Total Pageviews

Sunday, 9 June 2024

भारताची सर्वसमावेशक ताकद वाढवण्याकरता वेगाने काम करा

https://youtube.com/shorts/gk4yxtK-0RQ?si=zNMq37DuEHDg2B8P 


७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या र्चीवर विराजमान होणार असल्याच्या वृत्तानंतर जगभरातील नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासह ७५ हून अधिक जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल. यात मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश आहे. तसेच या सगळ्यांनी त्यांच्यासोबत जवळून काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विजयाबद्दल आणि ऐतिहासिक निवडणुकीतील सुमारे ६५० दशलक्ष मतदारांचे अभिनंदन. दोन्ही राष्ट्रांमधील मैत्रीपूर्ण संबंध वाढत आहेत. आम्ही अमर्यादित सामर्थ्याचे सामायिक भविष्य ‘अनलॉक’ करतो,’ असे जो बायडन आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणाले. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी दूरध्वनी संभाषणादरम्यान मोदींचे यशाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन केले .

ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनीही मोदींशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले. के आणि भारत सर्वांत जवळचे मित्र असून, ही मैत्री पुढेही वाढत राहील,’ असे सुनक यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

तर ‘जगातील सर्वांत मोठी निवडणूक भारतात पार पडली. नरेंद्र मोदी, माझे प्रिय मित्र, अभिनंदन. आपण भारत आणि फ्रान्सला एकत्र करणारी धोरणात्मक भागीदारी मजबूत करत राहू.’ असे मॅक्रॉन म्हणाले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावरून नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारत आणि इस्रायलमधील मैत्री नवीन उंचीवर जाईल, बधाई हो!’ असे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस, श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे, मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतिफ, दिनेश गुणवर्देना, पंतप्रधान, श्रीलंका, प्रविंद कुमार जगन्नाथ, पंतप्रधान, मॉरिशस, पुष्प कमल दहल, पंतप्रधान नेपाळ, हे सगळे सलग तिसऱ्यांदा मिळवलेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत आहेत व द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी भारतीय पंतप्रधानांसोबत काम करण्यास इच्छुक आहेत.

युरोप, अमेरिकेमधील भारत विरोधी न्यूज चॅनल्स विरुध्द तेथील भारतप्रेमी राजकीय नेतृत्व


No comments:

Post a Comment