तेथील राजकारणात मतैक्य होणे गरजेचे आहे. नेपाळच्या अंतरंगात घुसण्यासाठी चीन, आयएसआय आणि बांगलादेश यांचे जमलेले मेतकूटही हिंदुस्थानच्या हिताचे नाही म्हणूनच हिंदुस्थान आणि नेपाळ जवळ येणे गरजेचे आहे. नेपाळलगतच्या सीमेवरदेखील हिंदुस्थानने बारीक लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. पस्हूस्प्रह१२१५३ॅब्प्दद.म्द.ग्ह

No comments:

Post a Comment