Total Pageviews

Saturday, 15 June 2024

बांगलादेशी नागरिकांना भारतीय पासपोर्ट आणि मतदानाचा अधिकार मिळाला?

 

 एटीएसच्या जुहू कक्षाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी एका बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेतले. तपासात भारतीय पारपत्र मिळवल्याचे उघड झाले. पोलिसांनी रियाज हुसेन शेख, सुलतान सिध्दीक शेख, इब्राहिम शफिउल्ला शेख आणि फारूख उस्मानगणी शेख यांना अटक केली. त्यांच्यावर मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य केल्याबाबत गुन्हे दाखल आहेत. आणखी पाच जणांनी अशाच प्रकारे पारपत्र मिळवले असून त्यातील एकजण सौदी अरेबिया येथे नोकरीला गेला आहे.

बांगलादेशी नागरिकांनी सहा ते सात हजार रुपयांमध्ये शिधावाटप पत्रिका मिळवल्याचे निष्पन्न झाले होते. या पत्रिकांच्या आधारे चालक परवाना, ग्रामपंचायतकडून स्थानिक वास्तव्याचा दाखला, तहसीलकडून जन्माचा दाखला, अधिवासाचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून देण्यात आला होता.

भारतीय पारपत्र मिळवून मुंबईत अटक

भारतीय पारपत्र मिळवून मुंबईत राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. या आरोपींनी बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व मिळवून लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. आरोपींपैकी एक जण परदेशात नोकरीलाही गेला आहे.

 

लोकसभेसाठी मतदान केले ?

सामान्य भारतीय नागरिकांकडे जेवढी शासकीय प्रमाणपत्र नाहीत, त्याहून अधिक कागदपत्रे आरोपींनी तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी पारपत्रासह लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. भारतीय पारपत्रावर परदेशात नोकऱ्या मिळणे शक्य असल्याने बांगलादेशी नागरिक ते प्राप्त करतात.

भारताचे नागरिकत्व बांगलादेशी कसे मिळवतात?

पनवेलमधून काही बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत सहा ते सात हजार रुपयांमध्ये शिधावाटप पत्रिका मिळवण्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या आधारे चालक परवाना, स्थानिक वास्तव्याचा दाखला, जन्माचा दाखला, अधिवासाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला मिळाला होता. एजंटमार्फत ही सर्व कामे करण्यात आली होती. बनावट कागदपत्रांद्वारे हे सर्व सरकारी दाखले मिळवले होते.

भारतात स्थायिक कसे केले जाते?

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अक्रम नूर नवी शेख नावाच्या बांगलादेशी नागरिकाला अटक केली होती. तो मूळचा बांगलादेशातील चितगाव राज्यातील रहिवासी होता. अक्रम बेकायदेशीररित्या भारतात येऊन मुंबईतील वडाळा परिसरात राहत होता. त्याने बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतीय नागरिकांना आणण्याचे काम केले. अक्रम प्रति व्यक्ती २० हजार रुपये घेत होता. तसेच, बांगलादेशी नागरिकांनी भारतात कमावलेली रक्कम मायदेशात पाठवण्याचे काम करत होता. शिवडी स्थानकाजवळ त्याला अटक करण्यात आली

No comments:

Post a Comment