https://www.amazon.in/dp/B0D2TLZLRB?ref=myi_title_dp
प्रकाशक- स्वातंत्रवीर सावरकर स्मारक,
दादर पश्चिम,
शिवाजी पार्क,
मुंबई.
हे पुस्तक तीन भागांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. प्रत्येक पुस्तकाची
किंमत रुपये २००/- आहे
आणि प्रत्येक पुस्तकाच्या पानांची संख्या २००-२१५ आहे.
या पुस्तकाला प्रस्तावना कमोडोर राजन वीर, अध्यक्ष इंडियन मेरीटाइम फाउंडेशन, भारतीय तटरक्षक दलाचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल एस.पी.एस. बसरा, भारतीय
नौदलाचे व्हाईस ऍडमिरल प्रदीप चौहान, महाराष्ट्र पोलीस दलाचे पूर्व डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री. प्रवीण दीक्षित यांनी लिहिलेली आहे. त्यांनी लिहिलेली प्रस्तावना ही पुस्तकाकरता व्हॅल्यू
एडिशनच आहे.
भारताची सागरी सुरक्षा,
आव्हाने,
चिंता आणि पुढील वाटचाल, भाग
१,
भारताच्या किनारपट्टीची लांबी ७,५१६.६ कि.मी. आहे. मुख्यभूमी किनारपट्टीची लांबी ५,४२२.६
कि.मी.आहे. नऊ
राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांना ती स्पर्श करते.
लक्षद्वीप किनारपट्टीची लांबी१३२ कि.मी. अंदमान
आणि निकोबार द्वीपांच्या किनारपट्टीची लांबी१,९६२ कि.मी.आहे.
या लांबलचक किनारपट्टीमुळे आणि अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात
विखुरलेल्या बेटामुळे भारताला युनायटेड नेशन्सच्या कायद्याप्रमाणे प्रचंड मोठे
सागरी क्षेत्र मिळते, त्याला
एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हटले जाते. या समुद्रक्षेत्राचे क्षेत्रफळ हे भारताच्या मुख्यभूमीपेक्षा जास्त आहे.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून सोने आणि अमली पदार्थ देशात येत राहिले. १९९३ मधील मुंबईतील मालिका स्फोटांकरताची स्फोटके
ह्याच किनाऱ्यावरून आली, २६-११-२००८
चा दहशतवादी हल्ला, सुरक्षा
दलांकरता एक मोठा धक्का होता.
उदासीन शासक, स्वतःची
साम्राज्ये उभी करणारी शक्तिशाली नोकरशाही,
सामान्य गुप्तवार्ता विभाग,
भ्रष्ट सीमाशुल्क आणि अबकारी खाती, असमर्थ सागरी पोलीस,
स्पष्ट उद्दिष्टविहीन भारतीय तटरक्षक दल, अयोग्य/कालबाह्य नावा बाळगणारे भारतीय नौदल,
धोकेदायक हालचाली वरती अपुरे लक्ष; ह्या कारणांनी २६-११-२००८ पर्यंत, भारतीय सागरी सुरक्षेचे चित्र निराशाजनक होते.
हे पुस्तक सागरी सुरक्षेचे महत्त्वाचे घटक अधोरेखित करते. सागरी समाज, समुद्री पोलीसदल, तटरक्षकदल, नौदल, इतर
सर्व हितसंबंधीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना ह्यांच्यातील सहकार्याकरता; एक स्पष्ट आणि सुनिश्चित यंत्रणा तयार करावी असा
उद्देश त्यामागे आहे. चला, आपण सर्व मिळून भारताची किनारपट्टी अधिक सुरक्षित करू
या. आर्य चाणक्य म्हणाले होते
की, “जगात माणसाला खरी सुरक्षा; केवळ ज्ञान, अनुभव आणि त्यांचा शहाणपणाने वापर करुनच मिळते.”
हे पुस्तक नेमके तेच संकलन करत आहे.
No comments:
Post a Comment