Total Pageviews

Monday, 28 April 2014

OPERATION MODI BY TERRORISTS

दहशतवाद्यांचे ‘ऑपरेशन मोदी’ Apr 28, 2014, 12.29AM IST > 'आयएम'च्या दहशतवाद्यांकडून सुगावा > तपास यंत्रणांचा 'हाय अलर्ट' म. टा. प्रतिनिधी, पुणे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी इंडियन मुजाहिदीन आणि 'सिमी' या बंदी घालण्यात आलेल्या संघटनांचे देशभरातील ३० 'स्लिपर सेल' सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी तेहसीन उर्फ मोनू अख्तर आणि इम्तियाज अन्सारी यांनी ही माहिती तपास यंत्रणांना दिली असून, देशातील सर्व मुख्य तपास यंत्रणा हे 'स्लिपर सेल' शोधण्यासाठी कामाला लागल्या आहेत. त्यासाठी मोनू आणि अन्सारी यांच्याशी संबंधित आणि सध्या देशभरातील वेगवेगळ्या तुरुंगांत अटकेत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली येथे नेण्यात आले असून, त्यांची याबाबत कसून चौकशी सुरू आहे. 'दिल्लीतील यंत्रणांना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या दहशतवाद्यांकडे तपास करणे शक्य व्हावे, यासाठी गेल्या दोन दिवसांपासून या दहशतवाद्यांना दिल्लीत नेण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रातून कुठल्याही दहशतवाद्याला अद्यापपर्यंत दिल्लीत नेण्यात आले नाही,' असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. मोदी यांच्या पाटण्यातील हुंकार रॅलीत बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी आपले लक्ष्य साध्य करण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यापाठीमागे 'आयएम'चा मोनू असल्याचे अटकेतील दहशतवाद्यांकडून स्पष्ट झाले. मोनूला अटक दोन महिन्यांपूर्वी केल्यानंतर तपास यंत्रणा अन्सारीपर्यंत पोहोचल्या. देशभरातील ३० 'स्लिपर सेल'ची माहिती अन्सारीने यंत्रणांना दिली. मोदींनी पाटण्यात मुक्काम केलेल्या ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार करणे शक्य आहे का, याची चाचपणीही करण्यात आल्याचे अन्सारीने सांगितल्यानंतर सर्वच यंत्रणा अवाक झाले असून, देशभरातील सिमीच्या कार्यकर्त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मध्य प्रदेश येथील तुरुंग तोडून पळालेला अबू फैजल आणि त्याच्या साथीदारानींही मोदी यांच्यावर दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. फैजलच्या साथीदारांची पाळेमुळे सोलापूरपर्यंत पोहोचली होती. मध्य प्रदेश 'एटीएस'ने फैजलला अटक केल्यानंतर सोलापूरमधून चौघांना ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली होती. या पार्श्वभूमीवर सध्या फैजलकडेही तपास सुरू आहे. यासीनला घाईने दिल्लीला नेले यासीनकडे महाराष्ट्र 'एटीएस' तपास करत असताना दिल्लीत हालचाली सुरू झाल्या होत्या. यासीनची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला तत्काळ दिल्लीला नेण्यात आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला ताब्यात घेत पुन्हा चौकशी सुरू केली. त्यामुळे मोनू, वकास, यासीन आणि इम्तियाजकडे यांच्याकडे एकाचवेळी तपास केल्यानंतर देशभरातील सि​मीच्या कार्यकर्त्यांकडे चौकशी सुरू झाल्याचे सूत्रांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment