नक्षलवाद, माओवाद ,डावा दहशतवाद किंवा डावा उग्रवाद कसा संपवायचा भारतामध्ये?नक्षलवाद्यांचा
हल्ला, ११ जवान शहीद,
छत्तीसगडमध्ये
छत्तीसगडमध्ये
मोठा नक्षलवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ११
जवान शहीद झाल्याची माहिती आहे. हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिला आहे.
छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद
झाले आहेत. नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात हे जवान शहीद
झाले आहेत. एएनआयने हे वृत्त दिले
आहे.
छत्तीसगडच्या
दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरजवळ ही घटना घडली.
नक्षलवाद्यांनी रस्त्यात पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. याच रस्त्यावरून छत्तीसगडच्या पोलिसांचे वाहन जात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला. यात स्फोटात छत्तीसगडच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे ११ जवान शहीद
झाले आहेत.
छत्तीसगडचे
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. नक्षलवादी हल्ला झाल्याची माहिती आहे. अतिशय दुःखद घटना आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयां दुःखात आपलण सहभागी आहोत. ही लढाई आता
शेवटच्या टप्प्यात आहे. हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment