Total Pageviews

Saturday, 15 June 2024

बांगलादेशी खासदार अनार हत्येमागे तस्कर, गुन्हेगा्र, बागलादेशी घुसखोर यांचा हात

https://epaper.saamana.com/editionname/Mumbai/SAMANA_MUM/page/4/article/SAMANA_MUM_20240615_4_2 


पश्चिम बंगालची 2217  किलोमीटरची सीमा बंगलादेशला लागलेली आहे आणि या सीमेवर तस्करी आणि घुसखोरी हा एक मोठा व्यवसाय आहे. तस्कर आणि घुसखोरांकरता आओ जाओ घर तुम्हारा हे  तत्त्व पश्चिम बंगालमध्ये  पाळले जाते. सोने, अफू गांजा चरस, खोट्या नोटा,तस्करी, गुरेढोरे पळवणे, दरोडेखोरी, माणसे पळवणे, गुन्हेगारांना पळायला मदत करणे, स्त्रिया मुलांचा व्यापार करणे इत्यादी सीमेपलीकडून येऊन केले जाणारे गुन्हे हे एक वास्तव आणि उपजीविकेचा भाग आहे. कायदेशीर कारवाई रोखण्याकरता उभय देशांतील गुन्हेगारांनी दुसर्‍या देशात पळून गेलेले असताना, परस्परांना आश्रय पुरवण्याबाबत जणू एक करार केला आहे. सीमेपलीकडे पळून जाणे सोपे असते, म्हणुन गुन्हेगार गुन्हा करून पळून जातात आणि कायद्याचा दबाव नाहीसा होईपर्यंत, बांगलादेशात सहानुभूतीदारांपाशी व नातेवाइकांपाशी आश्रय घेतात.

प.बंगालमध्ये निवडणुकोत्तर हिंसाचार पुन्हा भडकला असून, त्रुनुमुल विरोधात मतदान केलेल्या मतदारांवर ,काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर हिंसक हल्ले सुरू झाले आहेत. अनेक भागांतून हिंदू कुटुंबांना पलायन करावे लागले आहे. कोलकाता उच्च न्यायालयानेही याची दखल घेतली असून, हिंसाचार थांबला नाही , तर येती पाच वर्षे राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला तैनात करावे लागेल, असा इशाराही दिला आहे. या वरून तेथील स्थिती किती भयावह आहे, याचा अंदाज यावा.

आपण जेव्हा बांगलादेशी खासदार अन्वर यांच्या हत्येचे विश्लेषण करतो, तेव्हा असे दिसते की यामध्ये तस्कर, गुन्हेगा्र, बागलादेशी घुसखोर यांचा मोठा हात आहे. सीमेवर तस्करी करणाऱ्या वेगवेगळ्या गटांमध्ये होणाऱ्या स्पर्धेमुळे किंवा वैरामुळे ही हत्या झाली असावी. 

बांगलादेश खासदाराचा कोलकात्यात मृतदेह आढळला

अन्वारुल अझीम अनार हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. २२ मे कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. ते बांगलादेशचा सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे खासदार आहेत.खासदार अन्वारुल अझीम अनार हे १२ मे रोजी उपचार घेण्यासाठी कोलकाता येथे आले होते.

अन्वारुल अझीम अनार हे कोलकाता येथील एका मित्राच्या घरी भेटण्यासाठी गेले. तेथून डॉक्टरांकडे उपचारासाठी जायचं असं सांगून बाहेर पडले.बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी सांगितलं की, आम्हाला त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात ३ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बांगलादेशी खासदाराची भारतात हत्या कशी झाली?

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी सांगितले की, अनार यांची कोलकाता येथील एका घरात नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करण्यात आली.गृहमंत्री खान यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या हत्येत बांगलादेशातील लोक सामील होते.

अन्वारुल अझीम अनार हे बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीगचे खासदार होते. ते झेनैदह-४ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ५ जानेवारी २०१४ साली ते पहिल्यांदा संसदेवर निवडून आले होते. २०१८ सालच्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. भारत-बांगलादेश सीमेवरील झेनैदह हे क्षेत्र गुन्हेगारीसाठी ओळखले जाते. २००८ मध्ये इंटरपोलने अनार यांच्याविरुद्ध शस्त्रे आणि स्फोटकांसह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये नोटीस जारी केली होती. २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांना सर्व आरोपातून मुक्त करण्यात आले.

अनार १२ मे रोजी बारानगरमधील मंडोलपारा येथे एका मित्राच्या घरी गेले होते. गोपाल बिस्वास असे या मित्राचे नाव असून ते सोन्याचे व्यापारी आहेत. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरांना भेटण्यासाठी निघाले आणि तेव्हापासून ते बेपत्ता होते.बिस्वास यांनी बारानगर पोलिस ठाण्यात अनार बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांना त्यांच्या कोलकाता उपनगरातील फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आढळले होते. याच ठिकाणी अनार यांना शेवटचे पाहिले गेले. १३ मे रोजी ते इतर तिघांसह फ्लॅटमध्ये प्रवेश करताना दिसले. यावरून त्यांच्याबरोबर काहीतरी गैर घडल्याचा आणि त्यांची हत्या झाल्याचा संशय निर्माण झाला.१३ मे रोजी दुपारी १.४० च्या सुमारास अनार कोलकाता येथील रुग्णालयात न्यूरोलॉजिस्टला भेटण्यासाठी कॅबमधून ते निघाले. ड्रायव्हरने पोलिसांना सांगितले की, त्यांनी न्यू मार्केट परिसरातून आणखी एका बांगलादेशी नागरिकाला आपल्याबरोबर घेतले आणि नंतर न्यू टाऊनमधील फ्लॅटकडे निघाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनार यांच्याबरोबर दोन पुरुष आणि एक महिला फ्लॅटमध्ये शिरल्याचे दिसून आले आहे. पुढच्या तीन दिवसांत हे तिघेही फ्लॅटबाहेर पडले, मात्र त्यांच्याबरोबर अनार कुठेही दिसले नाही.

बांगलादेशचे खासदार ज्या फ्लॅटमध्ये शेवटचे दिसले होते, तो फ्लॅट बंगाल सरकारच्या कर्मचाऱ्याच्या मालकीचा आहे. त्याने हा फ्लॅट अख्तरझमन नावाच्या अमेरिकन नागरिकाला भाड्याने दिला होता,जो एक संशयित आहे. अन्वरूल आझिम अनार यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला मायदेशी आणण्यासाठी बांगलादेशचे सरकार इंटरपोलची मदत घेणार आहे. खासदाराच्या हत्येच्या कथित सहभागावरून तीन संशयितांना बांगलादेशच्या न्यायालयाने आठ दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावली आहे.  

बहुतेक संशयित बांगलादेशी घुसखोर

बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली . पश्चिम बंगाल सीआयडीने बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातून सियाम हुसेन या बांगलादेशीला अटक केली.तत्पूर्वी, पश्चिम बंगाल सीआयडीने या प्रकरणात जिहाद हवालदार या बांगलादेशी स्थलांतरिताला अटक केली होती. जिहाद हवालदार, मुंबईत कसायाचे काम करायचा.

त्याने बांगलादेशी खासदाराच्या मृतदेहाचे 80 तुकडे केले आणि न्यू टाउनच्या आसपासच्या कालव्यासह वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट केली.पश्चिम बंगाल सीआयडीने दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भंगार भागातील बागजोला कालव्यातून त्याचे शरीराचे अवयव जप्त केले. नेपाळमध्ये अटक केल्यानंतर ताब्यात असलेल्या मोहम्मद सियाम हुसेनने सीआयडीला घटनास्थळी नेले .

खासदार अन्वर यांच्या हत्येचे विश्लेषण

अनार यांच्याविरुद्ध शस्त्रे आणि स्फोटकांसह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये इंटरपोलची नोटीस होती.

पश्चिम बंगालच्या सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी या हत्येमागे सोन्याच्या तस्करीचा संशय व्यक्त केला होता. अनार आणि त्यांचा अमेरिकेतील मित्र व व्यावसायिक भागीदार यांच्यात सोन्याच्या तस्करीवरून झालेली कथित वाद हे या गुन्ह्याचे कारण असावे. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी यापूर्वी अनारच्या हत्येतील प्रमुख संशयित म्हणून एका व्यावसायिकाचे नाव घेतले होते.

बांगलादेशी घुसखोर तस्करीवर अवलंबून राहतात. तस्करी व मानवी व्यापारात गुंतलेले माफिया धनवान झालेले आहेत आणि सीमाभागात त्यांनी आपापले बस्तान बसवलेले आहे. भ्रष्ट सरकारी कर्मचारी आणि त्यांचे राजकीय आश्रयदाते यांची तस्करांसोबत हातमिळवणी झालेली आहे. त्यामुळे अनधिकृत बांगलादेशी घुसखोर सीमा सहज पार करून भारतात प्रवेश करू शकतात; एवढेच नाही तर, भारताचे नागरिक म्हणून राहण्यास आवश्यक असलेली कागदपत्रही ते विकत घेऊ शकत आहेत.

त्याशिवाय, वैध प्रवेशपत्रांवर प्रवेश करणारे बांगलादेशी हे भारतात अधिकृत मुदतीपेक्षा जास्तीचा काळ निवास करत आहेत किंवा परतणे टाळतही आहेत.

अजुन काय करावे

 

ही तस्करी थांबवण्यामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाला पूर्णपणे अपयश मिळालेले आहे. पश्चिम बंगालचे सरकार आणि त्यांचे पोलीस सीमा सुरक्षा दलाला घुसखोरी थांबवण्याकरता मदत करायच्या ऐवजी, घुसखोरांना आत येण्यामध्ये मदत करतात. पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरी, जमिनी सीमा , समुद्री सीमापासून अविरत चालू आहे. वेळोवेळी काही बांगलादेशी पकडले जातात, परंतु बहुतेक भारतात कायमचे घुसतात.

बांगलादेशी व्यक्तींना यापुढे येताक्षणीच प्रवेश-अनुमतीची, (Visa On arrival) मुक्त प्रवेशाची परवानगी देउ नये . वैद्यकीय पर्यटनाची प्रथा (Medical Tourism) बांगलादेशीयांकरता  बंद करावी. अनधिकृत घुसखोरांवर, त्यांच्या बिगरसरकारी संघटनांवर आणि त्यांना पाठिंबा देणार्‍या सर्व राजकीय पक्षांवर बहिष्कार टाकावा.

बांगलादेशी घुसखोरी देशाच्या सुरक्षेला असलेला मोठा धोका आहे.ही घुसखोरी आणि सिमेवर होणारी तस्करी थांबलीच पाहिजे.

 

No comments:

Post a Comment